एल मेंचो या ड्रग माफियाचा खात्मा; पुढे काय? 

By विजय दर्डा | Updated: March 2, 2026 05:12 IST2026-03-02T05:11:06+5:302026-03-02T05:12:19+5:30

पोलिस अधिकाऱ्याचे शीर कापणाऱ्या एल मेंचो या ड्रग माफियाला टिपून मारल्यानंतर मेक्सिको आणि जगभरात नेमके काय बदलेल?

The end of the drug mafia, El Mencho; what next? | एल मेंचो या ड्रग माफियाचा खात्मा; पुढे काय? 

एल मेंचो या ड्रग माफियाचा खात्मा; पुढे काय? 

-डाॅ. विजय दर्डा ,

चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

अमली पदार्थांच्या जाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी घणाघाती प्रहार करण्याविषयी मागच्या आठवड्यात याच सदरात लिहिले होते. त्यात मेक्सिकोतील ड्रग माफियाचाही उल्लेख आला होता. जगातील सर्वांत मोठा अमली पदार्थांचा व्यापारी एल मेंचो याला मेक्सिकोचे सैन्य ठार मारील, अशी कल्पना त्यावेळी नव्हती. गेल्या कित्येक वर्षांपासून तो मेक्सिकोतील सत्तेला आव्हान देत होता. त्याने अमेरिकेच्याही नाकीनऊ आणले होते. अमेरिकेच्या सरकारने त्याला पकडण्यासाठी सुमारे १३६ कोटी डॉलर्सचे इनाम ठेवले होते. 
मेंचो याच्या मृत्यूने नेमके काय बदलेल? 

मी मेक्सिको या देशातून प्रवास केला आहे. अमली पदार्थांच्या व्यापाराचा अनिर्बंध आणि भयावह परिणाम सगळीकडे दिसतो. अमली पदार्थ घरपोच दिले जातात. कोपनहेगन आणि कॅनडातही मला ते आढळले. मेक्सिकोत ड्रग माफियांच्या अनेक टोळ्या आहेत; परंतु एल मेंचोची टोळी सगळ्यात मोठी आणि क्रूर. त्याचे खरे नाव नेमेसियो ओसेगुएरा सर्वेंटेस असे होते. मेक्सिकोच्या  डोंगराळ भागातील गावात त्याचा जन्म झाला. गावात अवोकाडो, अफू तथा मारिजुआनाची शेती होती. नशीब अजमावण्यासाठी तो अवैध मार्गाने अमेरिकेत पोहोचला. तेथे हेरॉइनच्या तस्करी प्रकरणात पकडला गेला. शिक्षा भोगून हकालपट्टी होऊन पुन्हा मेक्सिकोत पोहोचला. पोलिसांची कार्यप्रणाली बारकाईने समजून घेण्यासाठी तो पोलिसांत भरती झाला. काही दिवसांनंतर त्याने पोलिसांची वर्दी उतरवून फेकून दिली आणि ड्रग माफियांच्या मिलेनिओ कार्टेलसाठी मारेकरी म्हणून काम करू लागला. परंतु त्याची नजर म्होरक्याच्या खुर्चीवर होती. मिलेनिओ कार्टेलवर कब्जा करण्याचा त्याचा प्रयत्न सफल झाला नाही. नंतर त्याने स्थानिक मनी लाँड्रिंगच्या टोळीबरोबर काम करायला सुरुवात केली. न्यू जनरेशन कार्टेल सुरू करून दुसऱ्या टोळीविरुद्ध उघड संघर्ष पत्करला. खंडणीखोरी सुरू केली. राजकीय नेते आणि पोलिस अधिकाऱ्यांना भरपूर लाच चारली. जे बधले नाहीत, त्यांना निर्दयपणे ठार मारले. लोकांमध्ये दहशत पसरावी म्हणून ज्याला मारले त्याचे शीर कापून तो पुलावर टांगून ठेवत असे. २०१५  मध्ये केवळ दीड महिन्यात मेंचोच्या  टोळीने १२  इमानदार पोलिस कर्मचाऱ्यांची गळा कापून हत्या केली होती.

२०२० मध्ये त्याच्या टोळीने मेक्सिको शहराचे तत्कालीन पोलिसप्रमुख उमर गार्सिया हारफुच यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्या हल्ल्यातून पोलिसप्रमुख बचावले; परंतु त्याची ताकद आणि प्रशासनात तो कुठवर पोहोचलेला होता, याचा अंदाज लावता येईल. २०१५ मध्ये मेक्सिकोच्या सैन्याला त्याचा ठावठिकाणा कळला; पण मेंचोच्या टोळीने रॉकेटने सैन्याचे हेलिकॉप्टर पाडले आणि मेंचोला  पळून जाण्यासाठी वेळ मिळाला. त्याचे गुप्तचर तंत्र इतके मजबूत होते की डोळ्यांची पापणी लवताच त्याला माहिती मिळत असे. 
‘अनेकदा प्रेमिकाच जीवघेणी ठरते’ अशी एक जुनी म्हण आहे. मेंचोच्या बाबतीतही असेच झाले. त्याच्या प्रेमिकेच्या एका मित्रावर गुप्तचर लक्ष ठेवून होते. त्या व्यक्तीने मेंचोच्या मैत्रिणीला एका खास ठिकाणी पोहोचवले. जेथे मेंचो तिला भेटायला आला. दुसऱ्या दिवशी ती मैत्रीण निघून गेली. परंतु मेंचो तेथेच राहिला. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी याची खातरजमा केली आणि हल्ला केला. जखमी झालेल्या मेंचोने एअर ॲम्ब्युलन्समध्ये प्राण सोडला.

मेंचोच्या मृत्यूनंतर त्याच्या टोळीने  मेक्सिकोमध्ये ज्याप्रकारे दहशत माजवली आणि पोलिसांवर हल्ले केले ते संपूर्ण देशाला भयभीत करणारे आहे. पोलिसांचे अनेक अधिकारी मारले गेले. एका अंदाजानुसार मेक्सिकोतील अमली पदार्थ टोळ्यांच्या सदस्यांची संख्या दोन लाखांपर्यंतची असू शकते. मेक्सिकन टोळ्यांचा कारभार संपूर्ण दुनियेत पसरलेला आहे. केवळ अमेरिकेत या जाळ्याची रोजची कमाई पाच ते सहाशे कोटी रुपये इतकी आहे. संपूर्ण जगात त्यांच्या कारभाराचा हिशेब इतका मोठा आहे की आकडे वाचणे सामान्य माणसाला कठीण होईल.
अमली पदार्थांच्या व्यापारात मेंचोची टोळी प्रचंड पैसा कमावते. ‘गॉडफादर’ कादंबरी किंवा सिनेमा आठवतो?-  मेंचो त्यापेक्षाही जास्त खतरनाक होता. त्याची टोळी अमली पदार्थांबरोबरच जगभर मुलींच्या अपहरणाचा धंदाही चालवत होती. मेक्सिकोच्या सैन्याने या टोळीकडून चिलखती गाड्या आणि अग्निबाण प्रक्षेपक जप्त केले आहेत. मेंचोच्या  मृत्यूनंतर कॅलिफोर्नियात  जन्माला आलेल्या  जुआन कार्लोस वैलेंसिया गोंजालेज याने स्वतःला नवा माफिया घोषित केले आहे. 

यानंतर मेक्सिकोतील अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त होईल काय? - ही केवळ मेक्सिकोची लढाई नाही. मेक्सिको अमली पदार्थांचे उगमस्थान आहे. शिकार तर संपूर्ण दुनिया झाली आहे. ज्याप्रकारे अमेरिकेने मेक्सिकोला सहकार्य केले तसे संपूर्ण जग मेक्सिकोच्या मदतीला आले पाहिजे. प्रत्येक देशात नाकाबंदी झाली पाहिजे आणि अमली पदार्थांच्या टोळ्यांवर जगभर कठोर प्रहार झाला पाहिजे. ही जाळी नेस्तनाबूत केली नाहीत, तर भावी पिढ्या  परिणाम भोगतील. या धंद्यामध्ये लोकांची लालसा संपूर्ण जग उद्ध्वस्त करते आहे.

Web Title : एल मेंचो का अंत: ड्रग माफिया का भविष्य क्या है?

Web Summary : एल मेंचो की मौत से शायद मेक्सिको में ड्रग युद्ध खत्म न हो। उसके गिरोह ने पूरी दुनिया में आतंक मचाया। नशीली दवाओं के कार्टेल से लड़ने और भावी पीढ़ी को विनाशकारी प्रभाव से बचाने के लिए सहयोग की आवश्यकता है। नए नेता उभर रहे हैं, लड़ाई जारी है।

Web Title : End of El Mencho: What's Next for the Drug Mafia?

Web Summary : El Mencho's death might not end Mexico's drug war. His cartel terrorized Mexico, with global reach. Cooperation is needed to fight drug cartels and protect future generations from their devastating impact. New leaders emerge, the fight continues.