आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीचे निकाल जाहीर; 'असा' पाहा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 03:40 PM2021-07-24T15:40:02+5:302021-07-24T15:49:54+5:30

संकेतस्थळासोबतच एसएमएसच्या माध्यमातूनही पाहता येणार निकाल

ICSE 10th ISC 12th Result 2021 CISCE Results Declared At Results cisce org | आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीचे निकाल जाहीर; 'असा' पाहा निकाल

आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीचे निकाल जाहीर; 'असा' पाहा निकाल

googlenewsNext

नवी दिल्ली: आयसीएसई २०२१ आणि आयएससी २०२१ चा निकाल जाहीर झाला आहे. काऊन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं (सीआयएससीई) आयसीएसई (इयत्ता दहावी) आणि आयएससीचा (इयत्ता बारावी) निकालाची तारीख काल घोषित केली. आज दुपारी ३ वाजता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला. सीआयएससीईच्या संकेतस्थळावर (cisce.org आणि results.cisce.org) जाऊन विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकतात. विद्यार्थी एसएमएसच्या माध्यमातूनही त्यांचा निकाल पाहू शकतात.

कोरोना संकटामुळे आयसीएसई आणि आयएससीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एसएमएसवर पाहायचा असल्यास त्यांनी त्यांचा यूनिक आयडी 09248082883 क्रमांकावर पाठवावा. ICSE/ISC (Unique ID) या फॉरमॅटमध्ये एमएसएस केल्यावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एमएमएसवर पाहता येईल. 

आयएससी २०२१ चा विभागवार निकाल-
उत्तर- ९९.७५ टक्के
पूर्व- ९९.७० टक्के
पश्चिम- ९९.९१ टक्के
दक्षिण- ९९.९१ टक्के
परदेश- १०० टक्के

आयसीएसई २०२१ चा विभागवार निकाल-
उत्तर- ९९.९७ टक्के
पूर्व- ९९.९८ टक्के
पश्चिम- ९९.९९ टक्के
दक्षिण- १०० टक्के
परदेश- १०० टक्के

Web Title: ICSE 10th ISC 12th Result 2021 CISCE Results Declared At Results cisce org

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.