शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
4
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूम शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
5
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
6
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
7
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
8
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
9
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
10
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
11
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
12
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
13
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
14
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
15
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
16
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
17
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
18
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
20
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित

एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 06:14 IST

विविध क्षेत्रातील व्यावसायिक, नोकरदार पुढील शिक्षण घेण्याच्या उद्देशाने विधी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा कल गेल्या काही वर्षांत वाढला आहे.

मुंबई : राज्यात मागील काही वर्षांपासून एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातून यंदा आतापर्यंतचे विक्रमी २२,५३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर या अभ्यासक्रमाच्या ९५ टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. 

विविध क्षेत्रातील व्यावसायिक, नोकरदार पुढील शिक्षण घेण्याच्या उद्देशाने विधी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा कल गेल्या काही वर्षांत वाढला आहे. विधीच्या पदवीमुळे नोकरीत मिळू शकणारी बढती, तसेच वकिली व्यवसायाला असलेली प्रतिष्ठा अनेकांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आकृष्ट करत आहे. त्यातून यंदाही या अभ्यासक्रमाच्या अनेक कॉलेजांतील जागा हाऊसफुल झाल्या आहेत. तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमासाठी यंदा २१७ कॉलेजांमध्ये २३,७२९ जागा होत्या. यासाठी तब्बल ५३,९९० विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यातील २२,५३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

जागा वाढूनही प्रवेशाची स्पर्धा चढीच यंदा एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये २,६५८ एवढी भरघोस वाढ झाली. मात्र तरीही प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने यंदाही तीव्र स्पर्धा होती. गेल्या वर्षी राज्यात विधी अभ्यासक्रमासाठी २१,०७१ जागा होत्या. यंदा त्या वाढून २३,७२९ एवढ्या झाल्या. मात्र जागांमध्ये वाढ होऊनही बहुतांश कॉलेजांतील सर्व जागांवर प्रवेश झाले. तर गेल्या पाच वर्षात एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये ५,३०४ एवढी मोठी वाढ झाली आहे. 

एलएलबी पाच वर्षांसाठी १०,०२६ विद्यार्थ्यांचे प्रवेशपाच वर्ष एलएलबी अभ्यासक्रमासाठी यंदा १०,०२६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. या अभ्यासक्रमासाठी १३,५८९ जागा होत्या. त्यापैकी ३,५६३ जागा रिक्त राहिल्या आहेत. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेशात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी पाच वर्ष विधी अभ्यासक्रमासाठी १२,७३१ जागा होत्या, त्यापैकी ९,४३८ जागा भरल्या होत्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Record Admissions for LLB 3-Year Course; Over 22,000 Enrolled

Web Summary : Maharashtra sees record LLB admissions, with over 22,000 students enrolling in the 3-year course. Around 95% of seats are filled due to increased interest from professionals seeking career advancement and the prestige of law.
टॅग्स :Educationशिक्षण