शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

स्वत:च निर्माण केलेल्या प्रश्नांऐवजी दिवंगतांवर टीका करण्याची ही कोणती तऱ्हा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 5:52 AM

 वर्तमानात स्वत:च निर्माण केलेल्या प्रश्नांऐवजी दिवंगतांवर टीका करण्याची ही कोणती त-हा? संघ ज्या थोर भारतीय परंपरेचा गौरव करतो ती हीच आहे का? ही परंपरा लोकशाहीचेच नव्हे, तर भारतीय सभ्यतेचे सारे संकेत मोडणारी आहे.

दिवंगतांवर टीका करणे हे आपल्या परंपरेत सभ्यतेचे लक्षण मानले जात नाही. अगदीच सडकछाप भांडण असेल तर ते क्वचित कधी आई-बहिणींपर्यंत (बापापर्यंत सहसा नाही) जाते. पण त्यापलीकडे आजा-आजी, त्याअगोदरच्या पितरांपर्यंत ही टीका वा शिवीगाळ जात नाही. मात्र आपल्या सध्याच्या राजकीय व्यवहाराने ही परंपरा मोडून थेट इतिहासात गडप झालेल्या पितरांपर्यंत पोहोचण्याचे व त्यांना शिवीगाळ करण्याचे मनावर घेतले आहे. राहुल गांधींवरची मोदींची टीका समजण्याजोगी आहे. सोनिया गांधींवरही त्या राजकारणात असल्याने ते टीका करू शकतात. पण राजीव गांधी, त्याआधी इंदिरा गांधी व त्याही आधी पं. जवाहरलाल नेहरूंपर्यंत पोहचून त्यांना नावे ठेवण्याचे त्यांचे व त्यांचे सारथी अमित शहा यांचे वर्तन परंपरेएवढेच सभ्यतेतही न बसणारे आहे.

वर्तमानात अनेक प्रश्न आहेत आणि त्यातले अनेक मोदींच्या सरकारने उभे केले आहेत. बेरोजगारीत वाढ, नोटबंदी, जीएसटी, भाववाढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आर्थिक ताण व राजकीय खून हे प्रश्न आताचे आहेत. त्यातल्या काहींना इतिहासही आहे. परंतु कोणत्याही लोकशाही देशात सत्तेवरचे सरकार आपल्या चुकांसाठी व प्रश्नांसाठी पूर्वीच्या सरकारांना दोषी धरत नाही. ती फक्त आपली व त्यातही संघाच्या सरकारांनी नव्याने सुरू केलेली तºहा आहे. पं. नेहरूंना जाऊन आता पंचावन्न वर्षे झाली. इंदिरा गांधींची हत्या पस्तीस वर्षांपूर्वी झाली. राजीव गांधींच्या स्फोटक खुनालाही पंचवीस वर्षांचा काळ लोटला. राहुल आणि प्रियंका ही त्यांची आताची पिढी त्यांचा पक्ष व विचारधारेला पुढे नेत आहेत. त्यांच्यावर कोणताही आरोप नाही किंवा त्यांच्यावर कोणती टीका करता येत नाही. त्यामुळे ‘तुम्ही नाहीतर तुमचे आईवडील, आजोबा-पणजोबा’ असा विचार करून मोदी व शहा यांची सध्याची सडकछाप शिवीगाळ सुरू आहे. त्यांचा या शिवीगाळीतला उत्साह एवढा दांडगा की ते प्रसंगी त्याही मागे ते थेट म. गांधींपर्यंत जातात.
ज्यांच्या पावलांच्या धुळीची बरोबरी आपण करू शकत नाही त्या महात्म्यांना आणि महापुरुषांना नावे ठेवण्याची त्यांची तयारी पाहिली, की संघ ज्या थोर भारतीय परंपरेचा गौरव करतो ती ही आहे की काय, असा प्रश्न आपल्याला पडतो. अशी शिवीगाळ फारसे काही न शिकलेल्या स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, गिरीराज किंवा प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केली, तर ते त्यांच्या पोरकटपणापायी एकदा समजून तरी घेता येईल. पण पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष नेहरू व महात्मा गांधींना आजच्या राजकारणात ओढू लागले, तर ते कसे समजायचे? संघाने स्वातंत्र्यलढ्यात कधी भाग घेतला नाही. त्यापासून दूर राहून त्याला नावे ठेवण्याचेच काम त्याने केले.त्यांच्या या टीकेनंतरही काँग्रेसच्या नेतृत्वात देश स्वतंत्र झाला. त्यासाठी प्रथम गांधींना मारले गेले. आता ते मारणारे म्हणतात, ‘गांधींऐवजी नेहरूंना मारले असते तर अधिक बरे झाले असते.’ त्या माणसांशी मोदी व शहा यांचा प्रत्यक्ष संबंध नसला, तरी त्यांच्यात एक वैचारिक अनुबंध आहेच. ही असभ्यता व हा ओंगळपणा थांबविण्यासाठी आपली जरब वापरण्याऐवजी मोदी त्यांच्या सुरात सूर मिसळून स्वत:च नेहरू व गांधींपर्यंत शिवीगाळ करायला पोहचत असतील; तर त्यांना हीच परंपरा जिवंत ठेवायची आहे, असा अर्थ काढता येतो. टीका अंगलट येत असूनही अशा दिवंगत व्यक्तींच्या चारित्र्याबाबत चर्चा घडविणे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणे; एवढेच नव्हेतर, पुरावे नसतानाही त्यांच्या नावे यंत्रणेच्या दुरुपयोगाचा आरोप करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे.सामान्य माणसे, जनता, देश व एकूणच जागतिक लोकमत यांना हे न पचणारे आहे. मात्र तीच परंपरा डोक्यात घट्ट बसवून घेतलेल्यांना तसल्या घाण शिवीगाळीवरही टाळ्या वाजवता येतात आणि ती शिवीगाळ हाच आपल्या परंपरेचा पराक्रम वाटू लागतो. दु:ख, अशी परंपरा जगवण्याचे नाही. ही परंपरा लोकशाहीचेच नव्हेतर, भारतीय सभ्यतेचे सारे संकेत मोडणारी आहे, हे आहे. यातून ही निर्ढावलेली माणसे काही शिकतील अशी अपेक्षा बाळगण्यात फारसा अर्थ नाही. मात्र ही लोकशाही कधीतरी निकोप व स्वच्छ व्हावी, यासाठी ही सफाई लवकर व्हावी एवढेच येथे म्हणायचे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक