शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
2
"महात्मा गांधींना जगभरात कोणीही ओळखत नव्हतं"; पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?
3
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
4
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
5
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
6
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
7
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
8
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
9
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
10
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
11
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
12
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
13
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?
14
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
15
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
16
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
17
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
18
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
19
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
20
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले

नोकरीच्या संधीतील भूमिपुत्र ; स्मार्ट सिटीत होतोय ‘पराधीन’....! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 3:10 PM

दरवर्षी हे तरुण पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील फुटपाथवर रात्र काढतात व सकाळी सहा वाजता पोलीस मुख्यालयाचा दरवाजा उघडल्यावर आत जातात़...

ठळक मुद्देउपाशी पोटी ते आपली शारीरिक क्षमता कशी सिद्ध करणार आणि परीक्षेला पात्र ठरणार

- विवेक भुसे- काही दिवसांपूर्वी सदर्न कमांडच्या वतीने रेसकोर्स मैदानावर सैन्य भरतीचा कार्यक्रम आखण्यात आला होता़. काहीशे जागांसाठी हजारो तरुण राज्यभरातून पुण्यात आले होते़. कडाक्याच्या थंडीत त्यांनी रात्र रस्त्यावर काढावी लागली़. सकाळी परीक्षेला जाण्यापूर्वी अनेकांच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता़. अशा अवस्थेत ही तरुण मुले अशी आपला उत्कृष्ट परफॉमर्न्स कसा सादर करणार.. याचा विचारच कोणी करत नाही़. याची माहिती मिळाल्यावर काही सामाजिक संस्थांनी त्यांच्या चहा नाश्त्याची सोय केली होती़.  यावर्षी २०१९ अखेरपर्यंत पुणे शहर, पिंपरी चिंचवड, ग्रामीण पोलीस, लोहमार्ग पोलीस दलासाठी ९०० पोलीस शिपायांची पदे भरण्यात येणार आहे़. तसेच राज्य राखीव दलासाठी १०० पदे भरण्यात येणार आहे़. त्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे़. या परीक्षांसाठी राज्यभरातून हजारो उमेदवार पुण्यात येतील़. दरवर्षी हे तरुण पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील फुटपाथवर रात्र काढतात व सकाळी सहा वाजता पोलीस मुख्यालयाचा दरवाजा उघडल्यावर आत जातात़. त्याचबरोबर अनेक परीक्षांसाठी राज्य तसेच परराज्यातून तरुण-तरुणी पुण्यात नेहमी येत असतात़. त्यांच्याच्या सोयीसाठी काही कायमस्वरुपी सोयी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न पुण्यासारख्या स्मार्ट शहरात होणे गरजेचे आहे़. शहरात अनेक ठिकाणी बेघर निवासा तयार करण्यात आला आहे़. राज्यभरातून आलेल्या या तरुणांना याठिकाणी एक रात्र काढण्याची सोय करता येईल़. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे़. भूमिपुत्रांना नोकरीत संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा सर्वच पक्ष करत असतात़. पण, त्यादृष्टीने कोणीही पावले उचलत नाही़ अशा परीक्षेच्यावेळी राज्यभरातून आलेल्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे शहरातील एस टी स्टँड, रेल्वेस्थानकावर या संघटनांनी मदत केंद्र उभारावे़. अनेकांना पोलीस मुख्यालय अथवा परीक्षा केंद्र नेमके कोठे आहे व तेथे कसे जाता येईल याची माहिती नसते़. शहरात अनेक संस्थांमार्फत लोकांना दररोज मोफत अन्नदान करण्यात येते़. अशा संस्थांच्या सहकार्याने या मदत केंद्रावर मार्गदर्शन व आलेल्या तरुणांना एक फुड पॅकेज दिले तर त्यांची चांगली सोय होऊ शकेल़. काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस सहआयुक्त अशोक धिवरे यांनी शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट संघटनेच्या मदतीने पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या शारीरिक परीक्षेच्या वेळी त्यांच्या नाश्त्याची सोय करुन दिली होती़. आताही असा प्रयत्न करता येऊ शकतो़. ग्रामीण भागातून नोकरी मिळविण्यासाठी येणारे हे तरुण गरीब घरातून आलेले असतात़. त्यांच्याकडे अनेकदा एकवेळच्या जेवणासाठीही पैसे नसतात़. अशावेळी उपाशी पोटी ते आपली शारीरिक क्षमता कशी सिद्ध करणार आणि परीक्षेला पात्र ठरणार याचा विचार सर्वांनी करायची गरज आहे़. शहरातील संस्थांनी एकत्र येऊन शहरात परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या एक दिवसाच्या राहण्याची, बाथरुम व अंघोळीची सोय तसेच चहा नाश्त्याची सोय करण्याची जबाबदारी घेतली तर या उमेदवारांना आपली शारीरिक क्षमता सिद्ध करुन नोकरीसाठी प्रयत्न करता येईल़. स्मार्ट शहरातील जबाबदार नागरिक म्हणून ही सर्वांचीच जबाबदारी आहे़.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस