शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

APAAR: राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 08:53 IST

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित; ‘आधार’च्या तांत्रिक अडचणीचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकाशी निगडित अपार आयडी तयार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, विविध अडचणींमुळे अद्याप राज्यभरातील तब्बल १ लाख १९ हजार विद्यार्थ्यांचे अपार आयडी फेल असल्याचे अपार स्टेटस अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे शासकीय शिष्यवृत्ती मिळण्यात विद्यार्थ्यांना अडचण येत असल्याचे शिक्षक, मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

शिक्षण विभागाकडील  माहितीनुसार, राज्यात एकूण २ कोटी ३२ लाख ४ हजार ४१७ विद्यार्थी असून, यापैकी १ कोटी ६३ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट (८०.३७ टक्के) झाले आहेत. पण उर्वरित सुमारे १ लाख १९ हजार विद्यार्थ्यांचे अपार आयडी फेल झाले आहेत. आधार नोंदणीतील तांत्रिक अडचणींमुळे अपार आयडी प्रक्रियेत अडथळे येत आहेत. यावर उपाय म्हणून शाळांनी दिलेले बोनाफाईड प्रमाणपत्र ग्राह्य धरावे, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना शैक्षणिक  शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागेल, असे शिक्षक, मुख्याध्यापकांना वाटत आहे. मात्र, अपार आयडी सक्तीचा नाही. काही अडचण असेल तर दूर करू. अपार आयडीमुळे शैक्षणिक कामगिरीची नोंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्था बदलणे, अभ्यासक्रम निवडणे, पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण करणे सोपे होते, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

अपार आयडीमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. पालकांचे मोबाइल नंबर बदलल्याने ओटीपी मिळत नाही. नावांतील चुकांमुळेही समस्या येत आहे. त्यामुळे या अडचणींकडे लक्ष द्यावे, असे मुख्याध्यापक संघटनाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले म्हणाले. अपार आयडीची नोंद स्वेच्छेने पालकांनी करायची आहे. कुठे अडचण आली असेल, त्यावर शिक्षण विभाग उपाय करेल. मात्र ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे, असे शिक्षण विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी म्हटले. 

१ सप्टेंबरपर्यंत अपार स्थितीइन ॲक्टिव्ह: १६,२८६ नॉट अप्लाईड: ३८ लाख ५१ हजारजनरेटेड पासआऊट: १ कोटी १० लाख ९३ हजार

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र