शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

संसदेच्या सभागृहांवर हल्ल्याचे शस्त्र आजवर कुणी, कुठे वापरले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 08:12 IST

विविध देशांमध्ये ‘संसद सभागृहांवर हल्ला’ हे शस्त्र दहशतवादी गटांबरोबरच असंतुष्ट नागरिकांनीही वापरले आहे. संसदेवरील हल्ल्यांच्या या इतिहासाबद्दल..

-वप्पाला बालचंद्रन, माजी विशेष सचिव, कॅबिनेट सचिवालय

संसदेच्या जागतिक इतिहासात सभागृहातील सर्वांत भयंकर हल्ला ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेत झाला. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिंसक समर्थकांनी अमेरिकन संसदेत घुसून काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात अडथळा आणला. २०२० च्या अध्यक्षीय निवडणूक निकालावर शिक्कामोर्तब करण्यासाठी हे अधिवेशन भरले होते. संसदेच्या सभागृहांवरील त्या आधीचा मोठा हल्ला ९ डिसेंबर १८९३ मध्ये फ्रेंच संसदेवर झाला. ऑगस्ट वेलेंट नामक अराजकवादी संघटनेने प्रेक्षक सज्जातून देशी बनावटीचे बॉम्ब फेकले; त्यात फ्रेंच संसदेच्या कनिष्ठ सभागृहात उपस्थित असलेले २० जण जखमी झाले होते. १८९२ मध्ये रावकुल नामक एका दुसऱ्या अराजकवाद्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. ऑगस्ट वेलेंट त्याचा निषेध करत होता. त्यालाही नंतर ४ फेब्रुवारी १८९४ रोजी मृत्युदंड देण्यात आला. ‘अराजक अमर रहे, दांभिक समाज मुर्दाबाद’ अशा आशयाच्या घोषणा देत त्याने मृत्यू पत्करला. यापासून प्रेरणा घेऊन भारतीय स्वातंत्र्ययोद्धे भगतसिंग, बटुकेश्वर दत्त आणि सुखदेव यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्ब फेकण्याचे ठरवले. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी झालेल्या क्रूर लाठीहल्यात राष्ट्रवादी नेते लाला लजपतराय जखमी होऊन नंतर त्यांचे निधन झाले. या घटनेचा निषेध हे तिघे करत होते. ८ एप्रिल १९२९ला सभागृहात दोन बाॅम्ब फेकण्यात आले. जाचक अशा सामाजिक सुरक्षा कायद्याचा निषेध करणारी पत्रकेही त्यांनी फेकली. त्यानंतर १३ डिसेंबर २०२३ ला सुरक्षा व्यवस्थेचे कडे तोडून काही युवक संसदेच्या नव्या इमारतीत घुसले. भगतसिंग यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे ते सांगत होते.

२३ मार्च २०१७ रोजी लंडनच्या वेस्टमिन्स्टर परिसरात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु, संसदेच्या इमारतीपर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. रस्त्याने जाणाऱ्या निरपराध पादचाऱ्यांना मोटारींचा वापर करून चिरडून टाकण्याचा एक नवा प्रकार इस्लामिक स्टेटचे दहशतवादी वापरत होते तो हा काळ. अशा प्रकारचा पहिला हल्ला फ्रान्समध्ये नाइस येथे १६ जुलै २०१६ रोजी झाला. मूळच्या ट्युनिशियन  दहशतवाद्याने जमावामध्ये ट्रक घुसवून ८४ बळी घेतले. या घटनेत २०० लोक जखमी झाले होते.

भारतात आपल्या संसदेवर अशा प्रकारचा थेट हल्ला १३ डिसेंबर २००१ रोजी झाला.  जैश- ए- मोहम्मदच्या अतिरेक्यांनी संसदेच्या आवारात बनावट कार स्टीकर वापरून प्रवेश केला. ते वेगाने पुढे घुसत असताना उपराष्ट्रपतींच्या गाडीच्या ताफ्यामुळे त्यांचा वेग कमी झाला. हा ताफा ओलांडून जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता सुरक्षा जवानांनी त्यांना अडवले. उभय पक्षात गोळीबार झाला. त्यामुळे बाकीचे पोलिस सावध झाले. हे अतिरेकी संसदेच्या आवारातील वेगवेगळ्या प्रवेशद्वारांतून घुसण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षारक्षकांवर त्यांनी गोळीबार चालवला होता. मात्र त्यांना संसदेच्या इमारतीत प्रवेश करता आला नाही. केंद्र राखीव पोलिस दलाची हवालदार कमलेश कुमारी यादव हिने संसदेच्या इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून टाकले होते. या धुमश्चक्रीत ११ गोळ्या लागून ती मरण पावली.

याच्याही आधी श्रीनगरमध्ये विधानमंडळाच्या इमारतीवर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी १ ऑक्टोबर २००१ रोजी हल्ला केला. स्फोटकांनी भरलेली टाटा सुमो त्यांनी या इमारतीवर येऊन आदळविली. स्फोटात आठ पोलिस आणि सामान्य लोकांमधील १२ जण मरण पावले होते. यावेळी झालेल्या गोंधळाचा फायदा घेत एक दहशतवादी विधिमंडळाच्या इमारतीत शिरला; परंतु सुदैवाने बैठक स्थगित करण्यात आली होती आणि सभापती तसेच त्यांचे कर्मचारीच केवळ त्या ठिकाणी उपस्थित होते. या कारबॉम्बचा स्फोट झाल्याने विशेष सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात सगळे दहशतवादी मारले गेले. (लेखातील मते व्यक्तिगत)

टॅग्स :AmericaअमेरिकाParliamentसंसद