शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीमंतां’चा विजय असो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 00:15 IST

दादरच्या भवनातील दरबार आज खचाखच भरलेला...मंत्रिगण, सरदार, मनसबदार, वतनदार, पोद्दार वगैरे सगळे झाडून हजर... उद्धोमहाराजांच्या आगमनाची साऱ्यांना प्रतीक्षा...दारावर हालचाल झाली तसे सगळेजण सावध झाले. बाहेर कसला तरी गलका सुरू होता.

- नंदकिशोर पाटीलदादरच्या भवनातील दरबार आज खचाखच भरलेला...मंत्रिगण, सरदार, मनसबदार, वतनदार, पोद्दार वगैरे सगळे झाडून हजर... उद्धोमहाराजांच्या आगमनाची साऱ्यांना प्रतीक्षा...दारावर हालचाल झाली तसे सगळेजण सावध झाले. बाहेर कसला तरी गलका सुरू होता. ‘आम्हाला आत घ्या’ असा आग्रह धरलेले दहा-वीस नाणार ग्रामस्थ दरबारात घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण चोपदारांनी त्यांना दारावरचं थोपवून ठेवलं होतं. पण ग्रामस्थ काहीकेल्या ऐकायला तयार नव्हते. शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले. नाणारवासीय गेले म्हणून सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आता कोणत्याही क्षणी महाराजांचे आगमन होणार होते...सर्वजण सावध झाले. महाराजांची मॅरेथॉन मुलाखत घेतलेले संपादक कम खासदार महाशय आज भलतेच खुशीत होते. बहुधा महाराजांनी बक्षिशी दिली असावी. वस्तुत: या मुलाखतीचा सरकारवर काडीचा परिणाम झालेला नव्हता. तरीही, ‘अवघ्या मराठी मुलखात केवढी खळबळ माजलीय’, असं ते छातीठोकपणे सांगत असल्याने सर्वांची तेवढीच करमणूक झाली. चोपदारानं हाळी दिली. ‘बाआदब...बामुलाहिजा होशियारऽऽऽ माननीय उद्धोमहाराज पधार रहे है!’ तुतारीच्या रणभेरीत महाराजांचे दरबारात आगमन झाले. ‘श्रीमंतांचा विजय असो! विजय असो!!’ सर्वांनी वाकून कुर्निसात घातला. महाराज सिंहासनावर विराजमान झाले. सेक्रेटरीनं बैठकीचा अजेंडा वाचायला सुरुवात केली. तेवढ्यात महाराज गरजले, ‘थांबा!’ दरबारात शांतता पसरली. ‘काय झालं महाराज, आमचं काही चुकलं का?’ एका सरदारानं मोठ्या अदबीनं विचारलं. महाराजांनी चांगलंच खडसावलं, ‘श्रीमंतांचा विजय असो म्हणजे काय? कसले श्रीमंत? कोण श्रीमंत? श्रीमंत ही उपाधी फक्त आणि फक्त छत्रपतींनाच शोभून दिसते. आपण तर साधे पाईक आहोत!’महाराजांच्या या खुलाशानं सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. मग समोरच्या रांगेत बसलेल्या एका उद्योगी मंत्र्यानं हातातील वर्तमानपत्र महाराजांपुढे धरलं.महाराज: ‘हे काय?’मंत्री: आपल्या श्रीमंतीचा पुरावा महाराज!महाराज: आमच्या जायदादीचा तपशील चक्क पेपरात छापून आलाय? कुणी केली ही गद्दारी? कोण आहे तो सूर्याजी पिसाळ?मंत्री: ‘एडीआर’ महाराज!महाराज: कोण हा हरामखोर एडीआर? तात्काळ दरबारात हजर करा!मंत्री: महाराज, एडीआर ही व्यक्ती नसून संस्था आहे!महाराज: आजवर ईडी, सीबीआय ही नावं आम्ही ऐकून होतो. ही एडीआर काय भानगड आहे? तरी आम्हांस शंका होतीच. केंद्रात बसलेले लोक आमच्या मुळावर उठले आहेत. एक ना एक दिवस असा पाठीत खंजीर खुपसणारच!मंत्री: महाराज आपला काही तरी गैरसमज झालेला दिसतोय. एडीआर ही सरकारी नव्हे, खासगी संस्था आहे!महाराज: तरीही त्यांची ही शामत? आमच्या संपत्तीची माहिती त्यांना मिळालीच कशी?मंत्री: क्षमा असावी महाराज. एडीआर म्हणजे ‘असोशिएशन आॅफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’! या संस्थेनं आपला पक्ष देशातील सर्वांत श्रीमंत प्रादेशिक पक्ष असल्याचा अहवाल दिलाय!!महाराज: हत्ऽऽतीच्याऽऽ..असंय व्हय..आमची उगीच घाबरगुंडी उडाली!!

टॅग्स :MONEYपैसाnewsबातम्या