शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे तर बारावीची २३ एप्रिल ते २१ मे; वर्षा गायकवाड यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 02:35 IST

दहावी, बारावीच्या ऑफलाइन परीक्षेसाठी मिळणार वाढीव वेळ, सकाळी साडेदहा वाजता सुरू हाेणार परीक्षा

मुंबई : इयत्‍ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने म्‍हणजे लेखी  होणार आहेत. या लेखी परीक्षेसाठी वेळही वाढवून देण्यात आली असून सकाळी ११ ऐवजी परीक्षा साडेदहा वाजता सुरू होणार आहे. लेखी परीक्षा या त्‍याच शाळा अथवा कनिष्‍ठ महाविद्यालयांत घेण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 

दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे तर बारावीची २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होईल. या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा विचार आम्ही केला होता. मात्र राज्‍याची भौगोलिक परिस्‍थिती तसेच नेटवर्कची परिस्थिती लक्षात घेता परीक्षा ऑफलाइन घेण्याचे ठरले आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या त्‍याच शाळेत अथवा कनिष्‍ठ महाविद्यालयांत या परीक्षा घेण्यात येतील. अपवादात्‍मक परिस्‍थितीत वर्ग खोल्‍या कमी पडल्‍यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रात परीक्षा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

३ तासांच्या पेपरसाठी अर्धा तास जादा वेळकोरोना लॉकडाउन काळात विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. त्‍यामुळे यंदा परीक्षेची वेळही वाढविण्यात आली आहे. दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तासांची वेळ देण्यात येते. यंदा त्‍यासाठी ३० मिनिटांचा वाढीव वेळ असेल, तर ४० व ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रत्‍येक तासामागे २० मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात येणार आहे.

बारावी सायन्सची ५-६ प्रात्‍यक्षिकांवर परीक्षाबारावीच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्‍यक्षिक परीक्षा २२ मे ते १० जून या कालावधीत होतील. बारावीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्‍यक्षिके कमी करण्यात आली असून ५ व ६ प्रात्‍यक्षिकांवरच परीक्षा घेण्यात येईल. 

...तर विशेष परीक्षा घेणारपरीक्षा कालावधीत कोरोना झाल्‍यास, लक्षणे जाणवत असल्‍यास किंवा लॉकडाऊन, संचारबंदीमुळे परीक्षा न देऊ शकल्‍यास अशा विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाईल. पुरवणी परीक्षा देखील जुलै-ऑगस्‍ट मध्ये घेण्यात येणार असल्‍याचे गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी ‘प्रॅक्‍टिकल’ऐवजी ‘असाइन्मेंट’दहावीच्या प्रॅक्‍टिकल परीक्षांऐवजी ‘असाइन्मेंट’ म्‍हणजे गृहपाठ पद्धतीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. दहावीला २१ मे ते १० जून या कालावधीत प्रात्‍यक्षिकऐवजी गृहपाठ सादर करावे लागणार आहेत. 

 

टॅग्स :ssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाVarsha Gaikwadवर्षा गायकवाड