शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

पाणी मुबलक, पण जलनियोजनाअभावी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 02:20 IST

अ‍ॅमस्टरडॅम शहरापेक्षा दिल्लीतील दरडोई पाण्याचा वापर जास्त आहे. चीनची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त असूनही तेथे पाण्याचा वापर भारतापेक्षा २८ टक्क्याने कमी आहे. भारतात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे पण तरीही आपल्याला जलसंकटाचा सामना करावा लागतो. देशातील उपलब्ध पाण्याच्या साठ्यापैकी ८० टक्के पाणी हे शेतीसाठी वापरले जाते.

- डॉ. भारत झुनझुनवाला(अर्थशास्त्राचे अध्यापक)अ‍ॅमस्टरडॅम शहरापेक्षा दिल्लीतील दरडोई पाण्याचा वापर जास्त आहे. चीनची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त असूनही तेथे पाण्याचा वापर भारतापेक्षा २८ टक्क्याने कमी आहे. भारतात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे पण तरीही आपल्याला जलसंकटाचा सामना करावा लागतो. देशातील उपलब्ध पाण्याच्या साठ्यापैकी ८० टक्के पाणी हे शेतीसाठी वापरले जाते. जी झाडे अधिक पाणी पितात त्याचीच लागवड भारतातील शेतकरी करीत असतात. महाराष्ट्रातील द्राक्षे, उत्तर प्रदेशातील ऊस आणि राजस्थानमधील लाल मिरची ही अधिक पाणी लागणारी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यांना लागणाऱ्या जास्तीच्या पाण्यामुळेच आपल्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नद्यातून वाहणारे पाणी आपण अडवून कालव्याद्वारे शेतीला देत असतो. याशिवाय आपण भूगर्भातील पाण्याचा उपसा विजेच्या पंपाचा वापर करून मोठ्या प्रमाणात करीत असतो. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दर वर्षाला एक मीटरने खाली जात आहे.शेतीला कालव्याद्वारे जे पाणी दिले जाते त्याची मीटरने कोणतीही मोजणी होत नाही. शेतकºयाच्या शेतीच्या आकारमानानुसार शेतकºयाकडून पाण्याच्या वापरासाठी स्थायी रक्कम घेण्यात येते. त्यामुळे शेतकरीसुद्धा अधिक पाणी लागणारी पिकेच घेत असतो. पाण्याचे मोजमाप होत नसल्याने शेतकरी गरजेपेक्षा जास्त पाण्याने शेती भिजवीत असतो. त्या अधिक पाण्याने अधिक पीक मिळण्याची अजिबात शक्यता नसते. याशिवाय विजेच्या पंपाने पाण्याचा उपसा करण्यासाठी लागणारी वीजही शेतकºयांना विनामूल्य देण्यात येते. त्यामुळे विजेचा वापरही जास्त होतो. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकºयांना शेतीसाठी मीटरने पाणी दिले जावे. त्यामुळे शेतकरी पाण्याचा मर्यादित वापर करण्यास शिकतील. तसेच शेतकºयांना विजेच्या पंपासाठी मिळणारी सबसिडी हटवली पाहिजे. विजेसाठी पैसा मोजावा लागला की शेतकरी पंपाद्वारे पाण्याचा उपसा कमी करेल. त्यामुळे भूगर्भातील पाण्याचे साठे लवकर संपणार नाहीत. द्राक्षे, ऊस आणि मिरचीचे पीक घेणे शेतकºयांसाठी किफायतशीर ठरणार नाही. तसेच शेतीसाठी होणाºया पाण्याच्या वापरातही मोठ्या प्रमाणात घट होईल.सध्या भारतातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कारण त्याने उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्याचे संकट दूर करण्यासाठी शेतमालाला अधिक भाव दिला पाहिजे. समजा उसाचा उत्पादन खर्च दर क्विंटलसाठी रु. २५० असेल तर सरकारकडून त्याची विक्री किंमत रु. ३०० प्रति क्विंटल ठेवण्यात येते. पण त्याच्या उत्पादन खर्चात काही कारणांनी वाढ झाली तर सरकारने खरेदी मूल्यातही तेवढीच वाढ करून शेतकºयांना दिलासा दिला पाहिजे. तसे केल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडणार नाही. पण अशा परिस्थितीत साखर विकत घेणाºया शहरी ग्राहकाला साखरेसाठी अधिक पैसे मोजावे लागतील.आपल्याला साखर स्वस्तात हवी की पाणी मुबलक हवे याचा विचार शहरी जनतेने करायला हवा. अशावेळी शेतकºयांना पाण्यासाठी अधिक पैसे मोजायला लावणे भाग पडेल आणि शहरी ग्राहकांनाही साखरेसाठी अधिक मूल्य चुकविण्याची तयारी करावी लागेल. त्यामुळे शेतीसाठी पाण्याचा वापर कमी होईल व परिणामी पिण्यासाठी व वापरासाठी अधिक पाणी उपलब्ध होईल. एकूणच हे जलसंकट कमी करण्याचा मार्ग शहरी लोकांच्या हातात आहे.टेहरी धरण किंवा भाकरानांगल धरण यासारखी मोठी धरणे बांधून आणि पाण्याचा अधिक साठा करून आपण पाण्याचे संकट अधिक तीव्र केले आहे. मोठ्या धरणातील पाणी बाष्पीकरणामुळे नाहीसे होत असते. त्यामुळे मोठ्या धरणातील पाणी वापरले न जाताच कमी कमी होत असते. मोठ्या धरणामुळे पुराचे संकट कमी झाले आहे. पण पूर आला की पाणी जमिनीवर पसरून जमिनीत अधिक प्रमाणात मुरते. त्यामुळे गूभगर्भातील जलसाठ्यात वाढ व्हायला मदतच होत असते. याचाच अर्थ पूर कमी होणे म्हणजे जमिनीचे जलभरण थांबणे आणि सिंचनासाठी शेतीला कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होणे होय. मोठ्या धरणांमुळे पाण्याच्या उपलब्धतेच्या संदर्भात विपरीत परिणाम पहावयास मिळतात. पण मोठ्या धरणांचा दुसरा फायदा हा आहे की धरणात साठवलेले पाणी कालव्यांच्या माध्यमातून शेतीला बाराही महिने मिळत राहते. तेव्हा या फायद्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. पण दुसरीकडे धरणातील पाण्याचा मोठा पृष्ठभाग वातावरणात खुला राहात असल्याने बाष्पीकरणामुळे जलसाठा कमी होत असतो. तसेच पुरामुळे पूर्वी जमिनीतील पाण्याच्या पातळीत जी वाढ व्हायची ती थांबल्यामुळे भूगर्भातील पाण्याचा उपसा करून ते पाणी शेतीसाठी वापरणे दिवसेंदिवस दुरापास्त होत आहे. याला तोंड देण्यासाठी शेततळी हा उत्तम पर्याय आहे (महाराष्ट्रात याचे चांगले परिणाम पहावयास मिळत आहेत.) याशिवाय लहान लहान पाण्याच्या ओहोळांवर लहान बंधारे बांधून पाणी साठवणे हाही भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी लाभदायक पर्याय ठरू शकतो. या पद्धतीमुळे आपण पाण्याचे अधिक साठे निर्माण करू शकतो. पावसाळ्यात अशातºहेने शेतात आणि लहान लहान बंधाºयात पाणी साठवले तर पाण्याच्या उपयुक्त साठ्यात वाढ होण्यास मदत होऊ शकेल.उत्तर प्रदेशात या तºहेच्या लहान लहान बंधाºयामुळे आणि शेततळ्यांमुळे ७५ बिलियन क्युबिक मीटर पाणी जमा होऊ शकले आहे. हे पाणी टेहरी धरणात जमा होणाºया पाण्याच्या तीसपट अधिक आहे. एकूणच पाण्याचा संयमित वापर हेच पाणीटंचाईला तोंड देण्याचे उत्तम साधन आहे. शहरात राहणाºया नागरिकांनी शेती उत्पादनासाठी अधिक किंमत देण्याची तयारी ठेवली तर शेतकºयांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील. सध्या कमी किमतीत साखर मिळण्यासाठी पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागतो. तेव्हा वापरासाठी अधिक पाणी मिळण्यासाठी नागरिकांनी साखरेसाठी अधिक मोल देण्याची तयारी ठेवायला हवी. त्यामुळे शेतकºयांचे प्रश्न आणि पाणीसंकट दोन्हीचा सामना करणे शक्य होईल.

टॅग्स :DamधरणWaterपाणी