शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाला वाहिलेल्या स्वतंत्र वाहिनीचा विचार करा, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 07:20 IST

independent education channel : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विशेष विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी केंद्र सरकारच्या सल्ल्याने स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरू करण्याचा विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी केली

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विशेष विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी केंद्र सरकारच्या सल्ल्याने स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरू करण्याचा विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी केली.सदोष नेटवर्कमुळे किंवा मोबाईल विकत घेण्यास पैसे नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणास मुकत आहेत, असे निरीक्षण मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने नोंदविले.मी नागपूर व औरंगाबादला प्रवास करत असताना मला मोबाईल नेटवर्क मिळत नाही. मग ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क मिळत असेल, अशी तुम्ही अपेक्षा कशी करता? राज्य सरकारने केवळ मोबाईल नेटवर्कवर अवलंबून राहू नये, असे मुख्य न्या. दत्ता यांनी म्हटले.केंद्र सरकारशी चर्चा करून स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरू करण्याचा विचार करा, असा सल्लाही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.'चित्रपटासाठी आपल्याकडे १०० वाहिन्या आहेत. पण शिक्षणासाठी एक वाहिनी नाही? प्रत्येकाच्या घरात अगदी ग्रामीण भागातही टेलिव्हिजन सेट आहे. शिक्षण पाठीमागे राहता कामा नये. ऑनलाईन शिक्षणपद्धती शहरात चालेल, पण ग्रामीण भागात स्मार्टफोन विकत घेण्याची ताकद सगळ्यांमध्येच नाही. तुम्ही गूगल मीट, झूम ॲपद्वारे ऑनलाईन वर्ग भरवता. पण मोबाईल नेटवर्क नसेल तर काय करणार? त्यामुळे स्वतंत्र वाहिनीची आवश्यकता आहे. केवळ विशेष विद्यार्थ्यांसाठी नाही,  तर ज्यांच्याकडे ऑनलाईन वर्गात बसण्यासाठी सुविधा नाहीत, त्यांच्यासाठीही ही सुविधा हवी’, असे न्यायालयाने म्हटले.जसा शेतकऱ्यांसाठी दूरदर्शनवर एक तास ‘आमची माती, आमची माणसं' हा कार्यक्रम यायचा, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठीही कार्यक्रम तयार करा. मग मोबाईल फोनची आवश्यकता नाही. तसेच रेडिओवरही शिक्षणासंदर्भात टॉक शो घेऊ शकतात, अशा सूचना न्यायालयाने सरकारला केल्या. या याचिकेवरील पुढील सुनावणी ५ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.

एनजीओने केली होती याचिका कोरोनाच्या काळात विशेष विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी येत असलेल्या अडचणींबाबत अनाम प्रेम या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला वरील सूचना केल्या.

टॅग्स :Educationशिक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMumbai High Courtमुंबई हायकोर्ट