शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

एकट्या ज्येष्ठांना तरुणांशी जोडणारी 'टाइम बँक'; वेळेचा हा जमा-खर्च तुमच्या 'खात्यात' जमा होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 08:35 IST

तुम्ही कुणासाठी वेळ द्या. तुम्हाला जेव्हा मदतीची गरज वाटेल तेव्हा कुणीतरी तुमच्यासाठी वेळ देईल. वेळेचा हा जमा-खर्च तुमच्या 'खात्यात' जमा होईल !

उज्ज्वला बर्वेमाध्यम अभ्यासक

"आयुष्य किती सरलंय माहीत आहे, किती उरलंय माहीत नाही. पैसे किती सरलेत, किती उरलेत माहीत आहे, आला दिवस सरणार आहे माहीत आहे दिवसाचा एकेक क्षण का सरता सरत नाही तासन्तास विचार करूनही कळत नाही." पंचाहत्तर वर्षाच्या एका व्यक्तीचे हे शब्दही आज बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांची कैफियत आहे. हे आजोबा किंवा आजी अंथरुणाला खिळलेले नाहीत. चांगले हिंडते-फिरते आहेत; पण रोज जाणार तरी कुठे? आयुष्यभर भरपूर प्रवास झाला, नाटक-सिनेमे पाहून झाले, वाचन झालं. आता ते घरात एकटेच राहतात. घर आवरून तरी किती आवरणार? स्वयंपाकात तरी किती वेळ घालवणार? सोसायटीतल्या त्याच त्याच लोकांशी तेच तेच किती वेळा बोलत राहणार? आणखी काही तरी वेगळं पाहिजे. वेगळे लोक, वेगळे विषय. नवा उत्साह देणारे, कशाची, कुणाची तरी वाट पाहता आली पाहिजे. सगळ्यांची भावना थोड्याफार फरकाने हीच असते.

पैशांच्या मोबदल्यात जे मिळतं त्याच्या पलीकडलं काहीतरी हवं असतं. भारतातच नाही, तर परदेशातही तीच परिस्थिती आहे. लांबलेलं आयुष्य, चांगल्या संधींच्या शोधात दुसऱ्या ठिकाणी गेलेले किंवा एकाच घरात राहूनही आपापल्या व्यापात, विवंचनांत बुडालेले आप्तस्वकीय, सारखं शेजारी बसायला, बोलायला कोण मिळणार? याच विषयावरच्या एका नाटकात साठ वर्षांचा एक मुलगा आपल्या नव्वद वर्षाच्या धडधाकट वडिलांसाठी 'जेएफएस' या संस्थेच्या स्वयंसेवकाला बोलावतो असा प्रसंग होता. ती मुलगी आल्यावर सांगते, "आम्ही तरुणांनी 'ज्युनिअर्स फॉर सीनिअर्स' अशी संस्था सुरू केली आहे. आम्ही सीनिअर्सना त्यांचे इंटरेस्ट विचारतो आणि त्या विषयांसंबंधी त्यांच्याशी गप्पा मारायला आमच्यातलं कुणीतरी जातं. त्यासाठी पॉकेटमनीइतकेच किरकोळ पैसे आम्ही घेतो." नंतर एक आजी हौशी क्रोशे विणकामवाली स्वयंसेवक मिळेल का बघतात. ती मिळाल्यावर आजींना नवतंत्र कळतं, तरुणीला जुन्या पद्धती कळतात, असं काहीसं त्या नाटकात दाखवलं होतं.

किती सोयीची व्यवस्था आहे ही. उतारवयात तरुण पिढीची संगत जास्त ऊर्जादायी वाटते. तरुणदेखील त्यांच्या आई-वडिलांच्या पिढीपेक्षा आजी-आजोबांच्या पिढीच्या बाबतीत जास्त समंजस, सहनशील असतात. कुणीतरी आपल्या आवडीच्या विषयासंबंधी आपल्याशी गप्पा मारायला आपल्या घरी येणार आहे, बोलायला ही भावना किती उत्साह निर्माण करणारी असेल ते त्या टप्प्यावर अद्याप न पोहोचलेल्या व्यक्तीला कळणं अवघडच. तरुणपणी आपण कुणासाठी वेळ दिला तर तो आपल्या खात्यात जमा करून पुढे आपल्याला उपयोगी पडेल, अशी व्यवस्था करणारी 'समयपेढी-टाइम बैंक' ही संकल्पना हळूहळू रुळते आहे. 'टाइम इज मनी' हे तत्त्व स्वीकारून तिथे पैशांचा व्यवहार होत नाही, तर वेळ हेच चलन मानून एकमेकांना मदत केली जाते.

ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी नाही; पण त्यांना त्याचा सगळ्यांत जास्त उपयोग होतो. 'टाइम बैंक' उपक्रमात एखाद्याकडचे फोटो बघून नीट लावून देण्यापासून त्यांचं स्कॅनिंग करून देण्यापर्यंत किंवा पुस्तक वाचून दाखवण्यापासून गप्पा मारण्यापर्यंत दुसऱ्यासाठी केलेलं कोणतंही काम गृहीत धरलं जातं. एकच व्यक्ती कधी वेळ देणारी होते, तर कधी दुसऱ्याचा वेळ मागणारी होते. त्यानुसार त्यांच्या खात्याचा हिशेब ठेवला जातो. एक तास दुसऱ्यासाठी दिला तर आपल्या खात्यात एक तास जमा होतो, दुसऱ्याचा एक तास वापरला तर खात्यातून एक तास वळता होतो. ज्या व्यक्तीसाठी एक तास दिला त्याच्याचकडून एक तास पुन्हा मिळवायचा नसल्याने तरुण व्यक्तीसुद्धा एकमेकांच्या कामांसाठी त्याचा वापर करून घेऊ शकतात.

ही योजना पहिल्यांदा अमेरिकेत सुरू झाली. आता जगभरातल्या अठेचाळीस देशांत ती सुरू आहे. www.timebanks.org ही शीर्षस्थ संस्था स्थापन झाली आहे. तिचे जवळपास पाच लाख सदस्य आहेत आणि 'रोटरी'सारख्या संस्था या उपक्रमाशी संलग्न होऊ लागल्या आहेत. शीर्षस्थ संस्था नव्या बँकांच्या उभारणीसाठी मदत करते, प्रशिक्षण देते. भारतात 'टाइम बैंक ऑफ इंडिया' या नावाने जयपूरमध्ये हा उपक्रम सुरू झाला. तो भारतातल्या २८ राज्यांमधील ४१५ शहरांत पोहोचला आहे आणि भारतातली एकूण सदस्यसंख्या नऊ हजारांच्या आसपास आहे. या संस्थेचा उद्देश प्रामुख्याने एकट्या ज्येष्ठ नागरिकांची संगत करणे, त्यांची छोटी-मोठी कामं करून देणं हाच आहे. आतापर्यंत अकरा हजार तासांची उलाढाल या बँकेतर्फे झाली आहे. कुटुंबं लहान होतील, वय वाढत जातील, पैशांनी विकत घेण्यासारख्या वस्तूंपेक्षा परस्पर सहवास जास्त आनंद देऊ लागेल तशा या समयपेढ्यांच्या शाखा वाढत जातील, अशी चिन्हं सध्या दिसत आहेत.ujjwalabarve@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Time Bank: Connecting Seniors with Youth, Investing Time Wisely

Web Summary : Time Banks connect seniors with youth, exchanging time for services. This global concept, originating in the US, helps combat loneliness and provides mutual support. India's Time Bank facilitates companionship and assistance for elders, fostering community and purpose.
टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिक