शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हजेरीत ४५ हजार शाळांची पिछाडी; नोंदणीची गती वाढविण्याचे शिक्षण आयुक्तांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 08:14 IST

राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची माहिती एकाच डिजिटल पटलावर नोंदवण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने २०२३ पासून ‘विद्या समीक्षा केंद्र’ सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हजेरीत ४५ हजार शाळा मागे असल्याचे समोर आले आहे. शिक्षण विभागाने  राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या रोजच्या हजेरीसाठी स्मार्ट चॅटबोट उपलब्ध करून दिला आहे. तरीही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी वेगाने होत नसून, नोंदणीची गती वाढविण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.  दरम्यान, ऑनलाईन माहिती भरल्यावरही  रोज अर्जाच्या हार्ड कॉपी तीन प्रति शिक्षण विभाग मागविणे थांबवणार आहे का, असा सवाल शिक्षकांनी केला आहे. 

राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची माहिती एकाच डिजिटल पटलावर नोंदवण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने २०२३ पासून ‘विद्या समीक्षा केंद्र’ सुरू केले आहे. या मंचावर सरकारी, तसेच खासगी शाळांची नोंदणी करून इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची रोजची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, यंदा सप्टेंबरअखेरपर्यंतही नोंदणीची गती मंद असल्याचे शिक्षण आयुक्तांनी कनिष्ठ अधिकारी व शाळांना कडक निर्देश जारी केले.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या सूचनाक्षेत्रीय अधिकाऱ्यांनी याबाबत नियमित आढावा घ्यावा. राष्ट्रीय कार्यक्षमता प्रतवारी अहवालामध्ये विद्यार्थी व शिक्षकांच्या डिजिटल नोंदणीसाठी स्वतंत्र गुणांकन दिले जाते.त्यामुळेच   क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या रोजच्या उपस्थितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

शाळांना प्रगती पुस्तकावर उपस्थिती नोंद करण्यासाठी सहामाही आणि वार्षिक अहवाल मिळणार किंवा नाही. हे होणार नसेल तर दुहेरी काम करावेच लागेल. मग शिक्षकांचे काम सोपे कसे होणार.महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष मुख्याध्यापक संघटना.

English
हिंदी सारांश
Web Title : 45,000 Schools Lag in Student Attendance; Education Commissioner Orders Speed-Up

Web Summary : 45,000 schools are behind in daily student attendance registration despite a smart chatbot. The Education Commissioner has directed schools to accelerate online registration. Teachers question continued hard copy requests despite online submissions.
टॅग्स :Schoolशाळा