शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आजचा अग्रलेख: ‘खलनायक’ कोण? व्यवस्था की समाज, पुढे भवितव्य काय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 11:21 IST

Pune Crime: पुण्यासारख्या महानगरातील सदाशिव पेठेतल्या रस्त्यावरून एक मुलगी भरदिवसा जीव मुठीत धरून धावते आहे आणि माथेफिरू तरुण तिच्यावर कोयत्याने वार करत तिचा पाठलाग करतो आहे. एखाद्या चित्रपटात हा प्रसंग असता तर तो अतिरंजित वाटला असता. पण, तमाम पुणेकरांनी हा थरारक प्रसंग नुकताच पाहिला.

पुण्यासारख्या महानगरातील सदाशिव पेठेतल्या रस्त्यावरून एक मुलगी भरदिवसा जीव मुठीत धरून धावते आहे आणि माथेफिरू तरुण तिच्यावर कोयत्याने वार करत तिचा पाठलाग करतो आहे. एखाद्या चित्रपटात हा प्रसंग असता तर तो अतिरंजित वाटला असता. पण, तमाम पुणेकरांनी हा थरारक प्रसंग नुकताच पाहिला. महिलांची, मुलींची वाढती असुरक्षितता हा मुद्दा आपण गंभीरपणे घेणार आहोत की नाही, हा प्रश्न पडावा अशाच घटना  सातत्याने सगळीकडे घडत आहेत. दर्शना पवारच्या पाठोपाठ मंगळवारी पुण्यात भर मध्यवस्तीत, दिवसाढवळ्या एक तरुण कोयत्याने वार करायला धजावू शकतो, याला काय म्हणावे? या हल्ल्यात त्या तरुणीच्या मदतीला दोन तरुण आले. त्यांनी त्या बेभान झालेल्या तरुणाचे कोयत्याचे वार आपल्या हातांनी अडवत तरुणीचा जीव तर वाचवलाच, पण हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यातही दिले. एखाद्या सिनेमात अथवा वेबसीरिजमध्ये शोभणारे हे दृश्य. पोलिसांच्या वर्तनाने त्यात भरच पडली! ही मुलगी मदतीसाठी पोलिस चौकीत आली, तेव्हा तिथे एकही पोलिस नव्हता. याची जबाबदारी कोणी घेणार की नाही?

आधीच समाजातील गुन्हेगारी वृत्ती वाढीला लागल्याची शेकडो उदाहरणे रोज समोर येत आहेत. त्यांना वचक बसवणारी पोलिस यंत्रणा अशी संवेदनशून्य असेल तर मग पीडित तरुणी, सर्वसामान्य जनतेने पाहायचे तरी कोणाकडे? महिलांना स्वसंरक्षणासाठी हत्यारे द्या, या मागणीचे आंधळे समर्थन करता येणार नाही. पण, पोलिस यंत्रणेच्या अकार्यक्षमतेमुळे ही मागणी पुढे आली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. घटना घडली त्याच दिवशी दुपारी ‘लोकमत’ने  पोलिस, वकील, प्राध्यापक, मानसशास्त्रज्ञ, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे आणि अन्य तरुण यांचे चर्चासत्र याच विषयावर पुण्यात घेतले. त्यातला सूर सरकारी यंत्रणांना, विशेषतः पोलिसांना दोष देणारा आहेच, पण आपल्या समाजव्यवस्थेकडे, कुटुंबसंस्थेच्या प्रारूपाकडे बोट दाखवणारा आहे. मुळात, याला जातपितृसत्तेचा संदर्भ आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेत ज्या पद्धतीने मुलगा आणि मुलगी यांची वाढ होते, त्यातून मुलीने दिलेला नकार पचवणे मुलांना अशक्य वाटते. आपल्यापेक्षा मुलगी पुढे जाते आहे, हेही खटकते. शारीर आकर्षणाला प्रेम समजणारे असे माथेफिरू मग मुलीला भररस्त्यात जिवंत कसे जाळू शकतात, हे हिंगणघाटने आपल्याला दाखवले आहे. पुण्यातील परवाची घटना आणखी वेगळी नाही. दर्शनासारख्या अधिकारी झालेल्या मुलीचा खून करणारी मानसिकता हीच आहे. साध्या साध्या घटनांनी विफल होणाऱ्या, सगळे संपवू पाहणाऱ्या तरुणाईचे हे रूप संचित करणारे आहे.

योगायोग असा की दर्शना आणि तिचा खुनी हे दोघेही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे. या परीक्षांच्या अभ्यासासाठी पुण्यात राहणाऱ्यांची संख्या चार लाखांपेक्षा जास्त आहे. राज्यात शिक्षण सर्वदूर पोहोचले, मात्र शिक्षणातून येणारी सुसंस्कृतता अंगी आणण्यात आपण कमी पडलो. शिकायचे आणि शिकून भरपूर पैसे कमवायचे, या एकमेव ध्येयाशिवाय मुला-मुलींकडे कोणतेही प्रयोजन नसते. म्हणून तर प्रेमाच्या नावाने कोयते चालू शकतात. याचा अर्थ हेच सर्वत्र सुरू आहे, असे नाही. तरुणाई अशीच आहे, असे नाही. पण, सातत्याने घडणाऱ्या घटनांनंतर याला अपवाद मानावे, असेही चित्र उरलेले नाही. प्रेम, शारीर आकर्षण, गरज या गोष्टींवर न बोलणारा आपला समाज. त्यातून लाखो गोरगरीब तरुण एका वेगळ्याच गर्तेत दिसतात. शिक्षणाचा आधीच बाजार झालेला असताना आणि बेरोजगारीने तरुणांचे आयुष्य अंधःकारमय झालेले असताना, स्पर्धा परीक्षांच्या या ‘मार्केट’ने अनेक आयुष्ये उद्ध्वस्त होत आहेत, याचाही विचार करावा लागणार आहे. एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ‘सगळेच तरुण भरकटलेले आहेत’, असे म्हणणारे बहुतेक जण पुण्यातील घटनेत लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या तरुणांनीच जीवावर उदार होत त्या मुलीचा जीव वाचवला हे विसरतात.

तरुण पिढीला नावे ठेवणे सोपे, त्या़ंच्याशी संवाद करणे अवघड! ही जबाबदारी सर्वांची आहे. कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्था या प्रारुपांचा फेरविचार करण्याची गरज आहे. पुण्यातील घटनांमुळे समोर आणलेला मुद्दा कायदा आणि सुव्यवस्थेचाही आहे. पुण्यासारख्या प्रगत, प्रगल्भ आणि स्मार्ट शहरात पोलिसांची ही कार्यक्षमता असेल, तर इतरत्र काय चित्र असणार आहे? लेशपाल आणि हर्षद या नायकांनी पुण्यात तरुणीला वाचवले खरे, पण ‘व्यवस्था’च खलनायक असेल, तर समाज म्हणून आपले भवितव्य काय असणार आहे?

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्र