शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आजचा अग्रलेख: भुजबळ खरे ते बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:12 IST

Chhagan Bhujbal News: अजित पवारांसोबत जाऊन भुजबळांनी मंत्रिपद मिळविले. त्या लाल दिव्यापेक्षाही त्यांना काही जास्तीचे मिळाले का, ही उत्सुकता सगळ्यांना होती आणि पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकाचा हवाला देत प्रकाशित झालेल्या बातम्यांनी त्या प्रश्नाच्या उत्तरावर साचलेली धूळ बाजूला सारली गेली आहे.

‘तिकडं काय चाललंय ते जरा बघून येतो’, असे शरद पवारांना सांगून निघून गेलेले हेवीवेट नेते छगन भुजबळ तिकडचेेच झाले. गोफण तिकडे अन् धोंडाही तिकडेच, अशी गत झाली. अजित पवारांसोबत जाऊन भुजबळांनी मंत्रिपद मिळविले. त्या लाल दिव्यापेक्षाही त्यांना काही जास्तीचे मिळाले का, ही उत्सुकता सगळ्यांना होती आणि पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकाचा हवाला देत प्रकाशित झालेल्या बातम्यांनी त्या प्रश्नाच्या उत्तरावर साचलेली धूळ बाजूला सारली गेली आहे. केवळ आपणच नव्हे तर खुद्द अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजणांना ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स या केंद्रीय यंत्रणांची भीती होती. साखर कारखान्याच्या भानगडीत पत्नी सुनेत्रा पवार यांना अटक होऊ शकते, या भीतीने अजित पवारांना तर घाम फुटला होता. याच कारणाने सगळ्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि महायुती सरकारमध्ये सामील झाले, असा या गाैप्यस्फोटाचा साधारण आशय आहे. स्वत: छगन भुजबळ यांनी लागलीच याविषयीच्या बातम्यांचा इन्कार केला आहे. सरदेसाई यांचे पुस्तक अद्याप आपण वाचलेले नाही, निवडणुकीची रणधुमाळी आटोपेपर्यंत ते वाचताही येणार नाही. त्यानंतर ते वाचू, वकिलांनाही वाचायला देऊ आणि कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ, असे भुजबळ म्हणतात.

खरे पाहता भुजबळांनी जे काही म्हटलेय तो गाैप्यस्फोट नाही आणि धक्कादायक तर अजिबात नाही. असेच काहीतरी असल्याशिवाय केवळ विकासाच्या नावाखाली पंचवीस वर्षांची एकी संपवून थोरल्या पवारांचा नवरत्न दरबार शोभेल असे हे सरदार अचानक वेगळी भूमिका घेतील हे शक्यच नव्हते. अर्थात, या गोष्टी नेमक्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना बाहेर याव्यात, हे वैशिष्ट्यपूर्ण आहेच. गेल्या तीन दिवसांतील घटनाक्रम त्याहून अधिक खास आहे. नवाब मलिक म्हणतात की, निवडणुकीच्या निकालानंतर चित्र वेगळे असेल, अजित पवार हे नव्या सरकारमध्ये किंगमेकर असतील. पाठोपाठ दिलीप वळसे-पाटील म्हणतात की, निकालानंतर नवी राजकीय समीकरणे तयार होतील. थोडक्यात, राष्ट्रवादीच्या धाकट्या पातीत काहीतरी वेगळे शिजते आहे. निवडणुकीसाठी धारण केलेला गुलाबी अवतार म्हणूनच अधिक मोहक आहे. या घटनाक्रमाची वेळ अधिक महत्त्वाची आहे. पालघरचे श्रीनिवास वनगा यांची नाराजी, बेपत्ता होणे, कुटुंबीयांचा संताप यामुळे शिवसेनेतील फुटीचा मुद्दा चर्चेत आला. बारामतीत शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना काका अजित पवारांच्या विरोधात उतरविल्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीच्या चर्चेला पुन्हा धुमारे फुटले. सारंगी प्रवीण महाजन व पूनम महाजन यांच्या आरोपांमुळे प्रमोद महाजन हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले. इतके सारे एकापाठोपाठ एक असे घडत आहे. परिणामी, अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेसेना तसेच राज्यातील राजकारणाची सूत्रे हलविणारा भारतीय जनता पक्ष अशा तिन्ही गोटांमध्ये अनामिक अस्वस्थता आहे. महायुतीमधील जागावाटपावेळी ती दृश्यमान झाली होती.

दीडशेपेक्षा अधिक जागा आपल्या पदरात पाडून घेऊन भाजपने ती अस्वस्थता कार्यकर्त्यांमध्ये झिरपणार नाही, याची काळजी घेतली. विधानसभा निवडणुकीचा विचार करता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या फुटीनंतर निर्माण झालेला महाराष्ट्राच्या राजकारणातील चिखल, दलदल पुन्हा चर्चेत आली आहे. या चर्चेला अनेक कंगोरे आहेत. ते सगळे कंगोरे उजेडात, स्पष्टपणे नजरेसमाेर आले आहेत असे नाही. निवडणूक प्रचाराच्या उरलेल्या दहा दिवसांत आणि कदाचित निकालानंतर आणखी बरेच काही उजेडात येईल. आतापर्यंत जे काही घडले आहे तेच मुळी जनतेच्या, मतदारांच्या डोक्याला झिणझिण्या आणणारे आहे आणि जे दिसते ते केवळ हिमनगाचे टाेक वाटावे, अशी स्थिती असेल तर बधीर होण्याशिवाय दुसरा पर्याय सामान्यांच्या हाती उरत नाही. असो! राजकारणाच्या तळाशी सुरू असलेली ही खदखद, अस्वस्थता मतदारांपर्यंत पोहोचू न देण्याची काळजी झाडून सारे नेते घेताहेत. परंपरेने सुसंस्कृत, स्वच्छ, पारदर्शी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके काय चालले आहे ते एका दमात सांगायला कोणीच तयार नाही. त्याऐवजी लाडकी बहीण, लाडके बेरोजगार, शेतकरी, ओबीसी, आरक्षण, जातगणना, संविधान बचाव अशा मुद्द्यांमध्ये मतदारांना गुंतवून ठेवण्याचे धोरण राजकारणी मंडळींनी स्वीकारले आहे. ही स्थिती निकालानंतरही पूर्वपदावर येईल, याची खात्री नाही. तोपर्यंत कोणत्या तरी निमित्ताने बाहेर येणारे छगन भुजबळांसारखे किस्सेच जनतेने गाैप्यस्फोट म्हणून स्वीकारायचे.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळ