शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

विघ्नहर्त्याचे गुण अंगी बाणवायला हवेत

By विजय दर्डा | Published: September 17, 2018 6:17 AM

विघ्नहर्ता आपल्याला काही तरी नवे करण्याचा संदेश देत असतो.

सध्या गणेशोत्सव सुरू आहे. भगवान श्रीगणेशाच्या आराधनेच्या या पावन पर्वाने वातावरणात उत्साह, ऊर्जा व अपेक्षांचा संचार झाला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने आसमंत दुमदुमून जात आहे. समाजातील हा उत्सवी उत्साह पाहून मनाला खरेच खूप बरे वाटते. उत्साह व रसरशीतपणा हेच तर जीवनाचे सारतत्त्व आहे. जीवनात उत्सव व उत्साह नसेल तर जीवन सुनसान वाटेल. म्हणूनच आपल्या पूर्वजांना सण आणि उत्सवांची कल्पना सुचली असावी.मी जेव्हा एखादा उत्सव साजरा करतो तेव्हा माझ्या मनात विचारचक्र ही सुरू असते. या सण आणि उत्सवांच्या मागे व्यावहारिक व वैज्ञानिक विचार काय असावा, याचा मी शोध घेत असतो. या उत्सवांमागे काही संदेश देण्याचा विचार आहे का याचा मी धांडोळा घेत असतो. असा काही संदेश असेल तर तो आपण आचरणात आणतो का, याचाही विचार करतो. गणपतीबद्दलच बोलायचे तर कोणत्याही शुभकार्याचा आपण श्रीगणेशा केला असे म्हणतो. एवढेच नव्हे, तर कोणत्याही शुभकार्याचा आरंभ श्रीगणेशाच्या पूजनानेच केला जातो. म्हणजेच हा विघ्नहर्ता आपल्याला काही तरी नवे करण्याचा संदेश देत असतो. आणखी विस्ताराने असे म्हणता येईल की, हा गौरीनंदन आपल्याला इनोव्हेशनची प्रेरणा देतो. आजच्या काळात ही एक मोठी गरजही आहे. इनोव्हेशनच आपल्या समाजाला व देशाला प्रगतिपथावर घेऊन जाईल. मुलांनी इनोव्हेटिव्ह होण्यासाठी त्यांना या गजमुखाची आराधना करण्यास शिकवायला हवे.गणपती ही बुद्धीचीही देवता मानली जाते. तो विघ्नहर्ता म्हणजे संकटे, अडचणी दूर करणारा आहे, असेही मानले जाते. बुद्धिमत्ता प्रखर असेल तर समस्यांवर सहज मात करता येते, हाच संदेश यातून मिळतो. गणपतीची आराधना करताना केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर आपल्या मुलाबाळांनाही सुबुद्धी मिळण्याची कामना आपण करायला हवी. प्रत्येक मूल शिकले-सवरले व बुद्धिमान झाले तर देशापुढे कितीही संकटे आली, तरी त्यांचे निराकरण करण्यात कोणतीच अडचण येणार नाही. गणपती हा गणाधिपतीही असल्याने तो आपल्याला नेतृत्वगुणही शिकवितो.गणपती हा मंगलमूर्तीही आहे. त्याला हे नाव का पडले असावे, याचा आपण कधी विचार केला आहे? गणपतीच्या शरीराकडे जरा बारकाईने पाहिलेत तर लक्षात येईल की, त्याचे डोके शरीराच्या मानाने खूप मोठे आहे. ज्याचे डोके मोठे असते त्याची बुद्धिमत्ता प्रखर असते, अशी कल्पना आहे. त्याच्यात कमालीची नेतृत्व क्षमताही असते. प्रत्येकाने मन मोठे ठेवावे व कोता विचार करू नये, हाच संदेश यातून मिळतो. गणपतीचे डोळे लहान आहेत. लहान डोळे चिंतनशील व्यक्तीचे द्योतक असतात. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहा, पारखून घ्या, असेच ते सुचवितात.गजकर्ण हे गणपतीचे आणखी एक नाव आहे. हे नाव त्यास त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कानांमुळे पडले आहे. त्याचे कान हत्तीचे आहेत. अन्य कोणत्याही देवी-देवतेचे कान असे नाहीत. लांब, मोठे कान असलेली व्यक्ती भाग्यवान मानली जाते. सर्व जगाचे ऐकून घ्या, हाच संदेश जणू हे कान देतात. तुम्ही इतरांचे ऐकले नाही तर तुम्हाला जगाची माहिती होणार कशी? ऐकलेच नाही तर संवाद तरी कसा साधणार? इतरांचे मत तुम्हाला कसे कळणार? लोकशाही परंपरा जपण्यासाठी तर हा संदेश खूपच महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने हल्ली इतरांचे ऐकण्याची वृत्तीच कमी होत चालली आहे. प्रत्येक जण फक्त आपलेच म्हणणे ऐकवत असतो. अशा वेळी गणेशजींकडून मिळणारा हा संदेश मोलाचा आहे. गणपतीची सोंडही आपल्याला नेमका संदेश देते. हत्तीची सोंड कधीच स्थिर राहत नाही, हे आपण पाहिले असेल. हे सक्रियतेचे प्रतीक आहे. आयुष्यभर सक्रि य राहणाऱ्या माणसाच्या वाट्याला संकटे येत नाहीत.आता जरा गणपतीचे पोट निरखून पाहा. या पोटामुळेच त्याला लंबोदर म्हटले जाते. इतरांचे अनेक अवगुण, अपराध क्षमाशीलतेने पोटात घालण्यासाठीच हे पोट एवढे मोठे आहे. चुगलीखोरांपासून चार हात दूर राहा, असेच ते आपल्याला सुचविते. चुगल्यांमुळे जीवनात अनेक संघर्षाचे प्रसंग येतात. अनेक गोष्टी पचविणे हेच सुखी आयुष्याचे इंगित आहे. गणपती हा एकदंत आहे. भगवान परशुरामाने गणपतीचा एक दात तोडला, असे सांगितले जाते. पण कमाल बघा, की त्याच तुटलेल्या दाताची गणपतीने लेखणी बनविली. तर अशा या सकलगुणसंपन्न श्री गणेशाच्या या आराधना पर्वाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. गणरायाचे गुण आणि त्याच्याकडून मिळणाºया संदेशांचे जीवनात अनुकरण करा व आपल्या मुलाबाळांवरही त्याचे संस्कार करा.

(लेखक लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन आहेत.)

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव