शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

विद्यार्थी, पालकांना दिलासा! शाळा साेडल्याच्या दाखल्याशिवायही दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणे झाले शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 7:57 AM

शैक्षणिक संस्था अनेकदा शुल्क न भरल्याने, पूर्ण शुल्क भरल्याशिवाय टीसी देण्यास टाळाटाळ करतात. दुसरीकडे शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय, अनुदानित शाळेत प्रवेश मिळत नाही, असे प्रकार निदर्शनास आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :आता एाका शाळेतून दुसऱ्या शाळेत एखाद्या विद्यार्थ्याला नववी, दहावीत प्रवेश घ्यायचा असेल तर तो शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय (टीसी) मिळू शकेल. विद्यार्थ्यांच्या आधीच्या संबंधित शैक्षणिक संस्थेने शाळा सोडल्याचा दाखला(टीसी) देण्यास अडवणूक केली किंवा दिला नाही तरी विद्यार्थ्याला वयानुसार दुसऱ्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळेल. 

शिक्षण विभागाने जारी केलेल्या या निर्णयामुळे ज्यांनी लॉकडाऊन काळात आर्थिक स्थिती खालावल्याने खासगी संस्थांमधून अनुदानित किंवा शासकीय संस्थेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला, अशा विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळेल. 

शैक्षणिक संस्था अनेकदा शुल्क न भरल्याने, पूर्ण शुल्क भरल्याशिवाय टीसी देण्यास टाळाटाळ करतात. दुसरीकडे शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय, अनुदानित शाळेत प्रवेश मिळत नाही, असे प्रकार निदर्शनास आले आहेत. अशावेळी हे विद्यार्थी शाळाबाह्य होतात आणि शिक्षण प्रवाहापासून दूर फेकले जातात. केवळ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नसल्यामुळे प्रवेश नाकारणे हे शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणारे आहे. त्यामुळे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र उशिरा दिले जात असेल व त्यामुळे प्रवेश नाकारला असेल, अशांना नवीन शाळांनी शिक्षण हक्क कायद्यानुसार वयानुरूप प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने  जारी केला. विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य मानावे, असे निर्णयात नमूद आहे.

 ...अन्यथा शाळा, मुख्याध्यापकांवर कारवाई!प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर लक्ष ठेवण्यात येइल. ज्या शैक्षणिक संस्था किंवा शाळा विद्यार्थ्यांना टीसीशिवाय प्रवेश नाकारेल किंवा प्रवेश नाकारल्याने एखाद्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया गेले तर अशा शाळेवर आणि तेथील मुख्याध्यापकांवर कडक कारवाईचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

टॅग्स :Schoolशाळा