शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

‘युद्ध नको म्हणणारे जग आपण का पाहत नाही?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 04:54 IST

१९३पैकी २२ देशांकडे सैन्यच नाही, तरी त्यांच्यावर कधीही हल्ले झालेले नाहीत. दोन तृतीयांश जग युद्धविरोधी आहे, ही वस्तुस्थितीच आपल्याला माहीत नाही.

मुलाखत आणि शब्दांकन : दुर्गेश सोनार, सहायक संपादक, लोकमत

युद्ध नाकारणारे जग’ या पुस्तकाची कल्पना कशी सुचली? 

- ‘अ वर्ल्ड विदाउट वॉर’ या माझ्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा डॉ. परिमल माया सुधाकर यांनी केलेला मराठी अनुवाद ‘युद्ध नाकारणारे जग’ या शीर्षकाने राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. या पुस्तकाची कल्पना जून २०१९ मध्ये रुजली. त्या वेळी आम्ही सहा जणांनी मिळून ‘नॉर्मंडी मॅनिफेस्टो फॉर वर्ल्ड पीस’ हा जाहीरनामा सादर केला. यात चार शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते, ब्रिटनमधील एक नामवंत तत्त्ववेत्ता आणि मी होतो. या चर्चांमधून एक गोष्ट ठळकपणे जाणवली ती ही की, जगावर युद्धाचा धोका आहे, पण तो आपल्याला रोजच्या बातम्यांत स्पष्टपणे दिसत नाही. दैनंदिन जीवन सुरळीत असले, तरी मानवी संस्कृतीसमोर अतिशय गंभीर संकट उभे आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये महात्मा  गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यान देताना या विचारांचा विस्तार करण्याचा आग्रह झाला. कोविड काळात मिळालेल्या निवांत वेळेत झालेल्या चिंतनातून हे पुस्तक साकार झाले.

पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र कसे विकसित झाले? 

- मी जगभरातील विचारवंत, राजकीय नेते, अभ्यासक यांच्याशी सखोल चर्चा केली आणि त्यातून हे लक्षात आले की, जागतिक महायुद्ध ही केवळ काल्पनिक शक्यता नाही. ते कधीही होऊ शकते. अणुयुद्ध झाले तर पृथ्वीवरील सृष्टीच नष्ट होण्याची शक्यता आहे. मग यातून बाहेर कसे यायचे... त्यासाठी काय काय बदल करायला पाहिजेत याचा साकल्याने विचार केला. एकीकडे राजकीय व धार्मिक अतिरेकी विचार तीव्र होत आहेत, तर दुसरीकडे एआयमुळे अधिकाधिक स्वयंचलित होत चाललेली शस्त्रास्त्रे आहेत. या दोन्हींचे मिश्रण अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळेच या पुस्तकात मी युद्धाच्या शक्यतेचे आणि त्यामागील कारणांचे विश्लेषण केले आहे, तसेच त्यातून बाहेर पडण्याचे ऐतिहासिक व तात्त्विक मार्गही मांडले आहेत.  

युद्ध नाकारणाऱ्या जगाच्या उभारणीत सामान्य लोकांची ठोस भूमिका असू शकते का? 

- नक्कीच असते. मागच्या ५० वर्षांत शस्त्रास्त्रांची स्पर्धा कमी करण्यामध्ये आणि युद्ध थांबवण्यामध्ये सामान्य लोकांचा खूप मोठा सहभाग होता. गंमत म्हणजे त्यांनाच हे माहिती नाही. मागील पन्नास वर्षांत सामान्य नागरिकांनीच अनेक ऐतिहासिक बदल घडवून आणले आहेत. भूसुरुंगविरोधी जागतिक करार असो वा अण्वस्त्रविरोधी चळवळी.. या सर्वांचे नेतृत्व सत्ताधाऱ्यांनी नव्हे, सामान्य स्त्री-पुरुष, अभ्यासकांनी केले. विशेष म्हणजे जगातील १९३ देशांपैकी २२ देशांकडे सैन्यच नाही, तरी त्यांच्यावर कधीही हल्ले झालेले नाहीत. दोन तृतीयांश जग युद्ध नाकारणारे आहे, ही वस्तुस्थितीच आपल्याला माहीत नाही.

युद्धनीतीचा मुळातून फेरविचार व्हायला हवा असे वाटते का? 

- होय. सुमारे १५० देशांना युद्ध नको आहे; संघर्ष फक्त ३०–४० देशांत केंद्रित आहेत. दुर्दैवाने अलीकडच्या काळात काही युरोपीय राष्ट्रेही पुन्हा युद्धखोर झाली आहेत. युद्ध अपरिहार्य नसते. अलिप्ततावाद आणि शांततावादी धोरणांमुळे अनेक संघर्ष टाळता येतात.  पौर्वात्य तत्त्वज्ञान ‘वसुधैव कुटुंबकम’ याच सूत्राभोवती गुंफलेले आहे. परंतु, पाश्चिमात्य देशांमधील तत्त्वज्ञान हे केवळ ‘स्वातंत्र्य’ या कल्पनेभोवती बेतलेले आहे. आपण आपले तत्त्वज्ञान केवळ घोषणा देण्यासाठी वापरतो. सांस्कृतिक दुराभिमान म्हणून नाही, पण पौर्वात्य देशांचे तत्त्वज्ञानच जगाला दिशा देऊ शकते.      भारत युद्ध टाळणारे सक्षम असे जागतिक मॉडेल उभे करू शकतो असे वाटते का? 

- आपल्याला महान राष्ट्र व्हायचे आहे, अशी ज्यावेळेला कल्पना केली जाते, तशी महत्त्वाकांक्षा जन्म घेते तेव्हाच तो देश पुढे येतो. पण, महासत्ता होण्याचे डोहाळे लागले, तर देशाचा विकास होत नाही. त्यामुळेच भारताने सर्वप्रथम एक महान राष्ट्र बनण्याची आस धरली पाहिजे, महासत्ता बनण्याचा विचार बाजूला ठेवला पाहिजे. सर्वसामान्य माणसाचे जीवन सुखी, सुरक्षित आणि सन्मानाचे झाले, तर देश आपोआपच मजबूत होतो. एआयच्या युगात ‘युद्ध नाकारणे’ अधिक अवघड झाले आहे का? 

- सायबर आणि ड्रोन यांची मला फारशी काळजी वाटत नाही, पण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी नियंत्रण सुटण्याचा धोका वाढला आहे. एआयची क्षमता पाहता येत्या पाच वर्षांमध्ये एआय स्वतःच युद्ध लावेल. आण्विक युद्ध करू शकेल आणि सर्व जगाचा सर्वनाश करू शकेल. यासाठी जागतिक पातळीवर तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. 

durgesh.sonar@lokmat.com

English
हिंदी सारांश
Web Title : Why don't we see a world that rejects war?

Web Summary : A world war is possible, threatening civilization. Build a peaceful world through collective action. Prioritize becoming a great nation over superpower status. AI-driven warfare poses extinction risk, demanding immediate global action.
टॅग्स :warयुद्ध