शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

भेटीचे फलित काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 02:00 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर झालेल्या चर्चेचा नेमका तपशील कधीच जगजाहीर होणार नाही. किंबहुना, तो बहिर्मुख होऊ नये यासाठीच तर ती चर्चा बंद दाराआड होती.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर झालेल्या चर्चेचा नेमका तपशील कधीच जगजाहीर होणार नाही. किंबहुना, तो बहिर्मुख होऊ नये यासाठीच तर ती चर्चा बंद दाराआड होती. ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था असलेल्या दोन राजकीय पक्षांचे प्रमुख जेव्हा अशा प्रकारे भेटतात, तेव्हा त्या भेटीमागे निश्चित असे काही सुप्तहेतू दडलेले असतात. त्यात सार्वजनिक व्यवहार, राष्टÑहित आणि व्यापक समाजहिताचा काहीएक संबंध नसतो. त्यामुळे शहा-ठाकरे यांच्या भेटीत अशा कुठच्याच मुद्यावर चर्चा झाली नसणार हे ओघाने आलेच. मग या भेटीमागचा हेतू काय आणि साध्य काय? उत्तर एकच, शिवसेनेची नाराजी दूर करणे! शहांच्या भेटीने ठाकऱ्यांची नाराजी दूर झाली की नाही, हे आगामी काळात दिसून येईलच. पण त्यांच्या नाराजीचे नेमके मुद्दे तरी काय आहेत? वाढती महागाई, शेतकºयांचे प्रश्न, इंधन दरवाढ, बेरोजगारी, हे मुद्दे तर नक्कीच नसणार. उद्धव ठकारे नाराज आहेत, ते त्यांना सत्तेत मिळणाºया दुय्यम वागणुकीमुळे. केंद्रात त्यांचा इनमिन एक मंत्री आणि तोही दुर्लक्षित खात्याचा. राज्याच्या मंत्रिमंडळातही तुलनेत कमी महत्त्वाची खाती. केंद्रात भाजपाचे बहुमत असल्याने आणि शिवसेनेवाचून त्यांचे पान अडत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना ढुंकूनही विचारत नाहीत आणि राज्यात त्यांच्या मताला काडीची किंमत नाही. मागील लोकसभा निवडणुकीपर्यंत दोन्ही पक्षांची युती होती. मोदी लाटेत दोन्हीकडचे काही ओंडकेही तरून गेले. पण याच यशामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बेटकुळी फुगल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना स्वबळ आठवले. त्यातून २५ वर्षे अभेद्य असलेल्या युतीची ताटातूट झाली. पण तरीही निवडणुकीनंतर संख्याबळाच्या जोरावर भाजपाने सत्ता हस्तगत केली. शिवसेनाही मागाहून सत्तेत सहभागी झाली आणि काडीमोड झालेल्या संसाराची सत्तेच्या वेदीवर पुन्हा घडी बसली. इथपर्यंत सारे काही ठिकठाक होते. पण त्यानंतर झालेल्या कल्याण-डोंबिवली आणि मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा भांड्याला भांडे लागले. मोठा भाऊ कोण? यावरून वादाची ठिणगी पडली आणि दोन्ही बाजूने त्यात तेल ओतण्याचे काम झाल्याने दुराव्याची धग कायम राहिली. एक पाय सत्तेत आणि दुसरा सत्तेबाहेर, अशी तारेवरची राजकीय कसरत करत ठाकरे आणि कंपनीने भाजपाचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडली नाही.केंद्रात आणखी एक मंत्रिपद हवे, अशी सेनेची मागणी असताना सुरेश प्रभूंना परस्पर मंत्रिपदे दिल्याने ठाकरे चांगलेच दुखावले गेले. शिवाय, पालिका निवडणुकीत ठाकरेंच्या संपत्तीचा मुद्दा उपस्थित करून भाजपा नेत्यांनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. शिवाय, मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या सेनेला मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, यासारख्या योजना राबविताना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे सेनेची नाराजी वाढत गेली. आजवर सेनेची मनधरणी करण्याची गरज भाजपा नेत्यांना पडली नाही. पण तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीत सेनेची ही नाराजी परवडणारी नाही, याची जाणीव झाल्यानेच शहांनी मातोश्रीवर पायधूळ झाडण्याची तसदी घेतली. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांनंतर विरोधकांच्या मोर्चेबांधणीला हुरुप आलेला असल्याने किमान एनडीएतील घटक पक्षांना जवळ ठेवण्याशिवाय शहा-मोदींना पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच शहांनी मातोश्रीवर तब्बल अडीच तास घालविले. शहांची ही शिष्टाई यशस्वी झाली, तर त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होऊ शकतो. दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून ‘आॅल वेल’ असल्याचे संकेतही मिळाले खरे; पण राजकारण ऐनवेळी कोणते वळण घेईल, हे सांगणे कठीण.

टॅग्स :Amit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरे