शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क कपातीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 07:32 IST

विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्थांचा करणार अभ्यास.

ठळक मुद्देविद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्थांचा करणार अभ्यास

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना, पालक विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून शुल्क कपात करण्याबाबत शासनाकडे वारंवार मागणी करण्यात येत आहे. त्याचवेळी शैक्षणिक संस्थांकडूनही शुल्क कपात न करण्यासाठी निवेदने देण्यात येत आहेत. यातून सुवर्णमध्य काढण्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव चिंतामणी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आपल्या शिफारशींचा अहवाल पुढील एका महिन्यात देणे अपेक्षित आहे.

या समितीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ आणि मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांचा समावेश आहे. ही समिती शैक्षणिक संस्थांना झळ न बसता महाविद्यालयांचे शुल्क कसे कमी करता येईल, याचा अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे आणि त्याची अंमलबजावणी राज्यात होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था यांच्याकडून त्यांच्या यावर्षीच्या खर्चाच्या तपशिलाची माहिती घेण्यात येईल.

तरीही तक्रारीराज्यातील अनुदानित महाविद्यालये तसेच विद्यापीठ विभागातील सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी विविध प्रकारचे शुल्क आकारण्यात येते. मात्र, ज्या सुविधांवर खर्च झालेला नाही, त्यावरील शुल्क हे पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. तरीही अनेक महाविद्यालयांकडून ऑनलाईन शिक्षण किंवा इतर छोट्या-मोठ्या खर्चांसाठी विद्यार्थ्यांकडे तगादा लावण्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

टॅग्स :SchoolशाळाMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षण