शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आजचा अग्रलेख: दानिशचा धर्म कोणता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 06:36 IST

तालिबान्यांनी दानिशच्या हत्येची जबाबदारी नाकारलीय. तरीदेखील सत्य हेच की दानिश सिद्दीकी हुतात्मा झाला. या हौतात्म्याची भारतात चोहोबाजूंनी चर्चा सुरू आहे आणि तिचे स्वरूप सर्वांत आधी माणुसकीचा विचार करणाऱ्या प्रत्येकाला खिन्न करणारेही आहे.

विस्थापितांचे जिणे नशिबी आलेल्या रोहिंग्यांमधील हतबल महिला बांगलादेश-म्यानमार सीमेवरच्या समुद्रकिनारी, शाह पोरीर बेटावर आश्रयासाठी जाण्याआधी किनाऱ्याच्या पुळणीवर जन्मभूमीला अखेरचा स्पर्शवजा नमस्कार करतानाचे दृश्य किंवा नागरिकत्व कायद्यातील दुरुस्तीविरोधात आंदोलन सुरू झाल्यानंतर दिल्लीत उसळलेल्या दंगलीत आंदोलकांवर धावून जाणारा पिस्तूलधारी तरुण... अगदी कालपरवा अफगाणिस्तानात तालिबान्यांनी पुन्हा युद्ध सुरू केल्यामुळे कंधारमध्ये चेकपोस्टची राखण करताना भेदरलेले जवान, त्याआधी भारतात कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर अवस्थेत असताना गंगेत टाकली जाणारी प्रेते अथवा दिल्लीत एकाचवेळी पेटलेल्या अनेक चिता... ही सगळी छायाचित्रे टिपणारा, माणसांनीच घडवून आणलेल्या आपत्तीत भरडल्या जाणाऱ्या सामान्य माणसाच्या वेदना, हालअपेष्टा जगभर पोहोचविणारा, तीन वर्षांपूर्वी अदनान अबिदीसोबत पत्रकारितेचे नोबेल समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार विजेता दानिश सिद्दीकी आता तसे धाडस करताना यापुढे दिसणार नाही. 

परवा, अफगाणिस्तानातील यादवीमध्ये तालिबान्यांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यात हा बहाद्दर छायाचित्रकार मारला गेला. अवघ्या एकतिसाव्या वर्षी तो जग सोडून गेला खरा; पण हे एवढेसे आयुष्यही तो धाडसाने, धैर्याने जगला. पत्रकाराने जोखीम घ्यावी तरी किती याचा वस्तुपाठ मागे ठेवून गेला. मुंबईत जन्मलेल्या, दिल्लीत शिक्षण घेतलेल्या, जामिया मिलिया इस्लामियामध्ये आधी अर्थशास्त्रात पदवी व नंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या दानिशने हे छोटेसे आयुष्य जणू रणांगणावरच काढले. रॉयटर या जगातल्या मोठ्या वृत्तसंस्थेसाठी भारतातल्या संघर्षाचे चित्रण त्याने केलेच. त्याशिवाय अगदी इराकमधील मोसूलची लढाई, हाँगकाँगमधील लोकशाहीसाठी आंदोलन व आता अफगाणिस्तानातील रक्तरंजित संघर्ष, या सगळ्यांसाठी त्याने जीव डावावर लावला. मृत्यूच्या आदल्या दिवशी अफगाण स्पेशल ट्रूपसोबत तो ज्या गाडीत होता, त्यावरच रॉकेट पडले; पण तो वाचला. त्यासाठी त्याने व्यक्त केलेला आनंद चोवीस तासही टिकला नाही. अफगाणिस्तानातील कंधार व पाकिस्तानातील चमन, क्वेट्टा या शहरांना जोडणाऱ्या महामार्गावरच्या स्पिन बोल्डक या जिल्हा मुख्यालय असलेल्या लाख-सव्वालाख लोकसंख्येच्या शहरालगत आणखी एका रॉकेटने त्याचा जीव घेतला. 

तालिबान्यांनी दानिशच्या हत्येची जबाबदारी नाकारलीय. तरीदेखील सत्य हेच की दानिश सिद्दीकी हुतात्मा झाला. या हौतात्म्याची भारतात चोहोबाजूंनी चर्चा सुरू आहे आणि तिचे स्वरूप सर्वांत आधी माणुसकीचा विचार करणाऱ्या प्रत्येकाला खिन्न करणारेही आहे. त्याच्या कारणांमध्ये पहिले कारण दानिशचा धर्म आणि दुसरे दिल्ली दंगलीत किंवा कोरोना महामारीच्या काळात त्याने काढलेल्या छायाचित्रांमुळे सत्तावर्तुळात पसरलेली अस्वस्थता. खरे तर हे काहीही दानिशने जाणीवपूर्वक केले नव्हते. त्याचा धर्म होता पत्रकारितेचा, सामान्य माणसांच्या सुख-दु:खात समरस होण्याचा. धर्म, जाती, राजकारण अशा कारणांनी सामान्यांच्या वाटेवर पसरलेले काटे दूर करण्यासाठी झटण्याचा हा धर्म त्याने प्राणपणाने निभावला. त्यासाठी स्वत:चा प्राण दिला. असे करणारा दानिश पहिला नाही व अखेरचाही नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात असे सतत घडत आले आहे. डॅनियल पर्ल, जेम्स फोलीपासून ते जमाल खगोश्शीपर्यंत आणि आपल्याकडे गौरी लंकेशपासून ते बातमीसाठी हल्ले झेललेल्या, जीव गमावलेल्या गावखेड्यातल्या पत्रकारांपर्यंत, ही यादी खूप मोठी आहे. अगदी अलीकडे सिरियातील अशाच रक्तबंबाळ यादवीचे वृत्तांकन, चित्रांकन करताना शंभरावर छायाचित्रकारांनी जीव गमावला. त्यापैकी अगदीच कमी बाहेरचे होते. याचा अर्थ स्थानिकांनी त्या संघर्षात अधिक जीवघेणी जोखीम स्वीकारली. असेच याआधीच्या अफगाण संघर्षावेळी घडले. तालिबान, अल-कायदा, इसिस या अतिरेकी संघटनांनी अनेक पत्रकारांचे अपहरण केले. त्यांना नरकयातना दिल्या. गळे चिरले व शौर्याचे प्रतीक समजून ते जगजाहीर दाखविले. कोणत्याही क्षणी जीव जाऊ शकतो, हे माहीत असताना हे सगळे प्रत्यक्ष युद्धभूमीवर गेले. बंदुकीच्या गोळ्या, मॉर्टर, रॉकेट व बॉम्बच्या हल्ल्यामुळे जाणारे निरपराधांचे जीव, लहानग्यांची विदीर्ण आयुष्ये त्यांनी जगाच्या चव्हाट्यावर आणली. हे सगळे ते जगाला द्वेषाची, तिरस्काराची, रक्तपाताची नव्हे तर प्रेमाची गरज आहे, या हेतूनेच करीत होते. हाच त्यांचा धर्म होता. दानिशही त्याच धर्मासाठी जगला व तो निभावतानाच गेला. त्याचा जन्म ज्या धर्मात झाला त्यावर त्याच्या हौतात्म्याला रंग द्यायचा, त्यावरून दु:ख व्यक्त करायचे, मृत्यूबद्दलही असुरी आनंद व्यक्त करायचा, हे सारे बकवास आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तान