शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनो... मी गुन्हेगार आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 06:34 IST

सिगारेट आणि तंबाखूमधील निकोटिनप्रमाणे राजकारणातील गुन्हेगार समाज व देशाच्या आरोग्यासाठी हानीकारक आहेत.

राजाभैया लफंगे आज खुशीत होता. येत्या निवडणुकीसाठी त्याचे तिकीट पक्के झाले होते. सकाळीच हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळाला... आगे बढो म्हणून. निरोप मिळताच राजाभैया कामालाही लागला. मतदारसंघात लावायचे पोस्टर्स, घरोघरी वाटायची पत्रके, बिल्ले याचा हिशेबही सुरू झाला. डोक्यात घोळत असलेला पोस्टर्स आणि पत्रकाचा मजकूर त्याने कागदावर लिहून काढला...आपल्या मतदारसंघाचे सतत दोन वेळा आमदार राहिलेले तुमचे लाडके नेते राजाभैया यावेळी हॅट्ट्रिक करणार!आपल्या लाडक्या नेत्याला विजयी करा!बाजूला भैयाचा भलामोठा फोटो. वरच्या बाजूला हायकमांडमधल्या दोन ‘हाय’ नेत्यांचे छोटे फोटो. खाली मतदानाची तारीख, आपले विनित वगैरे, वगैरे...मजकूर पुन्हा पुन्हा वाचत, स्वत:च खूश होत राजाभैयाने पेग तोंडाला लावला, तेवढ्यात त्याचा लंगोटी यार कल्लू उस्ताद दरवाजात उगवला.राजा : अरे कल्लू...अगदी वेळेवर आला बघ...! मी आता निघणारच होतो... हे पोस्टर्स छापखान्यात द्यायला...बघ तू, एक नजर टाक.कल्लूने मजकूर वाचला. त्याच्या ‘सराईत’ नजरेला त्यातील उणीव जाणवली.कल्लू : राजाभैया... आतापर्यंत ठीक होते. सर्व खपून जायचे. पण यापुढे चालणार नाही.राजभैया : काय म्हणतोस तू, कळले नाही. जरा स्पष्ट सांग.कल्लू : हे बघ, तू येथे काय लिहिले...मी रस्त्याची कामे केली, शौचालये बांधली वगैरे वगैरे.अरे बाबा तू यातले काहीही केले नसताना केले म्हणून लिहिले आणि जे प्रत्यक्षात केले ते मात्र दडवून ठेवलेस. आता बनवाबनवी चालणार नाही.राजाभैया : काय दडवून ठेवले मी ?कल्लू : मला सांग...तुझ्यावर आतापर्यंत किती गुन्हे दाखल आहेत?राजाभैया : असतील २०, २५.कल्लू : हे सर्व तुला या पोस्टरवर लिहावे लागणार आहे.राजाभैय्या : काय म्हणतोस ऽऽऽकल्लू : होय...ही यादी द्यावीच लागणार. या पोस्टरवर खाली लिही... राजाभैया लफंगे नामक या उमेदवारावर खुनाचे तीन, अपहरण, बलात्काराचे चारचार नव्हे सहा..(मधेच राजाभैया)कल्लू : बरं सहा..खंडणी वसुलीचे १५ आदी २५ गुन्हे दाखल आहेत. तेव्हा मतदारांनी मत देताना हा वैधानिक इशारा लक्षात घ्यावा.राजाभैया : बापरे...असं लिहिलं तर मला कोण मत देणार! निवडणूक आयोगाला द्यायच्या प्रतिज्ञापत्रात यातील काही गुन्ह्यांची माहिती मी देणारच आहे.कल्लू : तेवढ्यावर नाही भागणार...भारतीय मतदाता संघटनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून अशी माहिती पोस्टर आणि पत्रकावर देण्याबाबत आग्रह धरला आहे.राजाभैय्या : असं झालं तर कोणताही राजकीय नेता निवडणूक रिंगणात उतरू पाहणार नाही.कल्लू : ते तुझे तू बघ. मै तो चला.खरंच कल्लूने म्हटले तसे झाले तर राजकारणातील गुन्हेगारीवर निश्चितच अंकुश लागेल यात शंका नाही. सिगारेट आणि तंबाखूच्या पाकिटांवर ‘आरोग्याला हानीकारक’ असा वैधानिक इशारा लिहिला असतो. सिगारेट आणि तंबाखूमधील निकोटिनप्रमाणे राजकारणातील हे गुन्हेगार समाज व देशाच्या आरोग्यासाठी हानीकारक आहेत. तेव्हा आपल्या उमेदवाराची पार्श्वभूमी काय हे जाहीररीत्या माहीत करून घेण्याचा मतदारांचा मूलभूत हक्क सुप्रीम कोर्टाने त्यांना देऊनच टाकावा. फिर आयेगा मजा...!- दिलीप तिखिले

टॅग्स :Crimeगुन्हाPoliticsराजकारणElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय