शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

सरकार बदलल्याने खरोखर असे काय बदलते? खाडकन डोळे उघडणारे १० मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 08:41 IST

सरकारे बदलोत, मंत्री असोत-नसोत; गरिबांच्या जगण्यात काहीही फरक पडत नाही. सरकार आपले कल्याण करील, या भ्रमातून गरीब लोक बाहेर येऊ लागले आहेत!

-हेरंब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते

सध्या महाराष्ट्रात सरकार बदलामुळे आणि मंत्रिमंडळच नसल्याने ठप्प कारभाराची चर्चा होते आहे. या चर्चेत मी एक वेगळा मुद्दा मांडू इच्छितो : सरकार बदलल्याने खरेच काही बदलते का?१) सरकार बदलल्याने काही धोरणे नक्कीच बदलतील, पण प्रत्यक्ष गरिबांच्या जगण्यात हस्तक्षेप करून सरकार नावाची यंत्रणा फार काही बदल घडवू शकते का? - प्रत्यक्ष अनुभव निराशाजनक!२) प्रशासकीय यंत्रणेचा पगार, पेन्शन आणि कर्जावरील मुद्दल व  व्याज यावर बजेटमधील ६० टक्केपेक्षा जास्त रक्कम खर्च होते. उरलेल्या रकमेत खरेच गरिबांचे आयुष्य बदलण्याचे सरकारने ठरवले तरी शक्य आहे का? 

३) गरिबांच्या विकास योजनांमध्ये ठेकेदारीला प्राधान्य असते.  योजनांची रचनाच ठेकेदारांना फायदा व्हावा अशी असते. विकासकामांचा दर्जा  अत्यंत खालावलेला राहतो.  ४)  गरीब कुटुंबासाठी रेशनचे धान्य, घरकुल सोडता थेट लाभाच्या योजना अतिशय कमी आहेत.  शिक्षण, आरोग्य, अंगणवाडी, परिवहन या सरकारी सुविधा सक्षम नाहीत. त्यामुळे गरीब निरुपायाने खासगी व्यवस्थेकडे वळतात. ही व्यवस्थाही गरिबांचे शोषणच करते.५)  रोजगार हमीसारखी थेट रोजगाराची योजना सोडली तर स्वयंरोजगाराच्या अन्य योजना हास्यास्पद आहेत. लाभार्थी निवडण्यात राजकीय हस्तक्षेप खूप मोठा असल्याने स्वयंरोजगाराला फारसा प्रतिसाद मिळत नाही. महिला बचत गटांना मदतीची तरतूदही दिवसेंदिवस कमी होते आहे. सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाने गरिबांच्या रोजगारासाठी फार प्रयत्न केलेले दिसत नाहीत. ६) गरिबांना दिल्या जाणाऱ्या थेट आर्थिक लाभाच्या योजना अत्यंत केविलवाण्या आहेत. संजय गांधी निराधार योजनेत फक्त १००० रुपये पेन्शन दिले जाते. मुले मोठी झाली की पेन्शन बंद होते व वार्षिक उत्पन्न २१००० रुपये असेल तरच पेन्शन मिळते. ५८ रुपये रोज इतक्या कमी उत्पन्नात महाराष्ट्रात एकही कुटुंब सापडणार नाही. गरिबांना लाभ मिळूच नये, अशी त्या योजनेची रचना आहे. दुसरीकडे आमदारांना ५ वर्षे काम केले तरी तहहयात पेन्शन!  गरिबांना १००० रुपये द्यायचे, तर हजार अटी! 

७) गरीब कुटुंबातील एखादी व्यक्ती अकस्मात मृत्यू पावली तर त्या कुटुंबाला २० हजार रुपये देण्याची केंद्राची योजना आहे. या योजनेत दारिद्र्यरेषेचे कार्ड सक्तीचे आहे. मात्र दारिद्र्यरेषेची यादी २००७ नंतर पुढे सरकलीच नाही. त्यामुळे योजनांची फक्त घोषणा, पण अंमलबजावणी नाही, असे अनेक योजनांबद्दल आहे.

८) दलित, आदिवासी, भटके विमुक्त यांचे जीवनमान फारसे उंचावले नाही. भटक्या विमुक्तातील अनेक कुटुंबे आजही गावोगाव फिरतात, त्यांना घरे नाहीत की त्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत. सरकार वाढीव आर्थिक तरतूद त्यांच्यासाठी करत नाही. कातकरी, माडियांसारखे आदिवासी समूह, शहर-खेड्यातील दलित कुटुंबे व सर्वच गरिबांची स्थिती विदारक आहे. सरकार बदलल्याने या वंचितांना काहीच बदल अनुभवायला मिळत नाही.९) गरिबांसाठी वाढीव तरतूद करणे सोडाच, पण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय यांचे दडपण वाढत्या नागरीकरणामुळे सरकारवर वाढते आहे. त्यातून बुलेट ट्रेन काढाव्यात, समृद्धी महामार्ग, सी लिंक, मोठे पूल यावर आज तरतूद वाढते आहे. ती गरज असेलही, पण प्राधान्यक्रमात ते खूप मागे असायला हवे.१०) आदिवासी किंवा गरीब वस्तीत एक तर सरकारी योजना माहिती नसतात. माहिती मिळाली तर कागदपत्रे नसल्याने वैतागून अनेकजण नाद सोडतात. फक्त राजकीय कार्यकर्त्यांच्या जवळच्या व्यक्तींना लाभ मिळतात असेच दिसून आले आहे. यातून गरिबांनी सरकारचा नादच सोडून दिला आहे.  जमेल तोपर्यंत गावात कष्ट करायचे आणि गुजराण होणे थांबले  की सरळ तिथून स्थलांतर करायचे. ऊसतोडीला, वीटभट्टीला किंवा बांधकामावर अथवा शहरात कामाला निघून जायचे अशी जीवनशैली गरिबांनी स्वीकारली आहे. सरकारी व्यवस्था गावातल्या गरिबांना जगवत नाही याचा “स्थलांतर” हा महत्त्वाचा पुरावा आहे.

कितीही सरकारे बदलोत, मंत्री असोत की नसोत, गरीब जनतेला हे माहीत आहे की याने आपल्या जीवनात काहीही फरक पडणार नाही. सरकार आपले कल्याण करील, या भ्रमातून गरीब लोक बाहेर येतानाच मला तरी दिसतात. आजच्या ग्रामीण दारिद्र्याचे कठोर वास्तव आहे...herambkulkarni1971@gmail.com

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे