शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात मुली हव्यात, मग महाराष्ट्रालाच का नकोशा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 13:06 IST

Maharashtra News: पाच वर्षांपूर्वी राज्यात एक हजार मुलांच्या तुलनेत ९२४ मुली होत्या ती संख्या आणखी घटून आता एक हजार मुलांमागे केवळ ९१३ मुली आहेत.

- राही भिडे(ज्येष्ठ पत्रकार) 

स्त्रिया आणि पुरुष यांची संख्या जवळपास समान असेल तर समाज स्वास्थ्यासाठी ही समाधानकारक घटना मानावी लागेल. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण अहवालानुसार देशात प्रथमच महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक झाले आहे; पण सामाजिक प्रगतीचे आणि पुढारलेपणाचे गोडवे गाणाऱ्या महाराष्ट्रात मात्र महिलांचे प्रमाण कमी व्हावे, ही चिंतेची बाब आहे. गेल्या आठवड्यात दोन अहवाल जाहीर झाले. त्यातील एक अहवाल सुखावह, तर दुसरा अहवाल संताप वाटावा असाच आहे. देशात प्रथमच महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक झाले असून, लोकसंख्या वाढीचा दरही कमी झाला आहे. एकीकडे हे सुचिन्ह असताना  महाराष्ट्राची मान शरमेने खाली जावी असे चित्र दुर्दैवाने पुढे आले आहे. बीड, जळगाव, सांगलीसारख्या ठिकाणी  लिंगनिदान करण्याचे आणि मुलीचा गर्भ खुडण्याचे काम अजूनही सुरू आहे. हरयाणा, राजस्थान आदी राज्यांत मुलींचे प्रमाण वाढत असताना  महाराष्ट्रातील ही स्थिती लाजिरवाणी आहे. देशात आता दर एक हजार पुरुषांमागे एक हजार वीस महिला आहेत. प्रजनन दरही कमी झाला आहे. महाराष्ट्रात मात्र मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या आणखी घटल्याची माहिती राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य  सर्वेक्षणात देण्यात आली आहे. मुलींच्या आकडेवारीत पुण्यात सर्वांत मोठी घट दिसते, तर इतर तब्बल १७ जिल्ह्यांतही मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या घटली आहे.  पाच वर्षांपूर्वी राज्यात एक हजार मुलांच्या तुलनेत ९२४ मुली होत्या ती आकडेवारी आणखी घटून एक हजार मुलांमागे केवळ ९१३ मुली आहेत. पुणे, हिंगोली, औरंगाबाद, भंडारा, मुंबई, बीड, जालना, जळगाव जिल्ह्यात मुलींची संख्या नऊशेच्या खाली आली आहे. औरंगाबादेत तर ही आकडेवारी आणखी घटून ८७५ वर आली आहे.  भंडाबीड, हिंगोलीतही हा फरक वाढत गेला आहे. अमरावती, गडचिरोली, धुळे, उस्मानाबाद या जिल्ह्यांनी मात्र ‘बेटी बचाव’चा नारा सार्थ ठरविला आहे. अमरावतीत एक हजार मुलांमागे एक हजार ९० मुली आहेत, गोंदिया, कोल्हापूर, लातूरमध्ये मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे.भारतीय स्त्रीच्या आयुष्यात जन्माला येणाऱ्या मुलांची सरासरी संख्या २.२ वरून दोनवर आली आहे. गर्भनिरोधकांचा वापर ५४ टक्क्यांवरून ६७ टक्क्यांवर पोहोचला आहे, ही लोकसंख्या नियंत्रणासाठी एक महत्त्वाची उपलब्धी मानली पाहिजे. महिला सक्षमीकरणाच्या उपाययोजनांनी काही ठिकाणी योग्य दिशेने वाटचाल केली आहे. २०१५-२०१६ मध्ये देशात एक हजार पुरुषांच्या तुलनेत ९९१ महिला होत्या. मात्र, आता महिलांनी संख्येच्या बाबतीत पुरुषांना मागे टाकले आहे.  केवळ महिलांची संख्याच वाढते आहे, असे नाही, तर त्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. सरकार कुणाचे असावे, हे ठरविण्याइतकी जागरूकता त्यांच्यात आली आहे. पूर्वी पती, वडील, भावाला विचारून मतदान करण्याची मानसिकता आता राहिलेली नाही. महिलांच्या वाढत्या मतदानाची खरी चुणूक उत्तर प्रदेशातील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली. राज्यातील ६३ टक्के महिलांनी मतदान केले होते. यापूर्वी कर्नाटक विधानसभेसाठी ५९ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता.मतदानप्रसंगीच्या महिलांच्या मानसिकतेची कल-चाचणी करण्यास राजकीय पक्षांनी सुरुवात केली. डिसेंबर २०१८ मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी असा प्रयोग करण्यात आला. विशेषत: करौली मतदारसंघात, त्यावेळी ७५ टक्के महिलांनी स्वतंत्रपणे मतदान करणार असल्याचे सांगितले होते. राजस्थानातील हे परिवर्तन राजकीय पक्षांसाठी धक्कादायक ठरले.याचा अर्थच असा की, ज्या महिला २००८-०९ मध्ये ‘मत देताना पतीचा सल्ला घेईन’ असे सांगायच्या, त्या आणि नंतरची युवा पिढी मतदानाविषयी पुरेशी सजग बनली आहे. महिलांची राजकीय जागरूकता पाहून तर प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश  विधानसभेच्या निवडणुकीत महिलांना ४० टक्के जागा देण्याचे जाहीर केले आहे. महिलांची प्रगती आणि ही जागरूकता पाहता त्यांना कायम दुय्यम स्थान देण्याची पुरुषी मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे.rahibhide@gmail.com

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र