शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सोप्पं तर असतं ते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 03:42 IST

- गौरी पटवर्धन शाळेच्या बाबतीत काहीतरी निरोप आल्याचं ऐकल्यावर सिद्धीचा चेहरा पडला. आजोबा म्हणाले, ‘तुमची शाळा हळूहळू सुरू करायचा ...

- गौरी पटवर्धन

शाळेच्या बाबतीत काहीतरी निरोप आल्याचं ऐकल्यावर सिद्धीचा चेहरा पडला. आजोबा म्हणाले, ‘तुमची शाळा हळूहळू सुरू करायचा प्लॅन आहे. बाकीच्या बऱ्याच शाळा सुरू झाल्या आहेत.’‘हो, ते तर मलापण माहिती आहे.’- सिद्धीला अजिबात ती आयडिया आवडलेली नव्हती; पण कधी ना कधी शाळा सुरू होणार हे तिलाही माहिती होतं. म्हणजे पुन्हा न आवडणा-या विषयांचा अभ्यास करायचा. तिला ते विषय आवडायचे नाहीत, त्यामुळे तिचं वर्गात लक्ष नसायचं. त्यामुळे ती वर्गात कधीच उत्तरं द्यायची नाही. शिक्षक तिचं कौतुक करायचे नाहीत. त्यामुळे तिला अजूनच शाळेत जावंसं वाटायचं नाही. हे सगळं गेलं एक वर्ष बिनसत होतं. त्यातून काय मार्ग काढावा हे घरात कोणाच्याच लक्षात येत नव्हतं; पण आता आजोबांच्या एकदम लक्षात आलं, की आता निर्माण झालेली परिस्थितीही सिद्धीला यातून बाहेर काढण्याची सुवर्णसंधी आहे. ते म्हणाले,‘पण तुला एक गोष्ट माहितेय का? आता तुमची नेहमीसारखी शाळा नसेल.’‘माहितेय हो आजोबा. डिजिटल स्कूल असेल; पण त्याच्यामुळे काय फरक पडेल? तेच विषय आणि तेच टीचर्स असणार ना?’‘नाही ना, मी तेच तर सांगतोय. यावेळी शाळेत तुलापण मजा येईल.’‘कशी काय?’‘कारण यावेळी शाळा सुरू होईल तेव्हा अशी एक गोष्ट असणार आहे की, जी इतर कोणालाही येत नाही आणि तुला येते.’‘शक्यच नाही. असं काही नाहीच आहे.’‘आहे गं!’‘काय?’‘आॅनलाईन शाळा चालविणं.’‘म्हणजे???’‘अगं, आता मी रोज बातम्या वाचतो ना, त्यात सर्व म्हणतात, आॅनलाईन शाळा चालविताना तांत्रिक अडचणी येतात. त्या सोडविण्यातच बराच वेळ जातो व मग शिकविणं होत नाही.’‘का पण? ते सोप्पं असतं एकदम.’‘पण ते तुमच्या टीचर्सना येत नाही. कारण त्यांनी ते कधी केलं नाहीये.’‘मग मी शिकवेन ना!’-सिद्धी एकदम उत्साहाने म्हणाली. आणि खरंच, त्यांची शाळा सुरू झाल्यावर सिद्धी सर्व शिक्षकांची लाडकी विद्यार्थिनी ठरली. कारण अभ्यासू मुलं कोणीही असली, तरी शिक्षक सिद्धीच्या मदतीनेच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत होते ना!पालक-शिक्षक-शाळा आणि मुलं यापैकी तुम्ही कुणी आहात का? - असाल तर ‘आॅनलाईन शिक्षणा’च्या तात्कालिक अपरिहार्यतेतून तरून जाण्यासाठी शाळांनी शोधलेले मार्ग, शिक्षकांनी केलेले प्रयोग, आई-बाबांनी शोधलेले पर्याय ‘ऊर्जा’कडे जरूर पाठवा. निवडक मजकुराला या पानावर प्रसिद्धी दिली जाईल.उपक्रमशील शिक्षक आणि पालकांना ‘युनिसेफ’ या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून विशेष प्रमाणपत्राने गौरविण्यात येणार आहे. ‘ऊर्जा’कडे प्रसिद्धीसाठी आलेल्या मजकुरातून शिक्षक आणि पालकांच्या बक्षीसपात्र लेखांची निवड एक तज्ज्ञ समिती करेल.युनिकोडमध्ये टाईप केलेल्या लेखांची ओपन फाईल urja@lokmat.com  या पत्त्यावर ईमेल करा. संपर्कासाठी फोन नंबर जरूर द्या.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी