शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘वर्दीवाले गुरुजी’ झाडाखाली भरवतात खुली शाळा, पोलीस अधिकाऱ्याचे अनाथ मुलांना अनोखे विद्यादान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 06:13 IST

Police Officer: अयोध्येत शरयू नदीच्या घाटावर एका झाडाखाली काही मुले पाटी पेन्सिल घेऊन बसली आहेत. त्यांना एक पोलीस उपनिरीक्षक इंग्रजी, गणित, हिंदी हे विषय शिकवतानाचे दृश्य सध्या नेहमी दिसते.

अयोध्या : अयोध्येत शरयू नदीच्या घाटावर एका झाडाखाली काही मुले पाटी पेन्सिल घेऊन बसली आहेत. त्यांना एक पोलीस उपनिरीक्षक इंग्रजी, गणित, हिंदी हे विषय शिकवतानाचे दृश्य सध्या नेहमी दिसते. कार्यालयीन काम संपल्यावर पोलीस उपनिरीक्षक रणजीत यादव विद्यादानाचे समाजसेवी काम करतात. अयोध्येतील अनाथ मुलांना साक्षर करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. त्यामुळे यादव यांना वर्दीवाले गुरुजी म्हणून ओळखले जाते.

उत्तर प्रदेशमधील २०१५ च्या तुकडीचे पोलीस उपनिरीक्षक असलेले रणजीत यादव यांची नियुक्ती अयोध्या येथे पोलीस उपमहानिरीक्षकांच्या कार्यालयात झाली आहे. यादव यांच्याकडे जी मुले शिकतात, त्यात महक ही १२ वर्षे वयाची अनाथ मुलगीही आहे. तिने सांगितले की, पोलीस अधिकारी असलेले रणजीत यादव मला मारतील अशी पूर्वी भीती वाटत असे. पण आता त्यांच्याकडून विविध विषय शिकताना छान वाटते.  यादव यांना अनेक मुले शरयू किनारी भीक मागताना आढळली. त्यांच्या पालकांशी त्यांनी संवाद साधला. मुलांना माझ्याकडे  शिकायला पाठवा, अशी यादव यांनी केलेली विनंती पालकांनी मान्य  केली.  (वृत्तसंस्था)

अपना स्कूलमध्ये सध्या ६० विद्यार्थीरणजीत यादव यांनी सांगितले की, अपना स्कूल या उपक्रमाला सप्टेंबर २०२१ मध्ये सुरुवात झाली. प्रारंभी शरयू नदीच्या घाटांवर राहाणारे लोक मुलांना अपना स्कूलमध्ये पाठविण्यास आधी फार उत्सुक नव्हते. पण नंतर या मुलांनाच शिक्षणाची गोडी लागली. ही शाळा दररोज सकाळी सात ते नऊ या वेळेत भरते. सध्या या शाळेत ६० मुले शिकत आहेत. पोलीस सेवेतील कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन फावल्या वेळात मी विद्यादानाचे काम करीत आहे, असे रणजीत यादव यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस