विशेष लेख: बाप्पाची चोरलेली मूर्ती भाविकांना पावेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:32 IST2025-08-28T11:32:37+5:302025-08-28T11:32:59+5:30

Ganesh Cuaturthi News: सामूहिक उन्माद चढतो, तेव्हा समूहातील प्रत्येकाची विचारशक्तीच जणू नष्ट होते. 'फुकट' मिळतात म्हणून लोकांनी साक्षात गणेशाच्या मूर्तीवरच डल्ला मारावा ?

Will devotees get the stolen idol of Bappa? | विशेष लेख: बाप्पाची चोरलेली मूर्ती भाविकांना पावेल का?

विशेष लेख: बाप्पाची चोरलेली मूर्ती भाविकांना पावेल का?

- रवी टाले
(कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला) 

ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी, 'लोकमत'च्या अंकात, 'ऑर्डर पूर्ण करू न शकल्याने मूर्तिकाराचे पलायन, लोकांनी मिळेल ती मूर्ती नेली घरी' या शीर्षकाची बातमी वाचली अन् मन विषण्ण झाले। मुंबईच्या डोंबिवली उपनगरातील मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे यांनी विक्री वाढविण्यासाठी गणेशमूर्तीवर घसघशीत सूट जाहीर केली होती आणि तेच त्यांच्या अंगलट आले. ते वेळेत ऑर्डर पूर्ण करू शकले नाहीत आणि शेवटी त्यांना सोमवारी रात्री पलायन करावे लागले.

ही वार्ता कळताच लोकांनी त्यांच्या दुकानात धाव घेतली आणि हाताला लागेल ती मूर्ती घेऊन त्यांनीही पलायन केले. याप्रकरणी पोलिसांनी तांबडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे; पण खरेच ते एकटेच गुन्हेगार आहेत का? ज्यांनी मूर्ती पळवल्या, त्या सगळ्यांनीच मूर्तीच्या ऑर्डर दिलेल्या असतील का? ....आणि ज्यांनी ऑर्डर दिली असेल, त्यांना तरी अशा रीतीने मूर्ती घेऊन जाण्याची मुभा कायद्यान्वये होती का?
गणपत्य परंपरेत दोन पुराणांना विशेष महत्त्व आहे. एक म्हणजे गणेश पुराण आणि दुसरे म्हणजे मुद्गल पुराणा मुद्गल पुराणात चोरी, दरोडे, फसवणूक, असत्य यांसारख्या दुष्कृत्यांना रोखणारा देव म्हणून गणेशाचा उल्लेख आहे. अशा देवतेची मूर्ती पळवून नेऊन तिची प्रतिष्ठापना केल्याने, ती देवता त्या कथित भक्तांना खरेच पावेल का?
गणेशाला बुद्धीची देवताही म्हटले जाते. पण, जेव्हा सामूहिक उन्माद चढतो, तेव्हा एरव्ही अत्यंत धार्मिक वर्तणूक असलेल्यांचीही मती मारली जाते, हा नेहमीचा अनुभव आहे. ज्यांच्या दैनंदिन जीवनात हिंसेला अजिबात स्थान नसते, असे लोकही दंगलीच्या काळात सामूहिक उन्मादामुळे अत्यंत हिंसक होतात आणि लूटमार, जाळपोळ तर सोडाच; पण प्रसंगी एखाद्याचा जीव घ्यायलाही मागे-पुढे बघत नाहीत.
भारतीय महामार्गावर अपघात नित्याचेच! रोजच कोठे ना कोठे तरी अपघात होत असतात. कधी मालवाहू वाहने उलटून त्यामधील माल रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला विखुरतो. अशावेळी तो माल 
लुटण्यासाठी एकच झुंबड उडाल्याच्या बातम्याही प्रसारमाध्यमांमधून अधूनमधून वाचायला, बघायला, ऐकायला मिळत असतात. इतर वेळी अत्यंत नैतिक आचरण असलेलेही अशा प्रसंगी हात धुऊन घ्यायला मागे-पुढे बघत नाहीत. एकट्याने चोरी करण्याचा विचारही ज्यांच्या मनाला शिवू शकत नाही, असे लोकही लुटीत हिरिरीने सहभागी होतात. उलट एखादा त्या कृत्यात त्यांच्यासह सहभागी झाला नाही किंवा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्याची गणना मूर्खात केली जाते. त्यामागील एकमेव कारण म्हणजे सामूहिक उन्माद। सामूहिक उन्माद चढतो, तेव्हा त्या समूहात सहभागी असलेल्या प्रत्येकाची विचारशक्तीच जणूकाही नष्ट होते. डोंबिवलीत सोमवारी रात्री जे काही झाले, ते यापेक्षा वेगळे काही नव्हते. वेगळेपण एवढेच, की यावेळी लुटला गेलेला माल लुटण्यासाठी एकच झुंबड उडाल्याच्या बातम्याही प्रसारमाध्यमांमधून अधूनमधून वाचायला, बघायला, ऐकायला मिळत असतात. इतर वेळी अत्यंत नैतिक आचरण असलेलेही अशा प्रसंगी हात धुऊन घ्यायला मागे-पुढे बघत नाहीत. एकट्याने चोरी करण्याचा विचारही ज्यांच्या मनाला शिवू शकत नाही, असे लोकही लुटीत हिरिरीने सहभागी होतात. उलट एखादा त्या कृत्यात त्यांच्यासह सहभागी झाला नाही किंवा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्याची गणना मूर्खात केली जाते. त्यामागील एकमेव कारण म्हणजे सामूहिक उन्माद। सामूहिक उन्माद चढतो, तेव्हा त्या समूहात सहभागी असलेल्या प्रत्येकाची विचारशक्तीच जणूकाही नष्ट होते. डोंबिवलीत सोमवारी रात्री जे काही झाले, ते यापेक्षा वेगळे काही नव्हते. वेगळेपण एवढेच, की यावेळी लुटला गेलेला माल बुद्धीची देवता असलेल्या गणेशाच्या मूर्ती होत्या.

आपल्या क्षमतेचा अंदाज न घेता, ऑर्डर घेण्याची चूक प्रफुल्ल तांबडे यांनी नक्कीच केली. आपण मूर्ती लुटून त्यांना त्या चुकीची शिक्षा देत आहोत, असा समूहाचा ग्रह झाला असेल; पण एखाद्या व्यावसायिकाचा अशा प्रकारे अंदाज चुकण्याचे ते एकमेव उदाहरण आहे का? अनेक बड्या उद्योगपतींचेही अंदाज किंवा व्यवसायाचे ठोकताळे चुकतात आणि त्यांच्या चुकीची शिक्षा प्रत्यक्षरीत्या बँकांना आणि अप्रत्यक्षरीत्या शेवटी सर्वसामान्य माणसालाच भोगावी लागते. काहीजण ठरवून, उमजून, गणित करून अशा 'चुका' करत असतात. या देशातील प्रत्येक माणूस आयुष्यभर अशा चुकांची भरपाई करांच्या रूपाने, ठेवींवरील कमी आणि कर्जावरील जादा व्याजदरांच्या रूपाने करतच असतो आणि 'चुका' करणारे त्या पैशाच्या बळावर एखाद्या युरोपियन किंवा कॅरेबियन देशात भारतीयांना वाकुल्या दाखवत मजा मारत असतात. त्यांचे आपण काहीही वाकडे करू शकत नाही. आपण शिक्षा देतो ती तांबडेसारख्यांना ! त्यांच्यासारख्या मूर्तिकारांचे, त्यांच्याकडे काम करणाऱ्या कारागिरांचे पुढच्या अख्ख्या वर्षाचे आर्थिक नियोजन, त्यांच्या कुटुंबीयांची स्वप्नं गणेशोत्सवासारख्या उत्सवांभोवती केंद्रित झालेली असतात. सामूहिक उन्माद ती क्षणार्धात विस्कटून टाकतो.
 

Web Title: Will devotees get the stolen idol of Bappa?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.