शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

‘त्या’ तलाठ्याने असे काय ‘घोडे’ मारले?

By गजानन दिवाण | Published: January 01, 2018 12:40 AM

अनेक ठिकाणी जायला वाहतुकीची साधने नाहीत. एका शेतातून दुसºया शेतात जायचे असेल, तर दुचाकीही वापरता येत नाही. एका तलाठ्यावर किमान तीन ते पाच गावांचा भार. त्यातही वाहतुकीचे हे हाल. मग वेळेत पंचनामे कसे होणार? हाच विचार करून शेतकºयानेच एखाद्या तलाठ्याला स्वत:चा घोडा दिला, तर बिघडले कुठे? मुळात औरंगाबाद जिल्ह्यातील आंचलगावात हेही घडले नाही.

भारत हा आज दुचाकी-चारचाकींचा देश झाला आहे. कधी काळी तो अश्वराष्ट्र म्हणून ओळखला जायचा. प्रत्येकाच्या घरी घोडा असायचा. घरातील वाहक म्हणून त्याचाच वापर होत असे. घरात घोडा असणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे. पाटलांची पाटीलकी आणि जहागीरदारांची जहागिरी या घोड्यावरूनच चालत असे. एवढेच काय १९व्या शतकापर्यंत मुंबईतील प्रवासी वाहतूकही छकडा, टांगा आणि पालखीतूनच व्हायची. पुढे मुंबईचा पसारा वाढत गेला तशी घोड्यांची जागा टॅक्सीने आणि आपल्या घरातील जागा दुचाकी-चारचाकीने घेतली. एकूणच काय तर आम्हा माणसांना घोड्यांचा वापर नवा नाही. मानवाने घोडे माणसाळवून त्यांचा वाहन म्हणून अगदी प्राचीन काळापासून उपयोग केला आहे. घोड्यांचा एवढा मोठा इतिहास आपल्या पाठीशी असताना औरंगाबाद जिल्ह्यातील आंचलगाव येथे तलाठी आणि कृषी सहायकाने घोड्यावर बसून कापसाचा पंचनामा केल्याचे वृत्त सर्वत्र चवीने चघळले गेले.राज्यात जवळपास ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस हे पीक आहे. मराठवाडा आणि विदर्भात बोंडअळीने सगळेच्या सगळे कापसाचे क्षेत्र बाधित झाले आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्राचे पंचनामे कसे करायचे यावरून तलाठ्यांच्या स्तरावर मोठा गोंधळ उडाला. पूर्वी तलाठी सज्जावरच पंचनामे झाल्याच्या नोंदी करण्याची पद्धत सर्रासपणे चालायची. आता त्यासाठीचे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे तलाठ्याला त्या शेतात जाणे अपरिहार्य झाले. पूर्वी खेडोपाडी शेतकरी तलाठ्याला गाठायचे. यंदा पहिल्यांदाच पंचनाम्यासाठी तलाठी बाहेर पडले. कधी नव्हे ते शेतीच्या बांधावर दिसले. अनेक ठिकाणी जायला वाहतुकीची साधने नाहीत. बºयाच ठिकाणी रस्ते नाहीत. आहेत त्या रस्त्यांची स्थिती फारशी चांगली नाही. एका शेतातून दुसºया शेतात जायचे असेल, तर दुचाकीही वापरता येत नाही. एका तलाठ्यावर किमान तीन ते पाच गावांचा भार. त्यातही वाहतुकीचे हे हाल. मग वेळेत पंचनामे होणार कसे? पंचनामे नाही झाले, तर नुकसान कोणाचे? हाच विचार करून शेतकºयानेच एखाद्या तलाठ्याला पंचनामे करण्यासाठी स्वत:चा घोडा दिला, तर बिघडले कुठे?पूर्वी कार्यालयात बसून कागदीघोडे नाचवून पंचनामे केले जायचे. त्यामुळे काय व्हायचे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुळात औरंगाबाद जिल्ह्यातील अंचलगावात हेही घडले नाही. ज्या शेतकºयाच्या शेतात हे पंचनामे झाले त्या शेतकºयाने अलीकडेच हा घोडा खरेदी केला होता. आपल्या घोड्यावर बसून ‘साहेब’ खूश झाले, तर पंचनाम्यात फायदाच होईल, हाही त्यामागचा स्वार्थ. पंचनाम्यासाठी आलेल्या दोन्ही साहेबांना या घोड्यावर बसविले. त्यांचे फोटो काढले. दुसºया दिवशीची सकाळ उजाडेपर्यंत दोघेही खूश. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल काय झाले आणि साहेबांची घोडेस्वारी मुंबईपर्यंत पोहोचली. शेतकºयाने आपला मोबाईल स्वीच आॅफ करून टाकला. इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिवसभर ब्रेकिंग लावून धरल्याने उपविभागीय अधिकाºयांनी नोटीस बजावली. तिकडे कृषिमंत्र्यांनीही चौकशी समिती नेमण्याची घोषणा करून बातम्यांमध्ये जागा मिळविली. नैसर्गिक आपत्तीची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांना हेलिकॉप्टर-विमान चालते, मग तलाठ्यांना घोडा का नाही... इथपासून ते शेतकºयांच्या जखमांवर अधिकाºयांनी घोड्यावर बसून मीठ चोळले... इथपर्यंत चर्चा झडल्या. प्रत्यक्ष वास्तव कोणीच समजून घेतले नाही. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार