शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्रपंत कॉलिंग सुधाकरपंत !

By सचिन जवळकोटे | Updated: October 21, 2018 01:25 IST

‘सोलापूर म्हणजे केवळ दोन देशमुखांच्या जिरवाजिरवीची साठमारी’, एवढीच ओळख आपल्या जिल्ह्याची सध्या महाराष्ट्रात झालेली.

सोलापूर म्हणजे केवळ दोन देशमुखांच्या जिरवाजिरवीची साठमारी’, एवढीच ओळख आपल्या जिल्ह्याची सध्या महाराष्ट्रात झालेली. या पार्श्वभूमीवर परवा मुंबईहून थेट सोलापुरात देवेंद्रपंत आले. दिवसभर इथं ठाण मांडून सारं मंत्रालय हलवून टाकलं. ‘विकास कसा करायचा असतो’, याची प्रचिती त्यांनी दोन्ही देशमुखांनाच नव्हे तर विरोधकांनाही आणून दिली. पंत संध्याकाळी परतले, परंतु जाता-जाता त्यांनी अजून एक गंमत केली. पंढरीच्या ज्येष्ठ पंतांशी संवाद साधला. हे अनोखं ‘पंत कॉलिंग पंत’ दृष्य पाहून आम्हा पामरासमोर भविष्यातला बदलणारा जिल्हा खूप छानपैकी तरळून गेला.

नागपुरी संत्र्याला म्हणे चंद्रभागेच्या पाण्याचा गोडवा !

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठका आटोपून देवेंद्रपंत बाहेर आले. पोर्चमध्ये पंढरीचे प्रशांत मालक त्यांचीच वाट पाहत उभे होते. त्यांच्या खांद्यावर थोपटत पंत पुढे सरकले. बोलता-बोलता देवेंद्रपंतांनी एक वेगळाच धक्का दिला, ‘आज सुधाकरपंतांचा वाढदिवस आहे ना? तो सोडून तुम्ही इथं का आलात?’ मुंबईच्या पंतांचा तो सवाल ऐकताच पंढरीचे धाकले पंत अवाक् झाले. आपल्या घराण्याची खडा न् खडा माहिती समोरच्या पंतांना आहे, हे लक्षात येताच चमकले. त्यांनी तत्काळ आपल्या खिशातून मोबाईल काढून काकांना कॉल केला. फोन लागताच तो थेट देवेंद्रपंतांच्या हातात दिला. मग काय..... एवढ्या धावपळीतही तब्बल तीन मिनिटं एक पंत दुस-या पंतांशी बोलले. इकडं त्यांच्या पी. ए. ला घाई लागली होती. अंधार पडायच्या आत विमान ‘टेक आॅफ’ करायचं होतं. परंतु, देवेंद्रपंतांना पंढरीत कमळाचं विमान कसं ‘लँडिंग’ करता येईल, याची चिंता लागली होती. ‘तुमच्या दोन्ही धाकल्या पंतांची मी जबाबदारी घेतलीय. तुम्ही फक्त तुमचीही भूमिका आता जाहीर करा’, असंच इनडायरेक्ट हे पंत सुचवित होते. मात्र सुधाकरपंत कुठं तिकडून सांगू शकत होते की, ‘काही महिन्यांपूर्वीच त्यांची भेट बारामतीच्या थोरल्या काकांनी घेतलीय!’ आलं का लक्षात? लगाव बत्ती...

गढीवरचे देशमुख... ...वाड्यावरचे देशमुख ! ब-याच वर्षांनंतर दोन देशमुख बराच वेळ एकाच व्यासपीठावर बसल्याचं दृष्य सोलापूरकरांना पाहायला मिळालं... वॉवऽऽ किती हे आमचं परमभाग्य. अहोभाग्य. देवेंद्रपंतांच्या दौ-यामुळंच ही सारी किमया घडली. पण विशेष म्हणजे दोघंही शेवटपर्यंत एकमेकांशी बोलले नाहीत म्हणे. दोघांच्या ‘गट्टी फूऽऽ’ खेळात एकानंही शेवटपर्यंत ‘टॅम्प्लिजऽऽ’ म्हटलं नाही म्हणे.  पंतही तसे खूप हुश्शाऽऽर, एका बाजूला त्यांनी विजय मालक अन् बनसोडे वकिलांना बसवलं तर दुस-या बाजूला सुभाषबापू अन् साबळेंना. संघातला शिस्तीचा बॅलन्स त्यांनी इथंही वापरला. विरोधकांना मात्र शेवटपर्यंत बैठकीच्या बाहेरच ठेवलं. ध्यानी-मनी नसताना देवेंद्रपंतांचा हा अकस्मात सोलापूर दौरा अनेकांसाठी चक्रावून टाकणारा; मात्र यातली खरी मेख अस्मादिकांना ठाऊक. मध्यंतरी पार्टीच्या गुप्त सर्वेक्षणात राज्यातील काही लोकसभा मतदारसंघ धोक्यात आल्याची खबर देवेंद्रपंतांना लागलेली. त्यातलाच एक म्हणजे सोलापूर. त्यामुळं तातडीनं ‘पॅचअप’ करण्यासाठी पंत सोलापुरी आले. ‘वन डे ट्रीप’मध्ये पार्टीची प्रतिमा उजळवून गेले. हाच प्रयोग आता ते इतरत्रही करतील... परंतु, सर्वाधिक गरज ज्याची होती, त्या दोन देशमुखांमधल्या ‘पॅचअप’चं काय? गढीतले सुभाषबापू अन् वाड्यातले विजय मालक यांनी सोलापूरच्या विकासासाठी तरी एकत्र यावं, या लोकभावनेचं काय? है किसके पास इसका करारा जवाब?’  लगाव बत्ती.....

दिलीपरावांचा ‘दुष्काळ’

सोलापूरच्या पंत दौ-यात बार्शीचे दिलीपरावही चमकून गेले. त्यांनी दुष्काळ निवारणाचं निवेदन देवेंद्रपंतांना दिलं. खरं तर, हीच भेट तशी मुंबईतही ते घेऊ शकले असते. बंगल्यात कार्यकर्त्यांसमोर मुंबईची ईश्टोरी कथन करताना दिलीपराव म्हणे नेहमी सांगत असतात, ‘मी आज त्याच्या संपर्कात. तो काल माझ्या संपर्कात.’ सर्वच पक्ष आपल्यासाठी कसे पवित्र आहेत, हे नेहमी पटवून देणाºया दिलीपरावांनी देवेंद्रपंतांना दुष्काळाचीही जाणीव करून दिली.. पण त्यांच्या गटाच्या दुष्काळाचं काय? दिलीपरावांच्या कुंडलीत सत्तेचा योग नेहमीच स्ट्राँग असला तरी सहकारी संस्थांचे ग्रह म्हणे नेहमीच वक्री बनलेले. भोगावती असो की डीसीसी... ते सत्तेवर येताच या संस्थांभोवती जणू साडेसातीचा फेराच सुरू झालेला. त्यांच्या खासगी कारखान्याचीही पुरती वाट लागलेली. बार्शीतली बँक कशीबशी तग धरून, ही त्यांच्या मॅनेजमेंटच्या कार्यकुशलतेची पोचपावतीच. सांगण्याचा मुद्दा एवढाच, जिल्ह्यातील दुष्काळाचं काय होईल, हे माहीत नाही. मात्र त्यांच्या गटाचा ‘दुष्काळ’ संपणं अधिक गरजेचा. त्यासाठी ‘कमळस्पर्श’ महत्त्वाचा. मात्र रौतांनी अगोदरच त्या पार्टीत जागा बळकावलेली. त्यामुळं तेही सध्या अशक्य. मात्र, दिलीपराव ‘अनहोनी को होनी’ करण्यात पटाईत.

विजयदादांचा चमचा... दीपकआबांचा काटा !

‘दुस-याच्या राजवटीत ढवळाढवळ करण्याची चटक लागली की, आपलंं आहे ते साम्राज्यही खालसा होण्याची प्रक्रिया सुरू होते, हे अकलूजकरांचं जिवंत उदाहरण पाहून तरी माढ्याच्या संजयमामांनी करमाळ्यात सावध पावलं टाकावीत’, असा सल्ला यापूर्वी ‘लगाव बत्ती’ सदरातून दिला गेला होता. मामा यातून किती शिकले... हे माहीत नाही. मात्र सांगोल्याच्या दीपक आबांना या समीकरणाचा फटका बसण्याची चिन्हं अधिक प्रमाणात दिसू लागलीत. दरवेळी ‘ही माझी शेवटचीच निवडणूक !’ म्हणणा-या गणपतरावांनी त्यांच्या महान (!) परंपरेनुसार यंदाही निवडणुकीची तयारी सुरू केली, तसं पाण्यात देव ठेवून बसलेले दीपकआबा सांगोल्याच्या देव्हा-यातून बाहेर पडून माढा लोकसभेच्या मंदिरात तिकिटाचं भजन-कीर्तन-प्रवचन करू लागले. एक तर आधीच 'देशमुखांचे प्रभाकर' अकलूजच्या दादांची झोपमोड करू लागलेले. त्यात पुन्हा दीपकआबांचा चेहराही पहाटेच्या स्वप्नात चमकू (!) लागलेला. मात्र, आबा नेमके फोनवरच्या संभाषणात अडकले. राजकारण्यांच्या खिंडीत सापडले. अक्कलकोटमधल्या एका भगिनीबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर केली गेलेली शेरेबाजी ‘रेकॉर्ड’सहित महाराष्ट्रभर पोहोचली. विशेष म्हणजे ही आॅडिओ क्लिप थेट थोरले काका बारामतीकरांपर्यंत पोहोचविण्यासाठी अकलूजपासून सोलापूरपर्यंत सा-यांचीच जणू स्पर्धा लागलेली. फोनवरच्या याच संभाषणात  ‘विजयदादांचा चमचा’ असाही एक वाक्यप्रयोगकेलेला. खरंतर, जिल्ह्याच्या राजकारणानं आजपावेतो कैक चमचे बघितलेले. अकलूजच्या नावावर किती जणांनी आपली ताटं भरून घेतलेली, याची मोजदादही लागू न शकलेली. किती जणांनी वाट्या पळविलेल्या, याचाही थांगपत्ता न लागलेला. अधिक माहितीसाठी हसापुरेंच्या सुरेशना कधीतरी भेटा. सविस्तर डाटा मिळू शकेल. असो, आता हाच ‘चमचा’ शब्द आबांसाठी ‘काटा’ ठरू शकतो. लोकसभेचं तिकीट तर सोडाच, आहे ती खुर्चीही खिळखिळी करण्यासाठी याच चमच्याचा वापर होऊ शकतो. आबा... जरा जपून; कारण लगाव बत्ती!( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत. )

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSudhakar Deshmukhसुधाकर देशमुख