शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

लबाडाचं आवतण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:01 IST

मराठी मुंबापुरीतील पृथ्वी शॉ नामक बालकाने राष्ट्रभूमीला जगज्जेते बनविल्याचा आणि ‘पद्मावत’वरील करनी बांधवांची नाराजी शत-प्रतिशत दूर झाल्याचा ई-मेल इंद्रलोकी पाठवून इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर येमके निवांत झाला होता.

- राजा मानेमराठी मुंबापुरीतील पृथ्वी शॉ नामक बालकाने राष्ट्रभूमीला जगज्जेते बनविल्याचा आणि ‘पद्मावत’वरील करनी बांधवांची नाराजी शत-प्रतिशत दूर झाल्याचा ई-मेल इंद्रलोकी पाठवून इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर येमके निवांत झाला होता. एवढ्यात नारदांचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज त्याच्या मोबाईलमध्ये येऊन धडकला! ‘लबाडाचं आवतण...’ ही भानगड काय? एका वाक्यातील या मेसेजने आपला येमके चक्रावून गेला. (येमके - यमगरवाडीचा मनकवडे बरं का!) दीपिकाच्या नाकावर पद्मावतमुळे आलेलं आरिष्ट दूर झालेलं असतानाही नारदांनी तसा मेसेज का टाकला असावा, याचा तो विचार करू लागला. तिने इतिहास सांगणा-या सिनेमातच काम न करण्याच्या निर्णयामुळे तर नारदांनी तसा मेसेज टाकला नसावा ना... की मराठी भूमीत आणखी कुठली भानगड झाली असावी, असे एक ना अनेक प्रश्न येमकेच्या मनात येऊ लागले. यापूर्वीही नारदांनी ‘रुमणं, जित्राब, येटन’ अशा शब्दांचा मेसेज टाकून येमकेला अनेकदा बुचकळ्यात टाकले होते. शेवटी त्याने थेट नारदांना नक्की काय अपेक्षित आहे, हे विचारायचे ठरवले. त्याने फोन केला, नारदांनी केवळ ‘जाणता राजा’ एवढा शब्द उच्चारून फोन कट केला. मराठी भूमीतील सुशिक्षित पंचतारांकित राजकारण्यांना बुचकळ्यात टाकणाºया शब्दांचं नातं जाणत्या राजाशी असल्याचा पक्का अंदाज येमकेने बांधला आणि राज्यातील आपले सर्व सोर्सेस कामाला लावले. नमो आणि कंपनीने बळीराजाला दिलेल्या दीडपट भावाचे निमंत्रण म्हणजेच ‘लबाडाचं आवतण’ या निष्कर्षाला येऊन तो पोहोचला. औरंगाबाद भूमीत जाणत्या राजाने हल्ल्याचे बोल व्यक्त करताना तसे शब्द उच्चारल्याचेही त्याला समजले.त्याने इंद्रलोकी पाठविण्याचा रिपोर्ट तयार करण्याअगोदर नारदांशी चर्चा करण्याचे ठरविले व त्यांच्याशी संपर्क साधला.येमके - महागुरू, आपल्याला ‘पद्मावत’त्रस्त दीपिकातार्इंचा रिपोर्ट पाहिजे होता का? त्यांच्या नाकावरील शूर्पणखा अवस्थेचे संकट आता टळलेले आहे. २०० कोटींचा गल्लादेखील भन्साळींच्या खात्यावर जमा झाला आहे. मग आता हे ‘लबाडाचं आवतण...’नारद - (येमकेचे बोलणे कट करून) येमके, शिळ्या बातम्या सांगू नका. आवतणाचं बोला.येमके - महागुरू, तुम्हाला जाणता राजाचा रिपोर्ट पाहिजे की जेटलींच्या ‘केटली’तून बाहेर पडलेल्या आवतणांचा?नारद - तेही तिन्ही लोकी सर्वांनाच माहिती आहे... औरंगाबादमधील बोलांच्या हल्ल्यात काय झाले?येमके - जी गुरुदेवा. तोच रिपोर्ट तुम्हाला देतो. दीडपट भावाने आता बळीराजाच्या घरी प्रत्येक सुगीला दिवाळी करण्याचे स्वप्न ‘नमो’ आणि कंपनीने पाहिले आहे. जाणता राजांनी त्यांच्या स्वप्नांचा भंग करणारे बोल उद्धृत केले आहेत.नारद - येमके आता तुम्हाला विषय समजला. मग बळीराजाने आता खूश व्हायला काय हरकत आहे?येमके - एरंडाचं गु-हाळ आणि लबाडाचं आवतण यातून कुणालाच काही मिळत नाही, हा अनुभव आहे देवा! मग बळीराजानं खूश कसं व्हायचं.नारद - येमके आता तू स्वामीनाथन् नामक ऋषीने सुगीच्या दिवाळीबद्दल लिहिलेल्या अध्यायाचा अभ्यास कर. त्यातील दीडपट कमाईचा सिद्धांत वाच आणि मगच कोणत्याही आवतणावर तुझा रिपोर्ट पाठव.(लेखक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत.)

टॅग्स :Padmavatपद्मावत