लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा डंका! B.Tech विद्यार्थ्याला 'गुगल'नं दिलं ६४ लाखांचं पॅकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 04:35 PM2022-05-18T16:35:05+5:302022-05-19T16:29:30+5:30

रेकॉर्डब्रेक प्लेसमेंट देण्याचा वारसा कायम राखत लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीनं (LPU) जून २०२२ च्या पदवीधर बॅचसाठी पुन्हा एकदा सर्वाधिक प्लेसमेंट ऑफर आणि देशातील सर्वोच्च पॅकेजच्या रेकॉर्डची नोंद केली आहे. 

LPU B Tech engineering Student placed at INR 64 Lakh Package at Google | लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा डंका! B.Tech विद्यार्थ्याला 'गुगल'नं दिलं ६४ लाखांचं पॅकेज

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा डंका! B.Tech विद्यार्थ्याला 'गुगल'नं दिलं ६४ लाखांचं पॅकेज

Next

रेकॉर्डब्रेक प्लेसमेंट देण्याचा वारसा कायम राखत लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीनं (LPU) जून २०२२ च्या पदवीधर बॅचसाठी पुन्हा एकदा सर्वाधिक प्लेसमेंट ऑफर आणि देशातील सर्वोच्च पॅकेजच्या रेकॉर्डची नोंद केली आहे. 

एलपीयूचा बीटेक सीएसईचा विद्यार्थी हरे कृष्णा याला जगातील टॉप टेक कंपनी असलेल्या गुगलनं तब्बल ६४ लाखांचं पॅकेज दिलं आहे. तो गुगलच्या बंगळुरू येथील ऑफिसमधून काम करणार आहे. देशात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला मिळालेलं हे सर्वोच्च पॅकेज आहे. २०२२ बॅचचा आणखी एक LPU चा विद्यार्थी, अर्जुनला AI/ML डोमेनमध्ये ६३ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. तोसुद्धा बंगळुरूच्या कार्यालयात रुजू होणार आहे. LPU नं यंदा स्वतःचाच विक्रम मोडला आहे, कारण हे पॅकेज १.५ पट (५०%) अधिक आहे. मागील वर्षात सर्वात जास्त ४२ लाख रुपयांचे प्रकेज फ्रेशरसाठी मिळाले होते. Amazon ने देखील एलपीयूतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला ४६.४ लाखांचे पॅकेज दिले आहे.

 

परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीनं यंदा एक नवा विक्रम करत ८४०० हून अधिक प्लेसमेंट आणि इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षेच्या एक महिना आधीच ऑफर केल्या आहेत. यावर्षी, ११९० हून अधिक कंपन्या विद्यार्थ्यांची भरती करण्यासाठी LPU कॅम्पसमध्ये पोहोचल्या. प्लेसमेंटसाठी एखाद्या विद्यापीठ कॅम्पसला भेट देणाऱ्या कंपन्यांच्या संख्येचा हा एक विक्रम आहे. युनिव्हर्सिटीतील टॉपच्या विद्यार्थ्यांना  Amazon, Google, VMware, Lowe's, Infineon, Target, Bajaj Fineserv, What fix, ZS Associates, Zscaler, Practo, Palo Alto इत्यादींसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये १० ते ४८ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. कॉग्निझंटने ६७० हून अधिक विद्यार्थ्यांची भरती केली, कॅपजेमिनीने ३१० हून अधिक विद्यार्थ्यांची भरती केली. विप्रोने ३१०, MPhasis ने २१० आणि Accenture ने १५० हून अधिक विद्यार्थ्यांची भरती केली आहे. याशिवाय Lead Squared कंपनीने LPU च्या विद्यार्थ्यांना ६.७७ लाख ते १० लाखांपर्यंतचे पॅकेज दिले आहेत. 

अलीकडच्या काळात टॉप रिक्रूटर्सद्वारे LPU विद्यार्थ्यांना २०,००० हून अधिक प्लेसमेंट्स/इंटर्नशिप ऑफर केल्या गेल्या आहेत. ५०० पैकी अनेक कंपन्यांनी ५,००० हून अधिक ऑफर्स दिल्या आहेत. 

LPU मधील शैक्षणिक अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे पाहा: 

परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

"एलपीयूमध्ये, आम्ही सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रीत करणारा एक अतिशय व्यापक अभ्यासक्रम प्रदान करण्यावर भर देतो. LPU ने अलीकडे अभियांत्रिकी, डेटा सायन्स, बिग डेटा, क्लाउड, डिजिटल मार्केटिंग, फायनान्शिअल मार्केट, सप्लाय चेन, एचआरएम, मेडिकल सायन्स आणि इतर बरेच विशेष कार्यक्रम ऑफर करण्यासाठी अनेक कॉर्पोरेट्सशी करार केला आहे. यासह LPU ने उद्योग 4.0 आवश्यकतांसाठी तयार असलेल्या विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शविली आहे. LPU आता जागतिक टाईम्स हायर एज्युकेशन रँकिंगमध्ये असलेल्या मोजक्या भारतीय विद्यापीठांपैकी एक आहे", असं एलपीयूचे कुलपती डॉ. अशोक मित्तल म्हणाले. 

एलपीयूचा प्लेसमेंट डेटा युनिव्हर्सिटीच्या स्थापनेपासूनच नेहमी उत्कृष्ट राहिला आहे. शेकडो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह हजारो LPU विद्यार्थी जगभरात यशस्वीपणे करिअर करत आहेत. IITs/IIMs/NITs मधून भरती करणार्‍या ११० हून अधिक टॉप रिक्रूटिंग कंपन्या देखील LPU मधून विद्यार्थ्यांची भरती करतात. LPU चे अनेक माजी विद्यार्थी सध्या गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इतर सिलिकॉन व्हॅलीमधील कंपन्यांमध्ये एक कोटीच्या पॅकेजसह काम करत आहेत. 

२०२२ सालच्या यंदाच्या बॅचसाठी प्रवेश याआधीच सुरू झाला आहे. प्रवेश प्रक्रिया खूपच स्पर्धात्मक आहे आणि विद्यापीठाची प्रवेश परीक्षा LPUNEST2022 आणि काही कार्यक्रमांमध्ये वैयक्तिक मुलाखती उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आधारित आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख लवकरच संपत आहे. परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Web Title: LPU B Tech engineering Student placed at INR 64 Lakh Package at Google

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app