शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

साहेबांकडे जायला भीती का वाटते?

By यदू जोशी | Updated: October 16, 2017 00:27 IST

मंत्रालयातील लंच टाइम दीड तासांचा असतो. बरेच कर्मचारी दिवसभर अळमटळम करतात.वर्षभर सगळे सण साजरे होतात. फक्त सामान्यांचेच प्रश्न सोडविले जातील, असा एखादा आठवडा मंत्रालयात साजरा करता येईल का?

 मंत्र्यांच्या केबिनमध्ये सदैव गर्दी असते. मंत्री एकावेळी आठदहा जणांशी बोलून गा-हाणी समजून घेतात, पीए, पीएसना सूचना देत असतात. लगेच संबंधितांशी फोनवर बोलतात. प्रत्येकाचे समाधान करण्याचा त्यांचा आटापिटा चाललेला असतो. तरीही रोषाला तेच बळी पडतात. या उलटचे चित्र हे तलाठ्यापासून सचिवांपर्यंत दिसते. सामान्य माणूस काम घेऊन आला तर साहेबांचे पीए त्याला टरकवतात. ‘साहेब नाहीत, मिटिंगला गेलेत’ हे परवलीचे शब्द असतात. गोरगरिबांची सावलीही काही बड्या अधिका-यांना चालत नाही. तेच अधिकारी कंत्राटदारांना बरोबर भेटतात. सचिवांची दुस-या खात्यात बदली झाली की त्यांचे निष्ठावंत कंत्राटदार नवीन केबिनमध्ये दिसू लागतात. शेवटच्या माणसाशी निगडित असलेल्या एक सचिव त्यांच्या केबिनमध्ये कलर्स वाहिनीवरील मालिका बघत असतात. राज्याचे मुख्य सचिव भेटत नाहीत म्हणून नागपूरच्या एका अवलियाला हायकोर्टात जावे लागते! मुख्य सचिव संवेदनशील आहेत, साहित्यिक आहेत पण लोकांच्या मनातील अस्वस्थताही समजून घेतली पाहिजे. मंत्रालयात नागरिकांंच्या येण्यावर सुरक्षेच्या नावाखाली बंधने टाकण्यात आली आहेत. सुरक्षेपेक्षा कोणी मंत्रालयात येऊन विष घेईल आणि मग आपली बदनामी होईल याची सरकारला जास्त चिंता दिसते. अन् बाहेर किड्यांबरोबर शेतक-यांचा जीव घेणारी कीटकनाशके नोकरशाहीच्या कृपाछत्राखाली फोफावतात. भाकरीच्या चंद्रासाठी उभे आयुष्य वेचणाºया भूमिपुत्रांची ही आर्त कहाणी आहे. सामान्यांचा कुणी वाली नाही ही भावना वाढीस लागली आहे. तेव्हा सामान्यांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी एखादे स्वतंत्र मंत्रालय सुरू करा. ‘पगारात भागवा’ इतकेच ‘सौजन्याने वागा’ अभियान राबवा. लोकभावनांचे बॉम्ब अन् पिस्तूल झाले तर बंड होईल.नागपूर जिल्ह्यातील तेजराज मंगल हा शिक्षक अन् त्याचा मुलगा वर्षभरापासून त्याच्यावरील उपचाराची भरपाई मिळावी म्हणून खेटे घालताहेत. मुजोर कर्मचारी त्याची फाईल एका टेबलवरून दुसºया टेबलवर हलवायलादेखील तयार नाहीत. असे हजारो मंगल दरदिवशी तहसीलदारापासून मंत्रालयाचे उंबरठे झिजवतात. लोकांना ‘अटेंड’ करणे हे एकच काम अधिकाºयांना नाही हे खरे पण किमान आलेल्यांच्या दु:खावर फुंकर घालायला तर वेळ देता येतो?शैलेंद्र परांजपे हे मुंबईत एक पत्रकार आहेत. ते पुण्यात असताना एकदा प्रख्यात समाजवादी नेते ग.प्र.प्रधान यांच्याकडे गेले. दबकतच बेल दाबली. शैलेंद्र म्हणाला ‘मी जरा भीतभीतच आलो. म्हटलं दुपारची; आरामाची वेळ आहे; तुम्हाला काय वाटेल?’ प्रधान यांनी त्यावर दिलेले उत्तर अफलातून होते. ते म्हणाले, माझ्याकडे येण्याची कुठल्याही कारणाने का होईना तुुला भीती वाटते हा माझा पराभव आहे. आता मला स्वत:ला दुरुस्त केले पाहिजे.’- किती ही संवेदनशीलता!आजही ‘साहेब’ जमातीबद्दल सामान्यांना भीती वाटते. त्यांच्या केबिनमध्ये एकदम कसे जावे? असा मानसिक दबाव असतो. आजची नोकरशाही प्रधान मास्तरांच्या चष्म्यातून सामान्यांकडे पाहील तो सुदिन समजावा. शेवटच्या माणसाचा आयुष्याशी संघर्ष संपून त्याने दीपोत्सव अनुभवावा यासाठी नोकरशाहीने योगदान द्यावे. उद्यापासूनचे दीपपर्व हा या योगदानाचा नवआरंभ ठरावा.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार