शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तितिक्षा

By admin | Updated: January 16, 2015 00:35 IST

येणारी दु:खे न बोलावता येतात. कधी कधी ती दु:खे दूर करणे आपल्या हातात नसते. ती न घालवता जातातही. सुखाच्या क्षणांचेही तसेच आहे. प्रारब्ध कर्मानुसार सुखदु:खांच्या या घटनांचे चक्र चालू असते.

ज्ञानसाधू वा.गो. चोरघडे - परमार्थ साधकांसाठी, अध्यात्म ज्ञानाच्या जिज्ञासूंसाठी साधना चतुष्ट्य सांगितले गेले आहे. विवेक, वैराग्य आणि मुक्तीच्या जिज्ञासेसोबत असलेल्या आवश्यक असलेल्या गुणवैशिष्ट्यात तितिक्षा हा महत्त्वाचा गुणविशेष आहे. तितिक्षा या शब्दाचा अर्थ सहनशक्ती, क्षमा करण्याची वृत्ती, धीर धरणे इत्यादी. ज्ञानवंताच्या क्षमाशील वृत्तीत, ज्ञानदेवांनी तितिक्षेची सर्व लक्षणे सांगितली आहेत.जो मानापमानाते साहे।तो सुखदु:ख जेथ समाये। निंदास्तुती नोहे। दुखंडु जो।।उन्हाळेनि जो न तापे।हिमवंती न कापे। कायसेनिही न वासिपे। पातलेया।।नाना चराचरी भूती।दाटणी नव्हे क्षिती।तैसा नाना द्वंद्वी। घामेजेना।।(ज्ञाने. १६. ३४४.७५)जीवनात आपल्याला अनेक द्वंद्वांना सामोरे जावे लागते. मान, अपमान, गरिबी-श्रीमंती, निंदा-स्तुती, ऊन-पाऊस या स्थितीत चित्ताचे समत्व राखणे, आलेली स्थिती सहन करणे हे इथे अपेक्षित आहे. आयुष्यात येणारी द्वंद्वात्मक अवस्था बिनतक्रार सहन करणे म्हणजे तितिक्षा. केवळ सहन करणेच नव्हे तर ती सहन करीत असल्याचे भानही नसणे.तैसा जयाचिया ठायी।न साहणे काहीच नाही।आणि साहतु हेमेही। स्मरण नुरे।।कायिक, वाचिक, मानसिक दु:खे अप्रतिकारपूर्वक सहन करणे म्हणजे तितिक्षा, अशी शंकराचार्यांनी त्याची व्याख्या केली आहे.सहनं सर्व दु:खानां अप्रतिकारपूर्वकं चिंता विलापरहितं सा तितिक्षा निगद्यते!येणारी दु:खे न बोलावता येतात. कधी कधी ती दु:खे दूर करणे आपल्या हातात नसते. ती न घालवता जातातही. सुखाच्या क्षणांचेही तसेच आहे. प्रारब्ध कर्मानुसार सुखदु:खांच्या या घटनांचे चक्र चालू असते. प्रतिकूल अनुभवांना दूर सारणे किंवा सुखी क्षणांना ठेवून घेणे आपल्या हातातही नसते. त्याच्या चिंता वाहत बसणे, त्यात मिळालेले आयुष्य खर्ची घातल्याने जीवनाची यथार्थता शोधण्याचा, सत्य शोधण्याचा प्रयत्न कसा घडणार? मिळालेले जीवन कृतार्थ व्हावे, त्याचा हेतू लक्षात यावा. प्रत्येक क्षणाचा उपयोग सत्संग, सद्विचारांचे श्रवण, त्याचे चिंतन करीत मी कोण आहे; माझे स्वरूप काय आहे, याचा बोध करून घेणे यातच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे. उन्हाळा आला की उन्हाचा त्रास होणार, हिवाळ्यात थंडीचा. प्रत्येक ऋतूत बदलणाऱ्या हवामानाचा बरा-वाईट परिणाम होणारच आहे. ज्येष्ठांनी विशेषत: हे लक्षात ठेवावे.