शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
5
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

‘हे’ येतील, ‘ते’ येतील.. की दोघेही लटकतील?

By यदू जोशी | Updated: October 18, 2024 10:49 IST

महाराष्ट्र ४ वर्षे ११ महिने पुरोगामी असतो आणि निवडणुकीच्या महिन्यात कमालीचा जातीयवादी बनतो. या अनुभवाची पुनरावृत्ती होऊ घातली आहे.

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत -

लोकसभा निवडणुकीत जातिपातीच्या जाणिवा तीव्र होत्या; विधानसभेलाही त्या तशाच दिसत आहेत. मराठा, ओबीसी, दलित, मुस्लीम आणि लहान-लहान जाती कोणासोबत जातील, यावर बरेच काही अवलंबून असेल. मनोज जरांगे- पाटील काय निर्णय घेतात, यावर निवडणूक इकडे किंवा तिकडे फिरेल. अपक्ष आणि लहान पक्षांचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीलाही मतदारसंघनिहाय बसेल; पण एकूण विचार केला तर जास्त फटका हा महाविकास आघाडीला बसेल. मतविभाजनाचा भाजपला फायदा होतो हा याआधीचाही अनुभव आहे. लोकसभा निवडणुकीत जिथे विभाजन झाले (अकोला, बुलढाणा, हातकणंगले आदी) तिथे महायुतीला फायदा झाला. लहान पक्ष वा अपक्षांना यावेळी कोणाची, कुठे, कशी रसद मिळते, ते कळेलच अन् त्यातून त्यांना कोणी उभे केले आहे, तेही समजेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच न झाल्याने अनेक ठिकाणी इच्छुकांची गर्दी झाली आहे. बंडखोरीचे पेव सर्वत्र फुटेल असे दिसत आहे. जात समीकरणांचे ध्रुवीकरण कसेे होते हेही महत्त्वाचे आहे.  बरेच मतदारसंघ असे आहेत की, जिथे तीन ते चार जाती अत्यंत प्रभावी आहेत. त्यातील दोन तगड्या जाती ज्या पक्षाच्या वा उमेदवाराच्या मागे उभ्या राहतील त्यांनी उरलेल्या जातींमध्ये विभाजन घडवून आणले की मोहीम फत्ते होईल. महाराष्ट्र ४ वर्षे ११ महिने पुरोगामी असतो आणि निवडणुकीच्या शेवटच्या महिन्यात तो कमालीचा जातीयवादी  बनतो या अनुभवाची पुनरावृत्ती होऊ घातली आहे.  कोणाचीही लाट नाही, ‘जिंकू की नाही’ याची धास्ती इकडेही आहे आणि तिकडेही आहे. दोन-चार हजारांच्या फरकाने अनेक ठिकाणचे फैसले होतील. पैशांचा पाऊस पडेल. बंडखोर आणि अपक्ष मुख्य पक्षांच्या जय-पराजयाचे पारडे वरखाली करतील. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या प्रचंड धक्क्यातून महायुती जरा सावरल्यासारखी दिसत आहे. ‘लाडक्या बहिणी’सह सरकारच्या लोकाभिमुख निर्णयांचा महायुतीला टेकू मिळाला आहे. तरीही ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी दिसते; पण अनेकांशी चर्चा करताना असा सूर दिसतो, की आजच्या अंदाजानुसार महाराष्ट्राची विधानसभा ही त्रिशंकू असेल. सरकार स्थापन करायला काही आमदार दोघांनाही कमी पडतील. त्यामुळे निकालानंतर चार दिवसांत नवीन सरकार आले असे होणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार आणि राज्यपाल हे फॅक्टर त्यावेळी महायुतीच्या मदतीला धावून येऊ शकतात. लोकसभेत झालेल्या धुलाईनंतर त्रिशंकूच्या चर्चेपर्यंत महायुतीला आणून ठेवले हे शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे यश आहे. हेच येतील की तेच येतील असे आज सांगता येत नाही. महामंडळे अचानक कशी? आचारसंहितेच्या आधी लहान-लहान समाजांसाठी वीसएक महामंडळांची घोषणा अचानक झालेली नाही. निवडणूक समोर ठेवून निर्णय झाला असे नक्कीच म्हणता येईल. भाजपला साथ देणाऱ्या मायक्रो ओबीसींसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रासाठीचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लहान-लहान ओबीसी, मागास जातीवार बैठका सागर बंगल्यावर घेतल्या. बहुतेक समाजांनी त्यांच्या कल्याणासाठी महामंडळाची मागणी केली आणि त्यानुसार महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. पाच जागा रिकाम्या का? विधानपरिषदेच्या १२ पैकी सातच जागा महायुती सरकारने भरल्या. पाच रिकाम्या का ठेवल्या असतील? टाॅपच्या काही नेत्यांना विचारले. या प्रश्नावर त्यांनी  एक तर उत्तर दिले नाही किंवा ‘तुम्हीच समजून  घ्या’ म्हणाले. महायुतीला सत्ता परत मिळविण्याची खात्री वाटते म्हणून जागा रिकाम्या ठेवल्या असतील हा एक तर्क झाला. त्यापेक्षा महत्त्वाचे हे की, आता पाच जागांच्या आड पंचवीस जणांना आश्वासन देता येते. ‘निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी झोकून द्या, मग तुमचा विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी विचार करू’, असे गाजर दाखवता येते. पाच रिकाम्या जागांच्या आड २५ नेत्यांना सक्रिय ठेवण्याची ही रणीनीती दिसते. विधानसभेसाठी एखाद्या तगड्या इच्छुकांपैकी कोणाला उमेदवारी नाकारली तर ‘तू दोन महिने थांब, आपले सरकार आले की विधान परिषदेवर पाठवू’ असा  डोस पाजता येतो. मंत्रिमंडळात दोनचार जागा गाजर म्हणून रिकाम्या ठेवतात ना, बस! हा फॉर्म्युला तसाच आहे. चार ओळींची हेडलाइन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यागाची करून दिलेली आठवण, त्यावेळी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि तहसीलदारांचे दिलेले उदाहरण असे सगळे याच ठिकाणी गेल्या आठवड्यात लिहिले होते. तीन दिवसांनी चॅनेलवाल्यांनी त्याच्या हेडलाइन्स केल्या. मग दुसऱ्या दिवशी काही वृत्तपत्रांनी त्या फॉलो केल्या. ‘लोकमत’च्या लेखातील चार ओळींच्या अशा धमाकेदार बातम्या होतात हे बघून छान वाटले.    yadu.joshi@lokmat.com

 

टॅग्स :Electionनिवडणूक 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती