शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या घरात, मनात सध्या काय चालू आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 04:52 IST

जगभरात राहणारी मराठी माणसे काय अनुभवतात? हे परदेशस्थ आप्त नवी संकटे आणि नव्या संधी यांचा तोल कसा साधतात, याचा शोध घेणारा साप्ताहिक स्तंभ

‘अमुकतमुक हे उच्च शिक्षणासाठी परदेशी रवाना’, असे बातमीचे शीर्षक आणि सोबत गळ्यात घातलेल्या हारांच्या भाराने दबून गेलेल्या बावरलेल्या उत्साही चेहऱ्याचा एक फोटो, असे सारे वर्तमानपत्रात छापून येत असे, ते दिवस आता कितीतरी मागे गेले. 

उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून किंवा कर्ज काढून परदेशी जाणे, नोकरीच्या शोधात परदेशी जाऊन पुढे तिथेच स्थिरावणे, लग्न करून विदेशस्थ नवऱ्याच्या सोबतीने संसार थाटायला देशाचा उंबरठा ओलांडून जाणे हे सारे टप्पे मराठी मध्यमवर्गाने कधीच पार केले. आता परदेशी जाण्यात फार नवलाई उरलेली नाही, तिथे एकदा पाय रुजले की, तिथेच स्थिरावण्यातही फार अपूर्वाई वाटेनाशी झाली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे असे स्थलांतर करणाऱ्या आधीच्या पिढ्यांनी विदेशी भूमीत सोसलेला सक्तीचा एकटेपणा आता पूर्वीइतका टोचत नाही.कारण?- अर्थातच टेक्नॉलॉजी.  

भारतात राहिलेले आई-वडील-भावंडे हल्ली सदासर्वकाळ रोज व्हिडीओ कॉलवर दिसतात-बोलतात. पूर्वी ‘स्वदेशातल्या जीवलगांशी संपर्क करता येत नाही’,  हे परदेशस्थ काळजातले दुःख होते, आता ते चित्र पार उलटेपालटे होऊन अतीसंपर्क ही अनेकांसाठी अडचण होऊन बसली आहे. आपल्या ओळखीच्या चवीचे अन्न मिळत नाही, ओळखीची गाणी ऐकता येत नाहीत, सिनेमा-नाटके पाहता येत नाहीत, असे सारे वाट्याला आलेले पूर्वीचे परदेशस्थ लोक ‘माझिये जातीचा मज भेटो कोणी’, अशी आस धरून असत. तेही आता उरले नाही. 

चितळ्यांच्या बाकरवडीपासून मालवणी मसाल्यापर्यंत आणि भेळ-पाणीपुरीपासून उकडीच्या मोदकांपर्यंत सगळे युरोप-अमेरिकेत जगभरात बहुतेक ठिकाणी मिळते. महाराष्ट्र मंडळात नाटके होतात, सिनेमे आणि गाणी तर काय हातातच आली आहेत, आता मोबाइलच्या स्क्रीनमधून. नकाशावरली अंतरे कायम असली, तरी टेक्नॉलॉजीच्या मदतीने अनेक जुन्या रेषा पुसल्या गेल्या. विदेशात जाणे-राहणे यातले मानसिक ताण हलके झाले. परक्या भूमीवर ‘आपल्या माणसां’ची सोबत सहज मिळू लागली. पण म्हणून सारे प्रश्न सुटले आहेत का? - नाही. 

बदलत्या काळाने बदलत्या संधी दिल्या, जुन्या गाठी सोडवल्या, तसे नवे प्रश्नही परदेशस्थ भारतीयांच्या पदरी घातले आहेत. जगभरातले राजकीय अस्थैर्य हा भारतीय स्थलांतरितांच्या नव्या पिढ्यांसाठी गुंतागुंतीचा विषय होऊन बसला आहे. वर्क-व्हिसा, ‘ग्रीनकार्ड’सारखे दीर्घकालीन वास्तव्याचे परवाने आणि सिटिझनशिपच्या जुन्या रुळलेल्या चाकोऱ्या गेल्या वर्षभरात वेगाने मोडून पडल्या आणि आठ-दहा वर्षांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यानंतरही अनेक कुटुंबांचा पाया मुळापासून हादरला; त्याचे धक्के भारतातली अनेक मध्यमवर्गीय घरे सोसत आहेत. जे अमेरिकेत घडते आहे, त्याची चाहूल अन्य देशातल्या स्थलांतरितांनाही लागते आहेच. 

एकूणातच जग जितके जवळ आले, तितकेच दुरावताना दिसत आहे. अशा वातावरणात परदेशी वास्तव्यातल्या अनुभवांचा रंग बदलताना दिसतो का?, तिथे राहण्यातली सुख-दु:खे काय, कशी असतात? जगभरात राहणारी मराठी माणसे काय अनुभवतात?, काय विचार करतात? नवी संकटे आणि नव्या संधी यांचा तोल कसा साधतात?, हे त्यांच्याकडूनच समजून घेण्यासाठी आजपासून दर गुरुवारी ही खास जागा. 

टॅग्स :IndiaभारतVisaव्हिसा