ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक परीक्षा म्हणजेच इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठीचे अर्ज दाखल करण्यासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ...
ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच धर्तीवर खासगी शिकवणी वर्गांनाही परवानगी दिली जावी, अशी मागणी खासगी कोचिंग क्लासेस संघटनांकडून होत आहे. ...
राज्यात प्रगत शैक्षणिक कार्यक्रमात तंत्रस्नेही शिक्षक व शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीनेच राज्यात सरल प्रणालीवर सर्व शिक्षक, शाळा व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात येते. त्यानंतर ही माहिती अद्ययावत करण्यात येते. ...
मुलांना तंत्रज्ञानाची ओळखच होऊ नये किंवा त्यापासून त्यांनी दूरच राहावं, असा या शाळांचा दृष्टिकोन अजिबातच नाही, पण, नको त्या वयात मोबाइलसारख्या वस्तू हाती लागून आणि त्याच्या आहारी जाऊन त्यांचं बालपण बरबाद होऊ नये हा या शाळांचा प्रमुख हेतू आहे. ...