दहावीचा निकाल १५ जुलैनंतरच लागणार, संबंधित आराखडा दोन दिवसांत प्रसिद्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 08:17 AM2021-06-07T08:17:37+5:302021-06-07T08:25:47+5:30

result : परीक्षेचा निकाल तयार करण्यास सोमवारी किंवा मंगळवारी संबंधित आराखडा प्रसिद्ध होणार आहे. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

The result of class X will be available only after July 15, the relevant plan will be published | दहावीचा निकाल १५ जुलैनंतरच लागणार, संबंधित आराखडा दोन दिवसांत प्रसिद्ध होणार

दहावीचा निकाल १५ जुलैनंतरच लागणार, संबंधित आराखडा दोन दिवसांत प्रसिद्ध होणार

Next

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून, मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार केला जाणार आहे.
परीक्षेचा निकाल तयार करण्यास सोमवारी किंवा मंगळवारी संबंधित आराखडा प्रसिद्ध होणार आहे. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. राज्य मंडळाकडून नववी व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यासाठी शाळांकडून प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण मागविले जाणार आहेत. शाळांनी विशिष्ट आराखड्यात ऑनलाइन पद्धतीने हे गुण भरून द्यायचे आहेत. राज्य मंडळाकडून हा आराखडा तयार केला जात असून, सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी तो प्रसिद्ध केला होणार आहे.

दहावीच्या निकालासाठी आवश्यक असणारा आराखडा दोन दिवसांत प्रसिद्ध केला जाईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी या आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत. शाळांकडून प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे १५ जुलैपर्यंत निकाल प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा आहे. 
    - दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.

Web Title: The result of class X will be available only after July 15, the relevant plan will be published

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.