शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Education News: येथे शिकविले जातात हुंडा घेण्याचे फायदे! नर्सिंगचे वादग्रस्त पाठ्यपुस्तक; नेटकऱ्यांकडून टीकेची झोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 08:11 IST

Education News: हुंडा घेण्याचे काय फायदे आहेत हे नर्सिंगच्या अभ्यासक्रमात शिकविले जातात हे ऐकून कोणीही चक्रावून जाईल, पण ती वस्तुस्थिती आहे. या अभ्यासक्रमात समाजशास्त्र या विषयासाठी टी. के. इंद्राणी लिखित पाठ्यपुस्तकामध्ये एका पानावर हुंड्याबद्दलची सर्व माहिती आहे.

नवी दिल्ली : हुंडा घेण्याचे काय फायदे आहेत हे नर्सिंगच्या अभ्यासक्रमात शिकविले जातात हे ऐकून कोणीही चक्रावून जाईल, पण ती वस्तुस्थिती आहे. या अभ्यासक्रमात समाजशास्त्र या विषयासाठी टी. के. इंद्राणी लिखित पाठ्यपुस्तकामध्ये एका पानावर हुंड्याबद्दलची सर्व माहिती आहे. हुंड्यामुळे नवीन घर फर्निचर, रेफ्रिजरेटर वगैरे उपकरणांनी सुसज्ज करता येते, असेही या पुस्तकात म्हटले आहे.

या पाठपुस्तकात हुंड्याच्या फायद्यांविषयी ज्या पानावर माहिती दिली आहे, ते पान सोशल मीडियावर झळकले आहे. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही हे पान आपल्या सोशल मीडिया खात्यावर शेअर केले आहे. अशा प्रकारची पाठ्यपुस्तके अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात यावीत, अशी मागणी चतुर्वेदी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे. इंडियन नर्सिंग कौन्सिलने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिण्यात आल्याचा उल्लेख त्याच्या कव्हरवर आहे. मुलींना हुंड्यामध्ये पालकांच्या मालमत्तेतील वाटा दिला जातो. हुंडा प्रथेचा हा फायदा आहे असे या पाठ्यपुस्तकात म्हटले आहे.

हुंड्याच्या अन्यायकारक प्रथेवर देशात कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. हुंडा मिळण्यासाठी महिलांना छळले जाते, प्रसंगी त्यांची हत्या केली जाते. हुंड्याच्या मागणीला कंटाळून काही महिला आत्महत्याही करतात. अशा गोष्टी घडत असताना हुंडापद्धतीचे उदात्तीकरण करणे अतिशय चुकीचे आहे, असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले. (वृत्तसंस्था)

‘कुरूप मुलींचे विवाह होऊ शकतात हुंड्यामुळे!’‘टेक्स्टबुक ऑफ सोशिऑलॉजी फॉर नर्सेस’ असे शीर्षक असलेल्या पाठ्यपुस्तकात हुंड्याचे फायदे या शीर्षकाखाली वादग्रस्त विधाने केली आहेत. मोठा हुुंडा देण्याची तयारी असल्यास कुरूप मुलीचा विवाह सुस्वरुप किंवा कुरूप मुलाशी होऊ शकतो असे त्या पुस्तकात म्हटले आहे. हुंडा पद्धतीचा एक अप्रत्यक्ष फायदा म्हणजे पालक आपल्या मुलींना उच्च शिक्षण देऊ लागले आहेत. मुली जास्त शिकलेल्या  असल्या म्हणजे कमी हुंडा द्यावा लागतो असे विधानही या पाठ्यपुस्तकात आहे.

 

टॅग्स :dowryहुंडाEducationशिक्षणIndiaभारतSocialसामाजिक