शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक वाहतूक नेमकी कोणासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 06:16 IST

Public Transport : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक कंत्राटांसाठी चालवायची, की प्रवाशांच्या सोयीसाठी हे निश्चित झाले, की त्यात आमूलाग्र सुधारणा आपोआप होतील. 

- मिलिंद बेल्हे (सहयोगी संपादक, लोकमत, मुंबई)

मुंबईच्या रस्त्यांवरची गर्दी कमी करायची असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, बळकट, आरामदायी व्हायला हवी, असा निष्कर्ष काढून सध्या महामुंबईत अनेक प्रयोग हाती घेतले जात आहेत. एसी टॅक्सी, ॲपवर आधारित टॅक्सीला तोंड देण्यासाठी वातानुकूलित लोकल, बस हा त्यातूनच काढलेला मध्यम मार्ग. पण सध्या ज्या पद्धतीने या सार्वजनिक वाहतूक सेवा चालवल्या जातात, तशाच पद्धतीने त्या चालवून फक्त त्यांना वातानुकूलनाची जोड दिल्याने ही व्यवस्था सक्षम होईल का?  सामान्यांना परवडेल का? याचे उत्तर सध्या तरी नाही असेच आहे. कारण सार्वजनिक वाहतूक सक्षमपणे चालवण्यासाठी जो प्रवासीकेंद्रित दृष्टिकोन लागतो त्याचा अभावठायीठायी दिसतो. मुंबई महानगरांत वाढलेली दुचाकींची संख्या हे जसे मध्यमवर्ग या वाहतूक व्यवस्थेला कंटाळल्याचे दाखवून देतो, तसेच खासगी गाड्यांची वाढत असलेली संख्या उच्च मध्यमवर्ग, उच्चभ्रूंच्या आकांक्षा या वाहतूक व्यवस्थेतून पूर्ण होणार नाहीत, हेच अधोरेखित करतो.  

राजकीय लाभातून परिवहन सेवांवरील नियुक्त्या होतात. प्रशासनही त्यांच्यापुढे माना तुकवते आणि बस खरेदी, इंधन, दुरुस्ती-देखभाल, कामगार भरती यात हात ओले करण्याची स्पर्धा लागल्याप्रमाणे निधीचा बराचसा भाग ओरबाडून खाल्ला जातो.   मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) जशी सर्वत्र लोकल जाते, (आणि आता मेट्रो आखली गेली आहे)  तशीच या भागासाठी एकच बससेवा- परिवहन सेवा हवी, तिचे नियंत्रण वेगवेगळ्या प्रदेशातून केले जावे अशी संकल्पना होती. पण कंत्राटे हातची जातील, म्हणून ती कागदावरच राहिली. बेस्ट, टीएमटी, एनएमएमटी, केडीएमटी, एमबीएमटी, व्हीव्हीसीएमसी अशा परिवहन सेवा या क्षेत्रात धावतात. त्यातील बेस्टने मेट्रो-टॅक्सीशी स्पर्धा करण्यासाठी दर मोठ्या प्रमाणात कमी केले. त्याचा फायदा झाला, पण अन्य महापालिकांनी तसा निर्णय घेतला नाही. या सेवा तोट्यातच आहेत. त्यांचे भाडेही परवडण्यापलीकडे गेले आहे.. 

तीच गत रिक्षांची. सुविधांच्या दृष्टीने दीर्घकाळ न बदललेले वाहन हीच याची ओळख. मालक आणि चालक अशा दोन यंत्रणांचे हितसंबंध, तीन प्रवाशांची परवानगी असूनही बिनदिक्कत पाच प्रवासी नेण्याची स्पर्धा यामुळे ही वाहतूक असून अडचण नसून खोळंबा अशा अवस्थेत आहे. मुंबई शहर वगळले, तर परवडणारी वाहतूक सेवा म्हणून पूर्वी रिक्षांचा उल्लेख होई. पण बेकायदा रिक्षा, राजकीय पक्षांच्या आशीर्वादाने फोफावलेल्या संघटनांची दादागिरी, भाडे ठरवण्यावर त्यांचा वरचष्मा, परस्पर होणारी दरवाढ, शेअर भाड्यातून होणारी लूट यामुळे प्रवासी मेटाकुटीस आले आहेत.

हा प्रश्न तीव्र आहे हे राजकीय पक्षांना मान्य आहे, पण संघटनांच्या हिताच्या दगडाखाली त्यांचेच हात अडकल्याने तो कायम लांबणीवर टाकला जातो. कोरोनाच्या काळात दोनच प्रवासी नेण्याची मुभा असल्याने तिघांचे भाडे दोघांत विभागून जी दरवाढ केली गेली, ती आज पाच प्रवासी भरूनही कायम आहे. दरवर्षी भाडेवाढ होते, पण सुविधांच्या नावाने...ॲपवर आधारित टॅक्सींमुळे मुंबईत काळी-पिवळी टॅक्सी सुधारत जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र दरवाढ पदरी पाडून घेताना दिसणारे त्यांच्या संघटनांचे अस्तित्व दर्जाची स्पर्धा आली, की मान टाकते. भाडेवाढीचा ताण कमी करायचा तर सौरऊर्जेवरील-इलेक्ट्रिकवरील रिक्षा, इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवायला हवी. पण त्याच्या धोरण निश्चितीतच हितसंबंध आड येतात.

रेल्वेचे सर्व प्रकल्प मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पात आहेत. त्यात राज्य सरकार वाटा उचलत असूनही ते २५-३० वर्षे रखडताना दिसतात. एमएमआर क्षेत्रातील १२ खासदार आणि राज्यसभेवर गेलेले खासदार एकत्रितपणे मुंबईच्या वाहतूक प्रकल्पावर संसदेत आवाज उठवताना, संसदीय समितीसमोर मुद्दे मांडून एकत्रित निधी पदरात पाडून घेताना दिसत नाहीत. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले, की अर्थसंकल्पात खर्चाला मंजुरी मिळालेल्या गुलाबी पुस्तकाकडे बोटे दाखवून ते हात वर करतात.  

एमएमआर क्षेत्राची लोकसंख्या अडीच कोटींवर जाईल तेव्हा मेट्रोचे प्रकल्प कसेबसे पूर्ण होत आलेले असतील. तेव्हा या प्रकल्पांना चांगली परिवहन सेवा, खासगी वाहतूक सेवा यांचीही जोड हवी. मुंबईतील खासगी वाहनांची संख्या कमी व्हायला हवी असेल तर सार्वजनिक वाहतूक त्या दर्जाची हवी. त्याच वेळी पण ज्याला स्वतःचे वाहन परवडत नाही, त्यांचे काय? हातावर पोट असलेल्यांनाही वाहतुकीच्या या सेवांचा लाभ द्यायचा असेल तर परिवहन सेवांसारख्या सार्वजनिक सेवा एका छताखाली यायला हव्यात. ही पावले उचलली तरी पुरेसे आहे.

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूक