शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

हवामानाचे अंदाज चुकतात कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 05:57 IST

हवामान खात्याचे चुकलेले अंदाज ही एक खिल्ली उडवण्याची बाब आहे. हे अंदाज का आणि कसे चुकतात? ते मिळवले जातात, ...

हवामान खात्याचे चुकलेले अंदाज ही एक खिल्ली उडवण्याची बाब आहे. हे अंदाज का आणि कसे चुकतात? ते मिळवले जातात, ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने नेहमीच उत्सुकतेची बाब असते.आजमितीस जगभरात हवामान व पावसाचे अंदाज मिळवण्यासाठी सर्वत्र संगणकीय व्यवस्थेचा वापर होतो. अवकाशातील उपग्रहांद्वारे मिळालेली माहिती या संगणकांना पुरविली जाते. कोणताही संगणक त्यास दिल्या जाणाऱ्या प्रणालीनुसार कार्य करीत असतो. पृथ्वीवरील हवामान आधीच्या अनेक वर्षांत कोणत्या परिस्थितीत (कंडिशन्स) कसे होते, याची माहिती संगणकाला पुरवलेली असते. त्याआधारे व आताच्या हवामानाची स्थिती काय आहे, याचा तपशील संगणकाला मिळाल्यानंतर संगणक भविष्यातील हवामान व पाऊस कसे असेल याचा अंदाज व्यक्त करतो. परंतु आपला निसर्ग हवामानातील लहान बदलांबाबतही खूप संवेदनशील आहे. परिणामी, जर संगणकांची प्रणाली लिहिताना जर काही चूक झाली तर हवामानाचे अंदाज पण चुकणार आहेत.निसर्गात एकाच वेळेला अनेक घटक कार्यरत असतात. कुठल्या घटकाला किती महत्त्व द्यायचे हे ठरवित असताना अनेकदा चुका होत असतात. उदा. समुद्राच्या पाण्याचे तापमान, त्यातून निर्माण होणारी वाफ, समुद्रातील हिमसाठा व अन्य घटक. दोन्ही ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत असल्याने पाण्याचे तापमान स्थिर राहत नाही. वातावरणातील कार्बनडाय आॅक्साइडचे प्रमाण सतत वाढत आहे. परिणामी तापमानवाढ वेगाने होत आहे. या तापमानवाढीमुळे हवामानात जीवनास धोकादायक बदल होत आहेत. हे बदल संगणकाची प्रणाली तयार करताना त्यात समाविष्ट केलेले नाहीत. परिणामी, हवामानाचे अंदाज चुकीचे ठरत आहेत. याचे उत्तम उदाहरण नुकत्याच अमेरिकेत आलेल्या मायकेल वादळाचे आहे. तेथे खूप प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असूनही, या वादळाची तीव्रता अचानक इतकी वाढली की नागरिकांना या वादळाच्या धोक्याची सूचना फक्त काही तासच आधी देण्यात आली. परिणामी, अजून २ हजार लोक घरांच्या ढिगाºयाखाली अडकले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत १८ जण या वादळांत मरण पावले आहेत. तरी सुमारे ३० लाख लोकांनी स्थलांतर केले होते.कार्बन वायू सूर्याकडून आलेली उष्णता पृथ्वीवर येऊ देतो, मात्र रात्री ही वातावरणातील दिवसा शोषलेली उष्णता काही प्रमाणात अडवून ठेवतो व त्यामुळे शोषलेली उष्णता पूर्णपणे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर पडत नाही. परिणामी, पृथ्वीवरचे तापमान वाढते. या तापमानवाढीमुळे हवामानात झालेले बदल जीवनास हानिकारक आहेत. तापमानवाढ रोखण्यासाठी मानवाने फोसील इंधनाचा वापर पूर्णपणे थांबविणे आवश्यक आहे. म्हणून सोलार, विंड व समुद्र लाटांपासून पुन्हा पुन्हा निर्मित होऊ शकणारी ऊर्जा वापरणे अत्यावश्यक झाले आहे. वातावरणातील कार्बनचे प्रमाण ३५० पेक्षा जास्त असणे हानिकारक असते. आताच हे प्रमाण ४१० पीपीएम एवढे झाले आहे. परिणामी, आताच आपण यावर सारासार विचार करत हवामानाचा अंदाज देताना प्रामुख्याने सर्व अंगाने विचार केला पाहिजे.- शिरीष मेढी । पर्यावरणशास्त्र अभ्यासक

टॅग्स :environmentवातावरण