शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गाव कारभारी दिल्लीकर !

By सचिन जवळकोटे | Updated: May 3, 2018 05:06 IST

‘आमच्या उमेदवाराचा निर्णय दिल्लीत ठरतो,’ हे गुपित थोरले काका बारामतीकरांनी ओपन करताच इरसालवाडीचा गण्या चपापला. गण्या तसा अत्यंत घड्याळप्रिय.

‘आमच्या उमेदवाराचा निर्णय दिल्लीत ठरतो,’ हे गुपित थोरले काका बारामतीकरांनी ओपन करताच इरसालवाडीचा गण्या चपापला. गण्या तसा अत्यंत घड्याळप्रिय. पक्का एकनिष्ठ कार्यकर्ता. मात्र त्याच्यासाठी पार्टीची ओळख फक्त गल्लीपुरतीच. त्यामुळं त्यानं गावच्या सरपंचाला पकडलं, ‘दादाऽऽ... आपली पार्टी दिल्लीमंदी कवापास्नं शिरली?’ या प्रश्नावर सरपंचही दचकला. वॉर्डातल्या गटारांची घाण विसरून डोकं खाजवू लागला, ‘काय की बाऽऽ.. सोसैटी चेरमनलाच म्हैती,’ हे ऐकून गण्या गावच्या सोसायटीत गेला. ‘नवं-जुनं’ करून शंभर टक्के कर्जवसुलीचा शेरा व्यवस्थितपणे रजिस्टरला मारल्यामुळं चेअरमनही खुशीत होता. ‘आपल्या पार्टीचं मेन हापिस दिल्लीमंदी कुठंशी हाय चेरमन सायबऽऽ?’ या प्रश्नावर त्यानंही आ वासला. ‘सातबारा, बोजा अन् बँक डायरेक्टर सांगतील तिथंच शिक्का’ एवढंच जग माहीत असणाऱ्या या गाव पुढाºयानं दूध केंद्राकडं बोट केलं. गण्या तिकडं गेला. ‘दुधात फॅट अन् गोणीत मिक्स पावडर’ याचा मेळ घालणाºया दूध मॅनेजरलाही दिल्लीच्या गूढ प्रश्नानं गोंधळून टाकलं. गेल्या आठवड्यात कमाविलेल्या मार्जिनचा आकडाही त्याच्या डोक्यातून गेला. ‘लेकाऽऽ अगुदर आपल्या गल्लीचा ईचार कर. गल्लीमदला कार्यकर्ता इस्ट्रॉँग जाला तरच पार्टी मजबूत हुतीया, आसं आपलं मोठं सायब सांगत्याती.’ गायी-म्हशीचं कार्ड खिशात टाकून मॅनेजर बुलेटवरून दिमाखात निघून गेला.... गण्यानं थेट पंचायत समिती गाठली. सभापतीलाही तोच दिल्लीचा प्रश्न विचारला, ‘भाऊऽऽ आपली पार्टी दिल्लीत काय करतीया?’ मतदारसंघातल्या ग्रामपंचायत इलेक्शनच्या खर्चाची गोळाबेरीज करणारा सभापतीही दचकला. डोक्यावरची तिरकी टोपी सरळ करत त्यानं गण्याकडं खालून वर बघितलं, ‘का रं गड्याऽऽ आता तुला खासदारकीचं सपान पडू लागलं हाय की काय?’ गण्यानं मग झेडपी मेंबर गाठला. ‘गावोगावच्या श्रमदानात आपण पुढं-पुढं केलं तर किती मतांचा गठ्ठा वाढेल?’ या विचारात दंग असणाºया मेंबरनंही गण्याला आमदाराकडं पिटाळून लावलं. आमदारांच्या बंगल्यात हूं म्हणून गर्दी. पोरांच्या शिक्षणासाठी फॅमिली पुण्याला शिफ्ट केल्यापासून ते आठवड्यातून दोनच दिवस मतदारसंघात. गण्यानं विचारलं, ‘आपल्या पार्टीचं तिकीट कुठंशी फिक्स हुतं?’ हे ऐकून आमदारांनी आश्चर्यानं विचारलं, ‘एवढी वर्षे कार्यकर्ता आहेस तू... अन् एवढंही माहीत नाही का तुला? केडर बेस असलेल्या आपल्या पार्टीचा प्रत्येक निर्णय बारामतीच्या बंगल्यातच. ध्येय-धोरणंही बारामतीतच.’ आता मात्र गण्या पुरता भंजाळला. ‘आपल्या पार्टीला धेय धोरनंंबी असत्याती की काय? मला वाटलं... गावातला जो गबरगंड, त्योच पार्टीचा नेता. जो निवडून येतुया, त्योच आपला उमेदवार. येवढीच आपली पॉलिशी असतीया,’ असंच काहीतरी पुटपुटत तो बाहेर आला. किमान खासदारांकडे तरी माहिती मिळेल म्हणून त्यानं मोबाईल लावला... परंतु ‘नॉट इन कव्हरेज’चाच मेसेज. आता गण्याला कुठं माहीत होतं की पार्टीचे ईन-मीन चार खासदार. त्यापैकी तिघांचा एक पाय घड्याळाच्या मळ्यात... तर दुसरा पाय कमळाच्या तळ्यात!- सचिन जवळकोटे

 (sachin.javalkote@lokmat.com)