शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता लवकरच देशभरातील मदरशांमध्ये शिकवलं जाणार रामायण अन् भगवद्गीता, NIOSचा प्लॅन तयार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 16:13 IST

नॅशनल इंस्‍टिट्यूट ऑफ ओपन स्‍कूलिंगचा हा नवा अभ्यासक्रम नव्या शिक्षण धोरणाचा भाग आहे. शिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या एनआयओएस  (NIOS) वर्ग 3, 5 आणि 8 साठी बेसिक कोर्सची सुरुवात करेल. (National institute of open schooling)

ठळक मुद्देदेशभरातील मदरशांमध्ये रामायण आणि भगवद्गीतेचे धडे दिले जाणार सुरुवातीला 100 मदरशांपासून याची सुरुवात करण्यात येईल.भविष्यात हा कार्यक्रम 500 मदरशांपर्यंत नेण्यात येईल.

नवी दिल्ली - आता लवकरच देशभरातील मदरशांमध्ये (madrasa) रामायण (ramayana) आणि भगवद्गीतेचे (bhagavad gita) धडे दिले जाणार आहेत. एवढेच नाही, तर येथील विद्यार्थ्यांना योगाचेही धडे दिले जातील. नॅशनल इंस्‍टिट्यूट ऑफ ओपन स्‍कुलिंग (NIOS) प्राचीन भारतीय ज्ञान आणि परंपरा या पार्श्वभूमीवर 100 मदरशांतून नवा अभ्यासक्रम सुरू करत आहे आणि याची संपूर्ण तयारीही झाली आहे.  (National institute of open schooling to take bhagavad gita ramayana to madrasas)

नॅशनल इंस्‍टिट्यूट ऑफ ओपन स्‍कूलिंगचा हा नवा अभ्यासक्रम नव्या शिक्षण धोरणाचा भाग आहे. शिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या एनआयओएस  (NIOS) वर्ग 3, 5 आणि 8 साठी बेसिक कोर्सची सुरुवात करेल. सुरुवातीला 100 मदरशांपासून याची सुरुवात करण्यात येईल. तसेच भविष्यात हा कार्यक्रम 500 मदरशांपर्यंत नेण्यात येईल. एनआयओएसचे अध्यक्ष सरोज शर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

अहवालानुसार, नॅशनल इंस्‍टिट्यूट ऑफ ओपन स्‍कुलिंगने (NIOS) भारतीय ज्ञान परंपरेसंदर्भात 15 कोर्स तयार केले आहेत. यात वेद, योग, विज्ञान, संस्कृत भाषा, व्यावसायिक कौशल, रामायण, गीता आणि पाणिनी-प्रवर्तित महेश्वरा सूत्र यांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम तिसऱ्या, पाचव्या आणि 8 व्या वर्गाच्या बरोबरचा आहे.

केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी मंगळवारी नोएडा येथील एनआयओएसच्या केंद्रीय मुख्‍यालयात याचे स्‍टडी मटेरिअल जारी केले. यावेळी त्यांनी, 'भारत प्राचीन भाषा, विज्ञान, कला, संस्‍कृती आणि परंपरांची खान आहे. आता देश आपली प्राचीन परंपरा पुनर्जीवित करून ज्ञानाच्या क्षेत्रात सुपरपावर होण्यास तयार आहे. आपण या कोर्सचा लाभ मदरसा आणि जगभरातील समाजापर्यंत पोहोचवू,' असे म्हटले आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारramayanरामायणMahabharatमहाभारतEducationशिक्षण