शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

डॉ. मंगला नारळीकरबाईंना अनावृत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 04:32 IST

बाई, नातवंडांना गणितच काय, सर्व काही गाणी आणि गोष्टींमधून शिकविले की सोपे जाते, हे आजी-आजोबांना आधी कळते.

- डॉ. अंबुजा साळगावकर (संगणकशास्त्र प्रमुख)दुसरीच्या पुस्तकात प्रस्तावित संख्यावाचनाची नवी पद्धत आम्हासारख्या अनेकांच्या पचनी पडली नसल्याने, त्यावर खूप गदारोळ सुरू आहे. बाई, तुमच्या मते तो गणिताच्या वाटेवरचे काटे, खडे बाजूला करण्याचा प्रयत्न आहे. असेल... म्हणजे तशी तुमची धारणा दिसते, पण या प्रयोगाने निर्माण झालेले नवे काटे नि धोंडे दूर केल्याशिवाय तो यशस्वी होणे कठीण आहे. हां, त्या धारणेने अभ्यास मंडळाने सुचविलेला एक कौतुकास्पद बदल म्हणजे गणित शिकविण्याचा प्रारंभ गाण्याने नि समारोप गोष्टीने. हे मस्त!

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणालात, नातवंडांना गणित शिकणे सुलभ व्हावे, म्हणून प्रयोग केलेत. बाई, नातवंडांना गणितच काय, सर्व काही गाणी आणि गोष्टींमधून शिकविले की सोपे जाते, हे आजी-आजोबांना आधी कळते. जरूर पुरस्कार करा त्याचा. ९०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात लीलावतीद्वारा सिद्ध झालेला प्रयोग आपण पुन्हा करू या. झेलमसारख्या प्रख्यात नृत्यांगना पुढे आल्यात व्हिज्युअल आर्टमधून गणित साकारायला, समाजमाध्यमातून पडलेला चुटक्यांचा पाऊस? आपण त्याला योग्य प्रकारे वळविले, तर अनेक डोकी पुढे येतील, मनोरंजनातून गणित शिकवायला. टेक्नॉलॉजीचा उपयोग करून क्राउड सोअर्सिंगद्वारा पालक-शिक्षक प्रत्यक्ष सहभागातून पुस्तके बनविता येतील.

बाई, अशिक्षित घरातील पाल्यांच्या म्हणजे नेमक्या कुठल्या, किती तक्रारी कधी नि काय म्हणून आल्या होत्या? अकरापासून दोन अंकी संख्या सुरू होत असता, एकवीसपासून हा नवा प्रयोग का? मग एकतीस किंवा एकावन्नपासून का नको? या प्रयोगाचे दूरगामी परिणाम तपासले का? बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रारंभीच एकाहत्तर ही संख्या असेल, तर तिचे वाचन सत्तर आणि एक असे करता येईल, हा नवा प्रस्ताव आहे, असे वाहिनी प्रतिनिधी म्हणते. त्यावर सत्तर एक अशी दुरुस्ती आपण का केली नाही? सत्तर आणि एक असते, तर सवालच नव्हता, त्यात नवे काहीच नाही.

तुम्हीच उदाहरणार्थ घेतलेली ५,३५७ ही संख्या पन्नास तीन शे पन्नास सात अशी म्हटली की, पन्नास तीनशे पन्नास सात (५०३००५०७) किंवा पन्नास तीनशे पन्नास सात (५०३५०७) अशीही ऐकू येईल आणि ऐकू येईल तसे एकापुढे एक लिहिणे हा आपल्या सुलभीकरणाचा पाया असल्याने चूक होणे सहज शक्य आहे. नवी पद्धत सोपी आहे, हे विधान गृहीतक, प्रमेय की तर्क? तुम्ही सांगितलेली सुलभ संवादाची व्याख्या, सांगणाऱ्याच्या मनातला अर्थ ऐकणाºयापर्यंत सहज पोहोचला पाहिजे, ही भारतीय दर्शनातील, ती योग्यच आहे, पण इथे तुमचीच संख्या तुम्हाला मान्य असल्याप्रमाणे दुसºया प्रकारे वाचून दाखविली असता, ऐकणाऱ्यांची त्रेधा उडतेय, तर सुलभीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले म्हणायचे का?

तुमच्या मुलांना ऐंशी नि चार विटा समजतात, तर म्हणा ऐंशीचार. पाडा हा द्वंद्व समास जीभवळणी. कोणाला फक्त पन्नासपर्यंतच संख्या येत असतील, तर त्यांना तुम्ही चौºयाऐंशी समजावण्यासाठी पन्नास चौतीस किंवा चाळीस चव्वेचाळीस असे सांगू शकता किंवा जोडाक्षर नकोच असल्यास बेचाळीस बेचाळीस असेही सांगता येईल. संपला विषय!......की सुरू झाला? आता भाऊऐवजी आईमुलगा किंवा बाबामुलगा म्हणायचे, असा विनोद पाठवलाय कुणी. त्याचे आईमुलगा वा बाबामुलगा हे रूप मान्य करता येईल. मात्र, शब्द जोडून किंवा तोडून लिहिण्यात चूक झाली, तर गणित चुकणार म्हणून मुलांना गणित आवडणार नाही.

तस्मात, संज्ञांचे सुलभीकरण करणे योग्य नाही. त्या रूढ झालेल्या असतात, जोडाक्षरे तिथे आणलेली नसून म्हणता-म्हणता नाद, ताल, लय इत्यादी गुणांसाठी ती तिथे जमतात. त्याने रूक्ष संज्ञा स्मरणे सुलभ होते, हे समजून घेऊन सत्तावीसऐवजी वीस सात, अठ्ठावीसऐवजी वीस आठ, सत्त्याण्णवऐवजी नव्वद सात असे शिकवावे, ही धडधडीत चुकीची सूचना मागे घ्यावी हे योग्य. बोलीमध्ये रूढ असलेली त्रेपन्न, चौसष्ट अशी रूपे मान्य करूनही आपण म्हणता ते काटे-खडे दूर करता येतील आणि मला वाटतं, परितेवाडीचे स्मार्ट सर म्हणून गौरविले गेलेल्या डिसले गुरुजीसारखे भेटतील काही, त्यांना घ्या अभ्यास मंडळावर. परफॉर्मन्स वाढण्यासाठी स्वयंपाकघर इंटेरिअरवाल्यापेक्षा गृहिणीला लावू द्यावे. पाहा पटतोय का हा विचार...

टॅग्स :Educationशिक्षण