शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

दीवार !

By सचिन जवळकोटे | Published: October 11, 2020 8:18 AM

लगाव बत्ती...

- सचिन जवळकोटे

‘थोरले काका बारामतीकर’ जिल्ह्यात येऊन गेल्यानंतर दुस-याच दिवशी ‘घड्याळ’वाल्यांचा दूत ‘अकलूज’ला रवाना होतो. ‘शिवरत्न’वर ‘थोरले दादा अकलूजकर’ यांना भेटून ‘इस्लामपूर’च्या ‘जयंतदादां’चा संदेश देतो, ज्यात स्पष्टपणे ‘घरवापसी’चं आवतन असतं. विशेष म्हणजे लगेच चार दिवसांत अकलूजच्या कारखान्याला राज्यात सर्वाधिक म्हणजे तेहतीस खोक्यांची ‘गॅरंटी’ही मिळते. हे सारे चमत्कार केवळ ‘बारामतीकर सरकार’मध्येच शक्य होतात. आहे की नाही गंमत.. लगाव बत्ती.

थोरले काका... थोरले दादा!

 गेल्या वर्षी ‘लोकसभा इलेक्शन’पूर्वी पक्षांतर निर्णयासाठी ‘शिवरत्न’वर कार्यकर्त्यांचा मेळावा भरलेला. याचवेळी ‘भोसे’चे ‘राजूबापू’ हे ‘पक्षातच थांबा’ हा  ‘बारामतीकरां’चा निरोप घेऊन बंगल्यावर पोहोचलेले. मात्र तो ‘सांगावा’ धुडकावून ‘धाकटे दादा अकलूजकर’ यांनी हातात ‘कमळ’ घेतलेलं. ‘अकलूजकर अन् बारामतीकर’ यांच्यातील राजकीय दरी कमी करू पाहणारे ‘बापू’ आज हयात नाहीत. दरम्यान, त्यांच्या फॅमिलीच्या सांत्वनाला नुकतेच ‘थोरले काका’ येऊन गेले अन् लगेच दुस-या दिवशी पंढरपूूरच्या जैनवाडीतील ‘पवारांचे दीपक’ पुन्हा ‘घरवापसी’ची विनवणी करण्यासाठी ‘शिवरत्न’वर गेले, किती हा योगायोग ?

 ‘दीपक’ जेव्हा ‘शिवरत्न’वर ‘थोरल्या दादां’ना भेटले, तेव्हा वातावरण तसं गंभीरच होतं. भलेही आदेश ‘इस्लामपूरच्या पाटलां’चा असला तरीही ‘सिंहांच्या गुहेत’ हात घालण्याचे काम ‘दीपक’ करत होते. ‘अजूनही वेळ गेलेली नाही, पार्टीत परत यावं. तसंच जिल्ह्यातील इतरांनाही सोबत घ्यावं’ असा निरोप त्यांनी दिला. तेव्हा ‘थोरले दादा’ मिस्किलपणे हसत म्हणाले, ‘पण मी कुठं दुसरीकडं गेलोय? थोरल्या काकांचा विषय नाही. प्रश्न केवळ त्यांच्या ‘धाकट्या दादां’चा. त्यांच्यामुळं तर आमचे रणजितदादा गेलेत ना. म्हणूनच परत येण्याचा निर्णय तेच घेणारऽऽ,’ असं म्हणत त्यांनी ‘पाटलांचा चेंडू’ हळूचपणे ‘बारामतीच्या कोर्टा’त परतवला. शक्यतो समोरच्याला कधीही न दुखविणाच्या स्वभावाला ‘थोरले दादा’ नेहमीप्रमाणं जागले. ‘नरो वा कुंजरोवा,’ याचा अर्थ ‘दीपक’ला कळाला नाही. कारण, या डायलॉगमध्ये दोन दादा होते. ‘धाकटे दादा बारामतीकर’ अन् ‘धाकटे दादा अकलूजकर’.

  असो.. ‘थोरल्या दादां’नी ज्यांच्यावर निर्णय सोपविला, ते ‘रणजितदादा’ही आपल्या आक्रमक स्वभावाला जागले. तिस-याच दिवशी ‘देवेंद्रपंतां’सोबत त्यांनी दिल्ली गाठली. ‘अमितभार्इं’ना भेटून राज्यातल्या ‘शुगर लॉबी प्रॉब्लेम’वर चर्चा केली. मग तिघांचे फोटोही छानपैकी व्हायरल झाले. (केले गेले). थोडक्यात सांगायचं तर ‘कमळ फायनल’ हा अंतिम निर्णय ‘रणजितदादां’नी शांतपणे अन् पद्धतशीरपणे ‘बारामतीकरां’च्या गोटात पोहोचविला; परंतु ‘इनकमिंग-आऊटहगोईंग’ खेळात मास्टर असलेल्या लवचिक ‘बारामतीकरां’चा कदाचित ‘अंतिम निर्णय’ या शब्दावर विश्वास नसावा. त्यांनी ‘रणजितदादां’च्या कारखान्याला सर्वाधिक ‘गॅरंटी’ दिली. कदाचित, त्यानंतर तरी ‘अकलूजकरां’ची चलबिचलता सुरू होईल हा होरा. मात्र ‘धाकटे दादा अकलूजकर’ लयऽऽ हुश्शऽऽर. ‘थोरल्या दादां’कडं ‘घड्याळा’चा ‘प्रॉब्लेम सोपवून ते रमले ‘कमळा’च्या सान्निध्यात. अशावेळी ‘दीवार’मधला डागलॉग आठवतो. ‘धाकटे दादा’ जोरात म्हणतात, ‘मेरे पास देवेंद्रपंत है, चंद्रकांतदादा है... पापाऽऽ आपके पास क्या है?’.. तेव्हा ‘थोरले दादा’ हळूच हसत उत्तरतात, ‘मेरे पास बडे काका का मेसेज है !’ मात्र ‘दीवार’ या दोन पिता-पुत्रांमध्ये नसून ‘अकलूजकर’ अन् ‘बारामतीकर’ यांच्यात आहे बरं का. लगाव बत्ती...

महेशअण्णा-तौफिकभाई चर्चा

परवा रात्रीची गोष्ट. सोलापूर रेस्टहाऊसवर ‘महेशअण्णां’ची गाडी थांबली. त्यांच्यासोबत त्यांचे एक ‘चेला मेंबर’ही उतरले. मेंबरानं बनविलेला झणझणीत डबा खाण्यासाठी ‘मोहोळ’चे ‘यशवंत आमदार’ अन् ‘वडाळ्या’चे ‘बळीरामकाका’ही थांबलेले. एवढ्यात ‘तौफिकभाई’ही विजयपूरहून थेट रेस्टहाऊसवर आले. तिघांच्या गप्पा रंगल्या. चपातीसोबत रस्सा ओरपला गेला. चर्चेसोबत ‘एमएलसी’ची मागणीही तोंडी लावण्यात आली. ‘तौफिकभाई’ मात्र ‘अपनी मेंबरशिप टिकी तो बी भौत हुवा’ म्हणत निघून गेले. महिना अखेरच्या पक्षांतर सोहळ्याची तयारी करू लागले. मात्र त्याचवेळी हैदराबादमधून सोलापूरच्या लोकांकडं मोबाईलवर प्रतिक्रिया व्यक्त झालेली, ‘गया तो गया, क्या गोल्डमेडल जीत के आयेला है क्या? अपना चालीस हजार का गठ्ठा तो फिक्स है,’ हे ऐकून ‘शाब्दीं’ना गुदगुल्या झाल्यास नवल नको.

जाता-जाता

असो. ‘महेशअण्णा’ रेस्टहाऊसवर ‘घड्याळ’वाल्यांना भेटले, ही बातमी नाही. ते आजकाल सा-याच पक्षांच्या नेत्यांना भेटतात. सा-यांकडेच तिकिटाची मागणी करतात. मात्र कुणीच त्यांना शब्द देत नाही, हे काही नवीन नाही. यात ‘ब्रेकिंग न्यूज’ हीच की बाळीवेस अन् विजापूर वेसच्या पलीकडं शिकार करण्यासाठी आसुसलेल्या ‘बारामतीकरां’ना शहरात आयतेच बकरे गवसू लागलेत. ‘हैदराबादी के सात मेंबरा पलटी मारे तो ताईको बाद में खालीपिली टेन्शन रइंगाऽऽ’ ही ‘बेस की चर्चा’च खरी बिग ब्रेकिंग. लगाव बत्ती...

(लेखक 'लोकमत सोलापूर'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील