शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया आजपासून सुरू; अर्जासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 08:11 IST

अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक www.mahacet.org येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता २०२१-२२ करिता सीईटी सेलकडून तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या बीई, बीटेक, बीएचएमसीटी आणि डीएसई (थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी) या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला दोन नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. तसेच डीएसपी (थेट द्वितीय वर्ष औषधनिर्माणशास्त्र), बॅचलर इन आर्किटेक्चर या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी तीन नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक www.mahacet.org येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

राज्यातील शासकीय, अनुदानित, विद्यापीठांशी संलग्न संस्था आणि विभाग, तसेच विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या (बी.ई आणि बी.टेक) प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतील सर्वसाधारण गुणवत्ता यादी २२ नोव्हेंबर, तर अंतिम गुणवत्ता यादी २७ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत दोन प्रवेश फेऱ्या होतील.  प्रवेशाच्या २ फेऱ्यांनंतर १५ ते २२ डिसेंबरदरम्यान महाविद्यालयांना रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानंतरच ६ डिसेंबर रोजी महाविद्यालयांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाला सुरुवात करता येणार आहे. 

अशी असेल प्रक्रियाऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रे अपलोड करणे : १८ नोव्हेंबर (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)कागदपत्रे पडताळणी, अर्ज निश्चिती, ई-स्क्रुटनी किंवा प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन स्क्रुटनी करणे : २० नोव्हेंबर (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे : २२ नोव्हेंबरसर्वसाधारण तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर हरकती, आक्षेप नोंदविण्यासाठी कालावधी : २३ ते २५ नोव्हेंबर ।  अंतिम गुणवत्ता यादी जाहीर : २७ नोव्हेंबरप्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : २७ नोव्हेंबर

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी निकालानंतर लगेचच प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रक्रियेनुसार अर्जनोंदणी वेळेत करून आपापले प्रवेश निश्चित करावेत. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास संकेतस्थळावरील सीईटी कक्षाच्या पत्त्यावर विद्यार्थी ईमेल करू शकतात, अथवा समस्या सांगू शकणार आहेत. - रवींद्र जगताप, आयुक्त, सीईटी सेल