शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कलकत्ता हायकोर्टात मुख्य न्यायाधीशांचा लाल गाऊन आणि विग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 04:48 IST

कलकत्ता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश विशेष प्रसंगी पारंपरिक लाल गाऊन आणि पांढरा विग घालतात. ही वसाहतकालीन प्रथा अजूनही जपली जाण्यामागचे रहस्य!..

डॉ. खुशालचंद बाहेती, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त व महाव्यवस्थापक- जनसंपर्क लोकमत

अनेक चित्रपटांत डोक्यावर पांढरा विग घातलेले न्यायाधीश आपण पाहिले आहेत. ब्रिटिश मॅजिस्ट्रेट  लाल रंगाचा सोनेरी नक्षीदार लांब डगला घालायचे.  प्रत्यक्षात भारतीय न्यायालयात आता विग घातलेले न्यायाधीश दिसत नाहीत; पण कलकत्ता उच्च न्यायालयात मात्र मुख्य न्यायाधीश विशेष प्रसंगीचा पोशाख म्हणून लाल रंगाचा गाऊन व लांब केसांचा विग अजूनही वापरतात. 

यंदा जानेवारी महिन्यात न्यायमूर्ती सुजॉय पॉल यांनी कलकत्ता उच्च न्यायालयाचे  मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली, तेव्हा ही वसाहतकालीन परंपरा पुन्हा चर्चेत आली. न्या. पॉल पारंपरिक लाल गाऊन  आणि पांढऱ्या कुरळ्या केसांचा न्यायालयीन विग परिधान करून दिसले.  मार्च २०२६ मध्ये  न्या. पॉल यांनी आर. एन. रवी यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून शपथ दिली; तेव्हाही  ते लाल गाऊन आणि विग घालून उपस्थित होते. भारतातील बहुतांश न्यायालयांनी ही प्रथा अनेक वर्षांपूर्वी बंद केली असली तरी कलकत्ता उच्च न्यायालयात काही विशिष्ट समारंभांमध्ये ती आजही पाळली जाते.

न्यायाधीशांनी विग घालण्याची परंपरा इंग्लंडमध्ये सतराव्या शतकात सुरू झाली. राजघराणे, उच्चवर्गीय अधिकारी आणि व्यावसायिक वर्गातील लोक विग वापरू लागले. याच काळात न्यायाधीश आणि वकील यांनीही औपचारिक पोशाखाचा भाग म्हणून विग वापरण्यास सुरुवात केली. १६८५ नंतर इंग्लंडमधील न्यायालयांमध्ये विग हा न्यायाधीश व वकिलांच्या पोशाखाचा स्थायी भाग बनला. विगची फॅशन पुढे कमी झाली, तरी न्यायव्यवस्थेने परंपरा आणि प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून ती कायम ठेवली. पारंपरिक न्यायालयीन विग हे साधारण पांढऱ्या किंवा राखाडी रंगाच्या घोड्याच्या केसांपासून  तयार केले जातात.

काही आधुनिक विग सिंथेटिक फायबरपासूनही बनवले जातात; मात्र पारंपरिक न्यायालयीन समारंभात आजही घोड्याच्या केसांपासून बनवलेल्या विगलाच अधिक प्रतिष्ठा दिली जाते. विग वापरण्यामागे काही व्यावहारिक आणि प्रतीकात्मक कारणे होती. पहिले म्हणजे न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आणि अधिकार दर्शवणे. विग आणि गाऊनमुळे न्यायाधीशांचा व्यक्तिगत नव्हे तर संस्थात्मक अधिकार अधोरेखित होतो. दुसरे कारण म्हणजे समानता आणि औपचारिकता. 

सर्व न्यायाधीश आणि वकील एकसारखा पोशाख परिधान करत असल्याने न्यायालयातील औपचारिक वातावरण राखले जाते. या परंपरेची मुळे ब्रिटिश काळात आढळतात. हायकोर्ट ॲक्ट १८६१ अंतर्गत ब्रिटनच्या राणीला कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास येथे उच्च न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला होता. ही तीनही ‘चार्टर्ड’ उच्च न्यायालये ब्रिटिश काळातील सुप्रीम कोर्टाची थेट उत्तराधिकारी होती. त्यांची स्थापना भारतीय कायद्याअंतर्गत नव्हे, तर ब्रिटिश राजसत्तेच्या रॉयल चार्टर अंतर्गत करण्यात आली होती. म्हणूनच या न्यायालयांच्या समारंभिक परंपरा आणि पोशाख पद्धती इंग्लंडमधील उच्च न्यायालयांच्या प्रथांशी जवळून जोडलेल्या राहिल्या.

ब्रिटिश न्यायाधीश भारतात काम करताना विग आणि गाऊन घालत असत. पुढे भारतीय न्यायाधीशांनीही त्याच परंपरेचे पालन केले. त्यामुळे विग ही न्यायालयीन परंपरेचा भाग बनली. भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर हळूहळू विग घालण्याची प्रथा बंद झाली. आज भारतीय न्यायाधीश आणि वकील प्रामुख्याने काळा गाऊन आणि गळ्यात पांढरा बँड इतकाच पोशाख वापरतात. मात्र कलकत्ता उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांचा शपथविधी किंवा इतर विशेष प्रसंगी विग घालण्याची परंपरा अजूनही पाळली जाते. ही प्रथा न्यायालयाच्या ऐतिहासिक वारशाचा भाग म्हणून टिकवून ठेवण्यात आली आहे.

भारताबाहेर आजही काही न्यायालयांमध्ये- विशेषतः इंग्लंड आणि वेल्समधील फौजदारी न्यायालयांत - न्यायाधीश आणि वकील विग वापरतात. काही कॉमनवेल्थ देशांमध्येही ही परंपरा अजून अस्तित्वात आहे. काही जणांच्या मते, ही ब्रिटिश काळातील अनावश्यक वसाहतवादी परंपरा आहे आणि आधुनिक भारतात तिचे स्थान नाही. तर काहींच्या मते, ही न्यायव्यवस्थेच्या ऐतिहासिक सातत्याचे आणि परंपरेचे प्रतीक आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Calcutta High Court Chief Justice's Red Gown and Wig: Tradition Lives

Web Summary : Calcutta High Court's Chief Justice continues wearing the traditional red gown and wig, a British-era practice mostly abandoned in India, during special occasions, upholding historical legacy and judicial tradition.
टॅग्स :Courtन्यायालयwest bengalपश्चिम बंगाल