शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

Education: शिक्षकांनी शिकवणे महत्त्वाचे, की मुख्यालयी राहणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 05:37 IST

Education: शिक्षकांनी वेळेवर येणे, अध्यापन करणे महत्त्वाचे, की मुख्यालयी राहणे? त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. मुख्यालयी राहत नाही म्हणून वेळेवर येत नाही, गुणवत्ताच नाही हे विधान शिक्षकांच्या मानसिकेला धक्का देणारे आहे.

- शिवाजी काकडे, सहायक शिक्षक, लालवण निधोना, जि. औरंगाबादमहाराष्ट्र कायदेमंडळाचे सन्माननीय सदस्य प्रशांत बंब यांनी शिक्षक मुख्यालयात उपस्थित राहात नाहीत, याबाबत प्रश्न केला आहे. माझ्या लहानपणी खूप बैल असायचे. आज शेतकरी बैल पाळत नाही म्हणून तो शेतीत काम करत नाही; असा दावा केला तर तो चुकीचा ठरेल ना? कामाचे स्वरूप बदलले, काम कमी झाले नाही. शिक्षकाने शाळेच्या गावात राहावे, याबाबतचा शासन निर्णय झाला तेव्हाच्या दळणवळण सुविधा व आजच्या सुविधा यात फरक आहे. काळाप्रमाणे परिस्थिती बदलणारच! शिक्षकांनी वेळेवर येणे, अध्यापन करणे महत्त्वाचे, की मुख्यालयी राहणे? त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. मुख्यालयी राहत नाही म्हणून वेळेवर येत नाही, गुणवत्ताच नाही हे विधान शिक्षकांच्या मानसिकेला धक्का देणारे आहे. अपवाद असतीलच. परंतु सरसकट सर्वांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य होणार नाही. आजही ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत. आपला मुलगा कितवीत आहे, हे माहीत नसणाऱ्यांच्या मुलांना आम्ही आई - वडिलांप्रमाणे जपतो, शिकवतो. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश नाही मिळत तेंव्हा पदरमोड करणारेही अनेक शिक्षक आहेत.ग्रामीण भागातील ८० टक्के गावातील ८० टक्के लोकांनी स्वतःचे गाव सोडून शेत, शेतालगत घरे बांधली. जागेच्या अडचणी, पाण्याच्या अडचणी अनेक कारणे आहेत. मला स्वतःला लालवण गावात खोली मिळाली नाही. काही दिवस मी बाजूच्या गावाला राहिलो. तिथेही तीच अडचण! शेवटी ग्रामपंचायतीच्या खोलीत आम्ही शिक्षक राहिलो. भाड्याने देता येतील, अशी अधिकची घरे बांधण्याइतका ग्रामीण भागात पैसा नाही. मी जन्मापासून आजपर्यंत गावात राहतो. पंढरपुराला पायी गेले तरच विठ्ठल पावतो, अशीही धारणा आहे. परंतु गाडीचा, विमानाचा वापर करून जाणाराही भाविकच ना! शिक्षणाच्या या वारीत कुणी मुख्यालयी राहील, तर कुणी अप-डाऊन करत विठ्ठलाला (विद्यार्थ्याला) गुणवत्तापूर्ण शिक्षण देत राहील, एवढे नक्की! 

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण