शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

ऑनलाइन शिक्षण पद्धतीत अनंत अडचणी; इंटरनेटच्या समस्येमुळे अस्पष्ट आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:11 AM

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

सध्याच्या कोरोना संकटात घरात बसून कंटाळा आला होता. आपण शाळेतही जाऊ शकत नाही. त्याचवेळी आॅनलाइन माध्यमातून शिक्षण सुरू झाले ही चांगली बाब आहे. ‘झूम अ‍ॅप’वर सध्या आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात शाळेत शिकण्याची जी मजा आहे ती आॅनलाइन शिक्षणात नाही. बऱ्याच मर्यादा येतात. शिकवताना काही कळले नाही तर अवघड जाते. शाळेत थेट शिक्षकांशी चर्चा करता येत होती. आॅनलाइन वर्गात सविस्तर चर्चा करता येत नाही.  - शर्वरी पगारे, विद्यार्थिनी, इयत्ता सातवी, डोंबिवली पूर्व

सध्याच्या कोरोना संकटात घरात बसून कंटाळा आला होता. आपण शाळेतही जाऊ शकत नाही. त्याचवेळी आॅनलाइन माध्यमातून शिक्षण सुरू झाले ही चांगली बाब आहे. ‘झूम अ‍ॅप’वर सध्या आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात शाळेत शिकण्याची जी मजा आहे ती आॅनलाइन शिक्षणात नाही. बºयाच मर्यादा येतात. शिकवताना काही कळले नाही तर अवघड जाते. शाळेत थेट शिक्षकांशी चर्चा करता येत होती. आॅनलाइन वर्गात सविस्तर चर्चा करता येत नाही.  - शर्वरी पगारे, विद्यार्थिनी, इयत्ता सातवी, डोंबिवली पूर्व

सध्या ‘मायक्रोसॉफ्ट इन अ‍ॅप’वर आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष शाळा कधीही चांगली. शाळेत खेळायला मिळते, त्याचबरोबर अन्य उपक्रमांमध्ये सहभागी होता येते. आॅनलाइन शिक्षण ही सध्याची गरज असली तरी नेटवर्क प्रॉब्लेममुळेही काही वेळेला त्रासाला सामोरे जावे लागते. शाळेत शिकताना नाही समजले तर थेट शिक्षकांना विचारता येत होते. आॅनलाइन शिक्षणाला वेळेचे बंधन असल्याने शंकेचे निरसन करता येत नाही.- पार्थ म्हात्रे, विद्यार्थी, इयत्ता आठवी, डोंबिवली पश्चिम

शाळेने सुरू केलेले आॅनलाइन वर्ग समजण्यापलीकडे आहेत. सकाळी शिकवणी वर्ग सुरू झाल्यावर मोबाइलवर अस्पष्ट दिसणे, आवाज न येणे, वारंवार नेट संपर्क तुटणे आदी कारणांमुळे आॅनलाइन शिक्षणाचा आताच कंटाळा आला. शाळेत व शिकवणीला आॅनलाइन वर्गात शिकवलेल्या भागावर परीक्षा घेतली जाते. शिक्षक मेहनत घेत असले तरी, शाळेतील शिक्षणाची यामध्ये मजा येत नाही. घराबाहेर कोरोनाची भीती आहे. मात्र यावर शाळेने तोडगा काढून शाळा सुरू करावी. आॅनलाइन शिक्षणाचा गोंधळ थांबवावा. - भूमिका कदम, विद्यार्थिनी, उल्हासनगर

संपूर्ण देशात आॅनलाइन पद्धतीने शिक्षणाला सुरुवात झाली आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर आॅनलाइन शिक्षणापेक्षा मला शाळेतच जायला आवडेल. कारण आॅनलाइन शिक्षणात शाळेतील आनंद, जिव्हाळा नाही. मैत्रिणींबरोबर संवाद नाही. काही अडचण असल्यास शिक्षकांना विचारण्याची सोय नाही. आपल्या आॅनलाइन शिक्षणामुळे घरातील इतर मंडळींनासुद्धा त्रास होतो आणि महत्त्वाचे म्हणजे नेटवर्कची अडचण. हे सर्व पाहता शाळेत जाऊनच शिकायला मला खूपच आवडेल.- वेदिका आंब्रे, इयत्ता सातवी, सेंट जॉन हायस्कूल

आॅनलाइन शिक्षण मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी शाळेने ‘झूम अ‍ॅप’वर वर्ग सुरु केले. पण आॅनलाइन शिक्षण घेताना नेटवर्कची अडचण येते. कधी लाइट गेली तर वायफाय कनेक्शन बंद होते, तर कधी मोबाइलचा डेटा संपतो. डोळे दुखणे, जळजळणे, मानेवर ताण असे शारीरिक त्रास आॅनलाइन शिक्षणाने होतात ते वेगळेच. मुलांचेही लक्ष अभ्यासावर नसते. त्यामुळे मला शाळेचे शिक्षण योग्य वाटते.- श्रेया आडवळे, इयत्ता दहावी, सरस्वती एज्युकेशन सोसायटी, ठाणे

सध्या गुगल क्लासरूमद्वारे वर्ग काही तास चालतात. प्रत्यक्ष शाळा आणि आॅनलाइन शाळा यात खूप फरक जाणवतो. घरात बसून वर्ग होत असला तरी तांत्रिक अडथळे असतात ते सोडवता सोडवता अभ्यासावरील लक्ष विचलित होते. वर्गात मित्र-मैत्रिणींच्या सोबतीने अभ्यास होतो. इथे मित्रमैत्रिणी स्क्रीनवर दिसतात, पण सोबत किंवा आजूबाजूला नसतात. आॅनलाइन क्लासमुळे घरात बसून अभ्यास होत असला तरी शाळेत, वर्गात जी मजा असते ती आॅनलाइन क्लासमध्ये येत नाही.- अमोघ नेहते, विद्यार्थी

आॅनलाइन शिक्षण खूप आवडते. फक्त शाळेच्या जागी आपले घर असते. बाकी शिक्षक, मित्रमैत्रिणी तर आपल्या समोर असतात. उलट याआधी तब्येत ठीक नाही किंवा काही महत्त्वाच्या कामामुळे शाळेला सुटी होत असे आणि अभ्यास बुडत असे, पण हा आॅनलाइनचा पर्याय या सगळ्यावर उपाय ठरणारा आहे. कोरोनानंतरच्या जगात हा पर्याय शिक्षणाकरिता वापरता येऊ शकतो. यामुळे आम्हा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. घरीच सुरक्षित राहून शिक्षकांकडून अभ्यासाचे धडे मिळत आहेत.- रंजन चौरे, विद्यार्थी

शाळा तर खूप हवीहवीशी वाटते, पण शाळेची ही आठवण आॅनलाइन वर्गाद्वारे भरून निघतेय. आॅनलाइन शाळेत शिक्षक, वर्गमित्रांचा प्रत्यक्ष सहवास मिळत नसला तरी अभ्यासाचे मात्र कुठेही अडत नाही. फक्त मित्रांशी चर्चा करता येत नाही. हातातील मोबाइलचा वापर या आॅनलाइन क्लासमुळे चांगल्या कामासाठी होत आहे. परंतु यामुळे दोन-अडीच तास कॉम्प्युटर किंवा मोबाइलसमोर बसावे लागत असल्याने डोळ्यांवर ताण येतो. तसेच कधीकधी नेटवर्क प्रॉब्लेममुळे आवाज व्यवस्थित येत नाही.- निमेश चव्हाण, विद्यार्थी

शाळेच्या आॅनलाइन अ‍ॅपवरून आमचे सध्या क्लास सुरू आहेत. या क्लासमध्ये आजूबाजूला वर्गातील इतर मुलांचा गोंगाट नसतो. शिक्षकही समोर असतात, त्यांच्या सूचना मिळतात. आणि सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात घरात नुसतेच बसून राहणे, शाळेचे वर्ग नसणे किंवा अभ्यास नसणे यापेक्षा आॅनलाइन अभ्यास होतो आहे, याचे समाधान आहे. - सायली देबाजे, विद्यार्थिनी

मला शाळा हवी आहे. आॅनलाइन शिक्षण हे वेबेक्स मिट या माध्यमातून सुरू आहे. प्रत्यक्ष शाळा व आॅनलाइन शिक्षणामध्ये खूप फरक जाणवतो. प्रत्यक्ष शाळेत शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखतो. कुणी अभ्यास करत नसेल, दंगामस्ती करीत असेल तर त्याला मारू शकतात. आॅनलाइन शिक्षणामध्ये आपल्याला शिक्षक ना ओरडू शकतात ना मारू शकतात. हा एक फायदा मला आवडला. शाळेत आपण मस्ती करू शकतो. गप्पा मारु शकतो. आॅनलाइन शिक्षणात आपण फक्त एकमेकांना बघू शकतो. यामुळे मला प्रत्यक्ष शाळा हवी आहे.- आयुष सुर्वे, इयत्ता दहावी, शिवसमर्थ विद्यालय, ठाणे

आॅनलाइन शिक्षण नको तर शाळा हवी. कारण शाळेत सगळे मित्र खेळीमेळीने शिकू शकतात. जर नाही समजले तर एकमेकांना, शिक्षकांना विचारू शकतात. आॅनलाइन शिक्षण घेताना आपण एकटे असतो आपल्याला समजावून सांगायला कोणी नसते. मुलांना जर समजले नाही तर त्यांची पुढील अभ्यासाची इच्छा राहत नाही. त्यामुळे शाळा हवी आॅनलाइन शिक्षण नको. - विनायक गिजे, इयत्ता आठवी, आर. जे. ठाकूर विद्यालय

सध्या माझे शिक्षण आॅनलाइन पद्धतीने सुरु आहे. आॅनलाइन शिक्षणामुळे मला मोबाइलमधील बºयाच नवीन गोष्टी अनुभवता आल्या. झूम अ‍ॅपमुळे आम्हा सर्व ८० विद्यार्थ्यांना एकाच वेळेस शिकायची संधी मिळते. सध्या पावसाचे दिवस असतानाही शाळेत उशिरा पोहोचण्याची वा पावसामुळे पुस्तके भिजण्याची भीती नाही. शाळा अगदी एका ‘टच’ वर उपलब्ध झाली आहे. हे सर्व जरी असले तरी शाळेत बसून शिकायचा अनुभव हा काही औरच असतो. शिक्षक ओरडण्याची किंवा गृहपाठ घरी विसरण्याची चिंता वाटत नसली तरीही शाळाच हवीहवीशी वाटतेय. - प्रतीक पाईकराव, इयत्ता सातवी,मो.ह. विद्यालय.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा