शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

गडकरींचे टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 03:24 IST

येत्या पाच महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी दिलेला हा इशारा भाजपाच्या साऱ्या पुढाºयांना व कार्यकर्त्यांना अंतर्मुख करणारा आहे.

नितीन गडकरी यांच्या रूपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बोलत असतो. त्यामुळे ‘जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार नसाल तर जनता तुम्हाला फटके लगावेल’ हे गडकरींचे विधान प्रत्यक्षात संघाचे आहे आणि ते मोदी आणि त्यांच्या सरकारला ऐकविले आहे, हे उघड आहे. नितीन गडकरी हे तसेही स्वतंत्र भूमिका घेण्यात आणि मोदींपासून शक्यतोवर दूर राहण्यात पटाईत आहेत. मोदीही त्यांना फारसे जवळ करताना गेल्या चार वर्षांत कधी दिसले नाहीत. पर्रीकर गोव्यात गेले, जेटली अमेरिकेला गेले, सुरेश प्रभूंचे खाते काढून घेतले अशा वेळी मोदी नितीन गडकरी यांना एखादे वरिष्ठ पद देऊन मंत्रिमंडळाच्या राजकीय समितीत आणतील, असा कयास अनेकांनी बांधला होता. प्रत्यक्षात मोदींनी त्यांना दिल्लीपासून दूर अंतरावर सडका बांधत ठेवले.वास्तव हे की भाजपाच्या राजकारणात नितीन गडकरी मोदींना ज्येष्ठ आहेत. अडवाणींच्या पश्चात संघाने त्यांनाच भाजपाचे अध्यक्षपद दिले आहे. ते अध्यक्ष असताना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री आणि अमित शाह हे त्या राज्याचे गृहराज्यमंत्री होते. ही एकच बाब गडकरींचा भाजपामधील अधिकार व उंची सांगणारी आहे. मात्र मोदींनी त्यांना तसा मान कधी दिला नाही. गडकरी यांनीही ते कधी मनावर घेतले नाही आणि आपले मनोगत धाडसाने ऐकविण्याचे कामही कधी थांबविले नाही. बाकीचे सारे मंत्री मोदींसमोर माना खाली घालून कारकुनासारखे उभे असताना गडकरी मात्र स्वतंत्र दिमाखात वावरताना सदैव दिसले.येत्या पाच महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी दिलेला हा इशारा महत्त्वाचा व भाजपाच्या साºया पुढाºयांना व कार्यकर्त्यांना अंतर्मुख करणारा आहे. त्यातून १९ आणि २० फेब्रुवारीला नागपूर या गडकरींच्या मतदारसंघात भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन व्हायचे आहे. त्यामुळे तर यजमानाचे हे खडेबोल मोदी व त्यांच्या भक्तांना घायाळ करणारे आहेत. अनेक भाजपा नेत्यांच्याही कपाळाला यामुळे आठ्या पडल्या आहेत. सत्तेवर येण्याआधी प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये देण्याचे मोदींचे आश्वासन आता ते स्वत:च विसरले आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे त्यांचे आश्वासन त्यांचा पक्षही विसरला आहे. महागाई कमी करणे, शेतमालाला दर्जेदार भाव देणे आणि देशाची अर्थव्यवस्था साडेसात टक्क्यांनी वाढत ठेवणे ही आश्वासनेही कधीचीच हवेत विरली आहेत.‘तेव्हा कदाचित आम्ही निवडून येणार नाही असे वाटल्याने आमच्या पक्षाने व नेत्याने ही आश्वासने दिली असतील. मात्र लोक ती अद्याप विसरले नाहीत. सबब, येत्या निवडणुकीत लोक त्यांना त्याविषयीचा जाब मागणार आहेत’ हे गडकरी यांनी मोदींसकट साºया भाजपावाल्यांना खणखणीतपणे सुनावले आहे. जी गोष्ट सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी देशाला ऐकवायची ती मोदींचे एक ज्येष्ठ सहकारी अशी ऐकवत असतील तर ती त्या पक्षातील खदखद व असंतोष दर्शविणारी बाब आहे. नितीन गडकरी बिनधास्त बोलतात म्हणून त्यांचे बोलणे सहजासहजी उडवून लावता येण्याजोगे नाही. गडकरी ही संघाची देशाच्या नेतृत्वासाठी असलेली पहिली निवड आहे. याउलट मोदी हा संघाचा नाइलाज आहे, हा इतिहास ताजा आणि न विसरता येणारा आहे. त्यामुळे गडकरींचे वक्तव्य हे त्यांचे एकट्याचे मत म्हणून पाहता येत नाही. ते संघाचे, संघाच्या जुन्या व ज्येष्ठ नेत्यांचे आणि झालेच तर पक्षातील वयस्क वरिष्ठांचे मत म्हणूनही पाहिले पाहिजे. केवळ ते बोलण्याची गडकरींची तयारी असल्याने ते बोलले इतकेच.अर्थात गडकरींच्या या टीकेमुळे मोदी त्यांची वाटचाल बदलतील किंवा अमित शाह यांचा उन्माद ओसरेल अशी भाबडी आशा कुणी बाळगण्याचे कारण नाही. त्यांचे ते उपजत स्वभाव आहेत. ते बदलू शकत नाहीत. आपल्या विरोधकांबाबत ज्या अशिष्ट पातळीवर मोदी बोलतात आणि शाह हे तर आपल्या मित्रपक्षांनाच ‘पटकण्याची’ भाषा ऐकवतात, ते पाहिले की मग त्यांची खरी ओळख त्यांच्या बैठकीसकट लक्षात येते. पाच राज्यांत जनतेने धूळ चारल्यानंतरही ज्यांचे मेंदू ठिकाणावर येत नाहीत त्यांना गडकरी वळणावर आणतील, अशी अपेक्षा त्याचमुळे बाळगण्याचे कारण नाही. मात्र मोदी सरकारने ही अपेक्षा पूर्ण केली नाही एवढ्यासाठी जनता त्यांची खोटी आश्वासने विसरून जाईल वा खपवून घेईल, असे आपणही समजण्याचे कारण नाही.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ