शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

सोशल मीडिया ट्रोलिंगवर प्रभावी उपाय नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 6:07 AM

सोशल मीडियाचा वापर (आपल्याकडेच नाहीतर जगभर) वाढू लागल्यावर त्यामध्ये काही समाजविघातक बाबी शिरणे अपरिहार्यच होते.

- डॉ. दीपक शिकारपूर ( संगणक साक्षरता प्रसारक ) सोशल मीडियाचा वापर (आपल्याकडेच नाहीतर जगभर) वाढू लागल्यावर त्यामध्ये काही समाजविघातक बाबी शिरणे अपरिहार्यच होते. सायबर गुन्हेगार इथेही सक्रिय झालेच - स्वत:ची खोटी प्रोफाइल ठेवून नोकरी, विवाह, प्रवास, व्यापार किंवा मैत्रीच्याही निमित्ताने लोकांना जाळ्यात ओढणे आणि पैशांना किंवा वैयक्तिक पातळीवरील इतर गोष्टींमध्ये ठकवणे हादेखील एक मोठा व्यवसायच बनला असे म्हणावे लागेल. सर्वसामान्य सरळमार्गी वापरकर्त्यांनी योग्य सावधगिरी घेण्याबरोबरच अशा व्यक्तींना कायद्याच्या जाळ्यात पकडण्यासाठी सर्वच देशांत विविध सायबर-कायदे झपाट्याने लागू केले आहेत. भारतही ह्याला अपवाद नाही.हल्ली मध्यम आकाराच्या शहरांतील मुख्य पोलीस ठाण्यांमध्येही सायबर क्राइम सेल असतो हे आपण पाहतोच. मात्र एका बाबीवर अजून तरी तितक्याशा प्रमाणात प्रभावी उपाय सापडलेला नाही आणि ती म्हणजे ट्रोलिंग (३१ङ्म’’्रल्लॅ). हा शब्द हल्ली बराच ऐकू येत असतो; कारण स्वत:ला फुकटची प्रसिद्धी मिळावी (तीदेखील ताबडतोब आणि जगभर.) ह्यासाठी, अगोदरच प्रसिद्धीच्या वलयात असलेल्या, व्यक्ती किंवा संस्थांना अशा मंचांवर बदनाम करण्याचा उद्योग अनेकांनी सुरू केला आहे. विपर्यास केलेल्या, फुगवलेल्या किंवा चक्क खोट्याच बातम्या पसरवणे हादेखील ट्रोलिंग संकल्पनेचा फार मोठा हिस्सा आहे. हा प्रकार एकंदरीतच अतिशय गंभीर असल्याने आपण त्याचा व्यवस्थित परामर्श घेऊ.भारत, चीन, रशिया, अमेरिका व इतरही अनेक देशांत जाणीवपूर्वक केलेल्या ट्रोलिंगची प्रकरणे उघडकीला आली आहेत. २०१४ च्या अमेरिकेतील निवडणुकीत मतदारांचा कल बदलण्यासाठी रशियाने हस्तक्षेप केल्याचा आरोप तर सर्वत्र गाजतो आहेच. तर हार्वर्डमधील एक राजकीय विश्लेषक गॅरी किंग ह्यांच्या अहवालानुसार चिनी सरकारचाच एक भाग असलेली द फिफ्टी सेंट पार्टी दरवर्षी, सरकारी योजनांचे गोडवे गाण्यासाठीच, ४४ अब्ज पोस्ट सोशल मीडियामध्ये सोडते. सर्वसामान्य चिनी नागरिकांमधील असंतोष उफाळू नये ह्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच ह्या पोस्ट तयार करवून घेतल्या जातात आणि चीनच्या सरकारने ह्याचे अधिकृतरीत्या समर्थनही केले आहे. चीनइतके ट्रोलिंगचे जाहीर समर्थन इतर देश करीत नाहीत हे खरे असले तरी विशिष्ट माहिती संदर्भ सोडून इतरत्र पोस्ट केल्याने बरीच खळबळ उडवता येते हे काही वर्षांपूर्वीच्या रशिया - युक्रेनमधील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संघर्षात सिद्ध झाले. नाटो (ठअळड) ने ह्याला विकिपीडिया ट्रोल असे नाव दिले. कारण, हजारो खोट्या अकाउंट्समार्फत पसरवल्या गेलेल्या, ह्या ट्रोल्समधली लष्करी साहित्याची माहिती अक्षरश: खरी होती. ‘अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचा इतिहास’ ह्या शीर्षकाखाली ही माहिती चक्क विकिपीडियावर उपलब्ध होती व आहे. आता हे ट्रोलिंग ओळखणे खरोखरीच अवघड आहे; कारण ह्यामधील माहिती खरी आहे, कोणतीही भडकावू भाषा किंवा वाचकाच्या भावनांना आवाहन इत्यादी नाही, तरीही (सरकारी भाषेत सांगायचे तर) जनतेच्या मनात संदेह उत्पन्न करण्याचे काम काही पोस्ट्सनी बरोबर केले आहे.याचे ताजे उदाहरण म्हणजे, सौदी अरेबियाच्या धोरणांवर टीका करणारे पत्रकार जमाल खशोगी ह्यांची आॅक्टोबर २०१८ मध्ये हत्या झाली. ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या ह्याबद्दलच्या अहवालात म्हटले आहे की, हत्येपूर्वी खशोगी आणि त्यांच्या निकटवर्तीयांना त्रास देण्यासाठी सौदी अरेबियन सरकारने ट्विटर ट्रोलर्सची एक फौजच वापरली. प्रत्येक माध्यमाची क्षमता अन् उपयोगिता वेगवेगळी आहे हे समजून घेऊन सोशल मीडिया वापरकर्त्यांनी संतुलित मानसिकता ठेवावी हेच श्रेयस्कर.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया